maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून १०० स्‍टारबस ईव्‍हींसह बेंगळुरूमधील शहरी प्रवासाचे इलेक्ट्रिफिकेशन

बेंगळुरू, २७ डिसेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशनला (बीएमटीसी) तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत स्‍टारबस ईव्‍हींची डिलिव्‍हरी करण्‍यासह बेंगळुरूच्‍या इलेक्ट्रिफाईड सार्वजनिक परिवहनाला गती दिली आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लि. आणि बीएमटीसी यांच्‍यामधील करारानुसार हा मोठ्या ऑर्डरचा भाग म्‍हणून मोठा टप्‍पा आहे. या करारांतर्गत १२ वर्षांच्‍या कालावधीसाठी ९२१ अत्‍याधुनिक १२-मीटर लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा,देखरेख व ऑपरेट करण्‍यात येईल. स्‍वदेशी इनोव्‍हेशन टाटा स्‍टारबस ईव्‍ही बीएमटीसीच्‍या ताफ्यामध्‍ये सामील करण्‍यात आली आहे. टाटा स्‍टारबस ईव्‍हीमध्‍ये आरामदायी प्रवास अनुभवासाठी उच्‍च दर्जाची डिझाइन आणि दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. मेक इन इंडिया व आत्‍मनिर्भर भारत उपक्रमांशी बांधील राहत या शून्‍य-उत्‍सर्जन इलेक्ट्रिक बसेस नेक्‍स्‍ट-जनरेशन आर्किटेक्‍चरनुसार निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच बेंगळुरू शहरामध्‍ये सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर आंतरशहरीय प्रवासासाठी या बसेसमध्‍ये प्रगत बॅटरी सिस्‍टम्‍सची शक्‍ती आहे.   

 

कर्नाटकचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. सिद्धरामय्या यांच्‍या हस्‍ते टाटा मोटर्सच्‍या स्‍मार्ट इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी कर्नाटकचे माननीय उपमुख्‍यमंत्री श्री. डीके शिवकुमार, कर्नाटक सरकारचे माननीय परिवहन व मुजराई मंत्री आणि बीएमटीसीचे अध्‍यक्ष श्री. रामलिंगा रेड्डी, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री. रिजवान अर्शद, बीएमटीसीच्‍या संचालक (एसअॅण्‍डव्‍ही) आयपीएस कुमारी कला कृष्‍णास्‍वामी आणि बीएमटीसीच्‍या व्‍यवस्थापकीय संचालक आयएएस कुमारी जी. सत्‍यवती आदी इतर मान्‍यवर उपस्थित होते.    

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत बीएमटीसीच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक आयएएस कुमारी जी सत्‍यवती म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला शहरामध्‍ये टाटाच्‍या इलेक्ट्रिक बसेसच्‍या प्रोटोटाइप चाचण्‍यांच्‍या यशस्‍वी पूर्ततेनंतर टाटा मोटर्सच्‍या अत्‍याधुनिक बसेसचा समावेश करण्‍याचा आनंद होत आहे. या इलेक्ट्रिक बसेसची उल्‍लेखनीय कार्यक्षमता कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍याप्रती आणि नागरिकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्‍याप्रती बीएमटीसीच्‍या कटिबद्धतेशी पूर्णपणे संलग्‍न आहे. या बसेस पर्यावरणास अनुकूल परिवहनाप्रती योगदान देतील, तसेच शहरामध्‍ये आवाज-मुक्‍त व आरामदायी सार्वजनिक परिवहन देखील देतील.

इव्‍हेण्‍टमध्‍ये आपले मत व्‍यक्‍त करत टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचलाक श्री. असिम कुमार मुखोपाध्‍याय म्‍हणाले, ”आम्‍हाला बीएमटीसीच्‍या ताफ्यामध्‍ये आमच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन स्‍टारबस ईव्‍हींचा समावेश होताना पाहण्‍याचा आनंद होत आहे. बेंगळुरूमधील नागरिकांना आमच्‍या ऑफरिंगमधून अत्‍याधुनिक, पर्यावरणास अनुकूल ऑफरिंग्‍ज प्रदान करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमच्‍या बसेस बीएमटीसीच्‍या ताफ्याला प्रबळ करतील आणि सार्वजनिक परिवहन सुरक्षित, आरामदायी, तंत्रज्ञान संचालित आणि ऊर्जा-कार्यक्षम करतील. या बसेस अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये विकसित व उत्‍पादित करण्‍यात आल्‍या आहेत आणि विविध स्थितींमध्‍ये प्रखरपणे चाचणी व सत्‍यापित करण्‍यात आल्‍या आहेत.

आतापर्यंत टाटा मोटर्सने भारतातील विविध शहरांमध्‍ये १,५०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे, ज्‍यांनी ९५ टक्‍क्‍यांहून अधिक अपटाइमसह एकूण १० कोटी किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत प्रवास केला आहे. टाटा स्‍टारबस ईव्‍ही अत्‍याधुनिक ई-बस आहे, जी शहरातील प्रवासासाठी नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करते. फुल-इलेक्ट्रिक ड्राइव्‍हट्रेनसह ही अत्‍याधुनिक वेईकल ऊर्जा वापर ऑप्टिमाइज करते, ज्‍यामुळे ऊर्जेचा वापर आणि कार्यसंचालन खर्च कमी होतो. या ई-बसमध्‍ये सुलभ बोर्डिंग, आरामदायी आसन व ड्रायव्‍हर-अनुकूल ऑपरेशन्‍सचा समावेश आहे, तसेच शून्‍य उत्‍सर्जनची खात्री देते. इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्‍युशन, एअर सस्‍पेंशन,इंटेलिजण्‍ट ट्रान्‍सपोर्ट सिस्‍टम, पॅनिक बटन यांसारखी इतर प्रगत वैशिष्‍ट्ये असलेली ही ई-बस प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाची खात्री देते. या इलेक्ट्रिक बसमधून शुद्ध सार्वजनिक परिवहनाप्रती कटिबद्धता दिसून येते. तसेच ही इलेक्ट्रिक बस शहरातील प्रवाशांच्‍या परिवहन गरजांसाठी योग्‍य निवड आहे. 

Related posts

जीई ऐरोस्‍पेसकडून जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन लाँच नेक्‍स्‍ट इंजीनिअर्सचा विस्‍तार करण्‍यासाठी २० दशलक्ष डॉलर्स, कर्मचारीवर्ग विकासासाठी २ दशलक्ष डॉलर्स आणि आपत्‍कालीन मदतकार्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करत कंपनीचे तत्त्व ‘टू लिफ्ट पीपल अप’ला अधिक दृढ केले

Shivani Shetty

हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी क्षेत्रात नोकरीमध्ये वाढ: नोकरी जॉबस्‍पीक

Shivani Shetty

पेटीएमने यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले

Shivani Shetty

Leave a Comment