maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डिजिकोअर स्टुडिओजचा आयपीओ पहिल्या दिवशी २१.४७ पटींनी ओव्हरसबस्क्राइब्ड

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३: बहुप्रतिक्षित डिजिकोअर स्टुडिओज आयपीओचे पहिल्याच दिवशी २१.४७ पट या दराने प्रचंड सबस्क्रिप्शन झाले. हा उत्साह प्रामुख्याने रिटेल गुंतवणूकदारांमध्ये दिसून येत आहे. त्यांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या तुलनेत ३२.१७ पटींनी ओव्हरसबस्क्राइब केले आहे. बिगरसंस्थात्मक खरेदीदारांनीही यामध्ये लक्षणीय रस घेतला आहे आणि त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या १५.६९ पट सबस्क्रिब्शन घेतले आहे.  अर्हताधारक संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबी) त्यांच्यासाठी राखीव भागाच्या ७.०९ पट सबस्क्राइब करून या आयपीओवर विश्वास दाखवला आहे. हा आयपीओ  प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्यासह प्रति इक्विटी समभाग १६८ ते १७१ रुपयांची दरश्रेणी देऊ करतो. डिजिकोअर स्टुडिओज आयपीओच्या प्रत्येक लॉटमध्ये ८०० इक्विटी समभागांचा समावेश आहे.

लक्षणीय बाब म्हणजे, सुरुवातीला ११,२३,२०० समभाग विक्रीसाठी ठेवले असताना, कंपनीला तब्बल २,१२,१७,६०० समभागांसाठी बोली प्राप्त झाल्या. आयपीओतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग आपल्या धोरणात्मक वाढीच्या उपक्रमांसाठी करण्याची डिजिकोअरची योजना आहे. यांत पुढील नवोन्मेष तसेच गतीशील डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रात विस्ताराचा समावेश आहे.

यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असलेले रिटेल गुंतवणूकदार किमान एक लॉट या आकारमानाच्या अर्जाने सुरुवात करू शकतात, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट्ससाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे. डिजिकोअर विस्तृत सहभागाला उत्तेजन देण्यास वचनबद्ध आहे आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी मोठा भाग राखून ठेवण्यात आला आहे.

सारथी कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती या प्रस्तावासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून करण्यात आली आहे, तर बिगशेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तावाचे रजिस्ट्रार म्हणून काम बघणार आहेत. ग्रेटेक्स शेअर बुकिंग लिमिटेड या आयपीओसाठी मार्केट मेकर आहे.

ग्रे मार्केट प्रीमियमचे (जीएमपी) तपशील: आजच्या तारखेला डिजिकोअर स्टुडिओजचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) प्रति समभाग १७५ रुपये आहे. टॉपशेअरब्रोकरच्या आकडेवारीनुसार, यावरून ३४६ रुपये प्रति समभाग किमतीला १०२.३४ टक्के प्रीमियम लिस्टिंग आहे असे दिसते (वरील दरश्रेणी १७१ रुपये+ १७५ रुपये प्रति समभाग). या ‘ग्रे मार्केट प्रीमियम’वरून इश्यू दराहून अधिक पैसे मोजण्याची गुंतवणूकदारांची तयारी दिसून येते.

डिजिकोअर आयपीओ आढावा: आर्थिक वर्ष २३च्या दमदार उत्पन्नाच्या आधारे या इश्यूचे संपूर्ण मूल्यांकन झाले आहे असे समजले जाऊ शकते. अतिरिक्त निधी हातात असलेल्या माहितीप्राप्त गुंतवणूकदारांची मध्यम ते दीर्घकाळाच्या गुंतवणूक संधी घेण्याची इच्छा असू शकते.  डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे डिजिकोअर हा आयपीओ बाजारातील आश्वासक उमेदवार ठरला आहे. कंपनीच्या वित्तीय कामगिरीतून उत्कृष्टता व नवोन्मेषाप्रती अविचल बांधिलकी दिसून येते.

Related posts

इझमायट्रिपची इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून १०० स्‍टारबस ईव्‍हींसह बेंगळुरूमधील शहरी प्रवासाचे इलेक्ट्रिफिकेशन

Shivani Shetty

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

Shivani Shetty

Leave a Comment