किटकॅटने तीन संपन्न व स्वादिष्ट व्हेरिएण्ट्सच्या नवीन प्रिमिअमश्रेणीच्या लाँचसह आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाढ केली आहे. तीनव्हेरिएण्ट्स – रिच, डार्क व कॅरेमल कोटेड वेफर्स क्रीस्पी कोकोआवेफर्सच्या लेयर्सवर स्वादिष्ट चॉकलेट कोटिंग देतात.
या लाँचला साजरे करण्यासाठी ब्रॅण्डने नवीन मोहिम सादर केली आहे,ज्यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आहेत. वंडरमन थॉम्पसन यांचीसंकल्पना असलेली नवीन मोहिम आऊटडोअर प्लानसह टीव्हीवर व डिजिटली प्रसारित करण्यात येईल.
लाँच करण्यात आलेल्या नवीन श्रेणीबाबत मत व्यक्त करत नेस्लेइंडियाच्या कन्फेक्शनरी बिझनेसच्या संचालक रूपाली रतनम्हणाल्या, ”हा प्रिमिअम विभागामधील किटकॅटचा महत्त्वपूर्ण प्रवेश आहे. आम्ही सतत नाविन्यता आणण्यासह ग्राहकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. नवीन श्रेणी तीन स्वादिष्ट व्हेरिएण्ट्समध्ये येते, जे निवड करण्यासाठी विविध स्वाद व विविध ऑफरिंग्ज प्रदान करतील. आम्हाला आमच्या नवीन प्रिमिअम श्रेणीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अनुष्का शर्मा यांची नियुक्ती करण्याचा आनंद होत आहे. आमच्या मते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून ब्रॅण्ड तत्त्व दिसून येते आणि त्या आमच्या नवीन प्रिमिअम ऑफरिंग्जच्या लाँचसाठी अगदी परिपूर्ण आहेत.”
किटकॅटच्या प्रिमिअम श्रेणीसाठी नवीन अॅम्बेसेडर अभिनेत्री अनुष्काशर्मा म्हणाल्या, ”मला किटकॅट सारख्या प्रतिष्ठित ब्रॅण्डसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. ही नवीन प्रिमिअम श्रेणी स्वादिष्ट अनुभवदेते. मला विश्वास आहे की, सर्वांना या नवीन किटकॅट श्रेणीसह खासव स्वादिष्ट ब्रेक्स आवडतील.”
किटकॅट प्रिमिअमची ही नवीन श्रेणी भारतभरात रिच, डार्क व कॅरेमल कोटेड वेफर्स या तीन स्वादिष्ट व्हेरिएण्ट्समध्ये ७० रूपयांपासून १८० रूपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध असेल.
अनुष्का शर्मा असलेली नवीन मोहिम:https://youtu.be/7gSnGgO_DCw?si=cfNrNuX-d8xiBlYl