मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३: अपराजिता तंत्र-प्रणीत अनुपालन उपाय-सुविधा पुरविणाऱ्या अग्रणी कंपनीने डॉ. वेणू मूर्ती यांची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) म्हणून नियुक्ती केली आहे. यातून कंपनीचे तंत्रज्ञान नेतृत्व बळकट करण्यासाठी आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत नाविन्यपूर्णता आणण्याचे प्रयत्न प्रतिबिंबित होते. सीटीओ या नात्याने, डॉ. मूर्ती यांनी अपराजिताच्या सेवा-केंद्रित मॉडेलमधून, उत्पादन-आधारित मॉडेलच्या परिवर्तनाकडे आणि विशेषतः प्रशासन, जोखीम आणि कम्प्लायन्स (जीआरसी) उपाय-सुविधांच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नागराज कृष्णन, व्यवस्थापकीय संचालक, अपराजित म्हणाले,”डॉ.मूर्ती यांनी यापूर्वी थॉटवर्क्स, युनिसिस, आयबीएम आणि इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. ते फोर्ब्स टेक्नॉलॉजी कौन्सिलचे सदस्य आहेत आणि त्यांनी अनेक शोधनिबंधही लिहिले आहेत. मूर्ती यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ते त्यांच्यासोबत तंत्रज्ञान धोरण, क्लाउड कंप्युटिंग, एंटरप्राइझ आर्किटेक्चर, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील ज्ञानाचा खजिना घेऊन आले आहेत. आम्हाला विश्वास आहे की मूर्ती यांचे कौशल्य अपराजिताला पुढील पाच वर्षात एक अब्ज डॉलर्सची कंपनी बनवायला मदत करेल,”
डॉ.वेणू मूर्ती, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ), अपराजित म्हणाले,“अपराजितात सहभागी होण्याचा मला सन्मान वाटतो. नाविन्यपूर्णतेसाठी आणि सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या परीक्षेत्रात कंपनीला नवीन उंचीवर नेण्यासाठी माझ्या अनुभवाचा लाभ मिळवून देण्यास मी उत्सुक आहे.”