मुंबई, २५ सप्टेंबर २०२३: पुणे-स्थित डिजिकोअर स्टुडिओज लिमिटेड (डिजिटकोअर) या जागतिक दर्जाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओने ८,२२,१६,८०० रूपयांची व्यापक अँकर गुंतवणूक प्राप्त केली आहे. कंपनीने तीन प्रमुख गुंतवणूकदारांना प्रतिशेअर १७१ रूपये मूल्य असलेले ४,८०,८०० इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे.
राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (५१.०८ टक्के) या कंपनीला २,४५,६०० इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, ज्यासाठी ४,१९,९७,६०० रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सेंट कॅपिटल फंड (२४.४६ टक्के)ला १,१७,६०० इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, ज्यासाठी २,०१,०९,६०० रूपयांची गुंतवणूक करण्यात आली असून डिजिटकोअरमध्ये कंपनीचा असलेला विश्वास दिसून येतो. एलआरएसडी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (२४.४६ टक्के)ला १,१७,६०० इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, ज्यासाठी २,०१,०९,६०० रूपयांची गुंतवणूक करण्याची आली आहे.
या धोरणात्मक अँकर गुंतवणूकीमधून डिजिटकोअर स्टुडिओजमध्ये बाजारपेठेचा विश्वास दिसून येतो आणि कंपनीचे डायनॅमिक व्हीएफएक्स उद्योगामधील स्थान अधिक दृढ होते. या गुंतवणूकांमुळे डिजिकोअरच्या महत्त्वाकांक्षी विकासाला चालना मिळेल. डिजिकोअर स्टुडिओज आपल्या आयपीओच्या दिशेने वाटचाल करत असताना कंपनी आपल्या खेळत्या भांडवल गरजा व विकास उपक्रमांसाठी उभारण्यात आलेल्या निधीचा वापर करण्याप्रती कटिबद्ध आहे. ज्यामधून कंपनीच्या गुंतवणूकदारांना व भागधारकांना सतत मूल्य वितरित होण्याची खात्री मिळते.
ऑफर सबस्क्रिप्शनसाठी सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुली झाला आहे. व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओचा १२.६१ लाख इक्विटी शेअर्सच्या (फ्रेश इश्यू) पहिल्याच पब्लिक इश्यूच्या माध्यमातून, तसेच अपर प्राइस बॅण्डमध्ये* ८.९२ कोटी रूपये मूल्य असलेल्या ५.२२ लाख इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून २१.५६ कोटी रूपये प्राप्त करण्याचा मनसुबा आहे. अर्ध्या नेट ऑफर्स क्यूआयबीसाठी आरक्षित आहेत, तर १५ टक्के नेट ऑफर्स हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्ससाठी आहेत आणि उर्वरित ३५ टक्के नेट ऑफर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी आहेत.