मुंबई, १ नोव्हेंबर २०२३: प्रचलित आरोग्यविषयक समस्यांसाठी सर्वांगीण व नैसर्गिक उपचार प्रदान करण्याच्या मिशनवर असलेल्या डॉ. बत्रा’ज या होमिओपॅथीच्या क्षेत्रातील प्रख्यात कंपनीने नवीन न्यूट्रिगुड गम्मीज श्रेणी लाँच केली आहे. हे गम्मीज आरोग्याची काळजी घेण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी बारकाईने उत्पादित करण्यात आले. डॉ. बत्रा’ज चार गमी व्हर्जन्स देते, जे केस, त्वचा, तणाव, चिंता व झोपेसंदर्भातील समस्यांचे निराकरण करतात.
केसांच्या आरोग्यासाठी अल्टिमेट सोल्यूशन न्यूट्रिगुड गम्मीज केसांसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन ए, बी६, बी७ (बायोटिन), बी१२, डी२ व ई यांचे १०० टक्के रिकमेण्डेड डेअली अलाऊन्स देते. अॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्मांसाठी ओळखले जाणारा द्राक्षांच्या बियांचा अर्क केसगळती विरोधातील लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. केस मजबूत करण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यदायी वाढीला चालना देण्यासाठी हे आवश्यक व्हिटॅमिन्स काळजीपूर्वक निवडले जातात. त्वचा चमकदार व कोमल होण्यासाठी न्यूट्रिगुड गम्मीज त्वचेसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन सी, बी५, बी६, बी७ (बायोटिन) व बी१२ यांचे १०० टक्के रिकमेण्डेड डेअली अलाऊन्स देते. अॅण्टीबॅक्टेरिअल संयुगे मोठ्या प्रमाणात असलेली ग्रीन टी यूव्ही किरण व प्रदूषण अशा पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून एपिडर्मिसचे संरक्षण करते, तसेच त्वचा कोमल करते.
तणाव व चिंतेसाठी न्यूट्रिगुड गम्मीजमध्ये अश्वगंधा आहे, जे चिंता व तणाव दूर करण्यामध्ये शक्तिशाली सोबती आहे. कॅमोमाइल शांतमय दिलासा देते, चिंता व तणाव दूर करत अंतर्गत शांततेला चालना देते. गोटू कोला संभाव्य आरामदायी व अॅण्टी-अॅन्क्सिएटी प्रभावांमध्ये योगदान देते आणि ब्रह्मी शरीराच्या तणावाला दूर करण्याप्रती क्षमता वाढवते. पुरेशी झोप मिळण्यासंदर्भात समस्यांचा सामना करावा लागणाऱ्यांसाठी डॉ. बत्रा’ज स्लीप गम्मीज उपयुक्त सोल्यूशन आहेत. कॅमोमाइल, वेलेरियन रूट अर्क व एल-थियानाइन यासारखे नैसर्गिक घटक असलेले हे गम्मीज उत्तम व पुरेशी झोप मिळण्यासह मदत करतात, ज्यामधून उत्तम व विनाव्यत्यय आरामाची खात्री मिळते.
डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक व अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार-प्राप्त डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “होमिओपॅथीची क्षमता आधुनिक विश्वात आणत आम्हाला न्यूट्रिगुड गम्मीजची आमची नवीन श्रेणी सादर करण्याचा आनंद होत आहे. परंपरेमध्ये रूजलेले आणि सर्वांगीण आरोग्याप्रती कटिबद्ध हे गम्मीज आरोग्यासाठी गुणकारी व आनंददायी आहेत. आम्ही शतकोंचे ज्ञान व आधुनिक राहणीमानामधील पोकळी भरून काढण्यासह गतकाळ व वर्तमानकाळाचे परिपूर्ण संयोजन निर्माण करत आहोत, ज्याचा आम्हाला आनंद होत आहे. आमचे गम्मीज पुरूष व महिलांसाठी उपयुक्त आहेत, त्यांच्यामध्ये कोणतीही अतिरिक्त साखर नाही, ते ग्लुटेन व सोया-मुक्त आहेत आणि त्यांच्यामध्ये झिंक आहे, जे केस, त्वचेच्या आरोग्याला मदत करते. न्यूट्रिगुड गम्मीजसह जीवनात अंतर्गत शांततेचा अनुभव घ्या.”