maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिएतजेटची नव्‍या उंचीच्‍या दिशेने झेप: मेलबर्न आणि हिरोशिमापर्यंत नवीन विमानेसवा लाँच

(मुंबई, मार्च ६, २०२४) व्हिएतजेट या व्हिएतनाममधील आघाडीच्‍या विमानवाहतूक कंपनीने हनोई ते मेलबर्न आणि हिरोशिमापर्यंत दोन प्रत्‍यक्ष विमानसेवांच्‍या लाचची घोषणा केली आहे. हे ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी व्हिएतजेटच्‍या आपल्‍या फ्लाइट नेटवर्कचा विस्‍तार करण्‍याच्‍या योजनेमधील पुढील पाऊल आहे. यामुळे व्हिएतनाम व इतर देशांमधील सांस्‍कृतिक देवाणघेवाण, शिक्षण, आर्थिक विकास आणि पर्यटनासाठी अधिकाधिक संधी खुल्‍या होतील.  

व्हिएतनामची राजधानी हनोईला ऑस्‍ट्रेलियामधील सर्वात मोठे शहर आणि व्हिक्‍टोरिया राज्‍याची राजधानी मेलबर्नला कनेक्‍ट करणारी विमानसेवा ३ जून २०२४ पासून सुरू होईल. हनोई ते हिरोशिमा विमानसेवेसंदर्भात फ्लाइट्स १२ मे २०२४ पासून कार्यरत होतील, जेथे दर आठवड्याला गुरूवार व रविवार दोन रिटर्न फ्लाइट्सची सेवा देण्‍यात येईल आणि प्रत्‍येक प्रवासासाठी जवळपास ४ तास लागतील. 

नवीन विमानसेवांना साजरे करण्‍यासाठी व्हिएतजेट वेबसाइटwww.vietjetair.com आणि व्हिएतजेट एअर मोबाइल अॅपवर ऑल-इन ५,५५५ रूपयांपासून सुरू होणाऱ्या हजारो प्रमोशनल तिकिटांची विक्री सुरू करत आहे. हे प्रमोशन शुक्रवार ८ मार्च २०२४ पासून सर्व आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर लागू आहे, ज्‍यामध्‍ये ८ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्‍या स्थिर फ्लाइट वेळांचा समावेश आहे (*). 

व्हि‍एतजेट आणि स्विसपोर्टने विमानवाहतूक उद्योगाच्‍या विविध क्षेत्रांमध्‍ये सेवा प्रदान करण्‍यासाठी ५ मार्च रोजी मेलबर्न, ऑस्‍ट्रेलिया येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या व्हिएतनाम-ऑस्‍ट्रेलिया बिझनेस फोरममध्‍ये करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या आहेत. या करारांतर्गत व्हिएतजेट आणि स्विसपोर्ट सहयोगाने दोन्‍ही कंपन्‍या कार्यरत असलेल्‍या विमानतळांवर ग्राऊंड सर्विसेस्, लॉजिस्टिक्‍स ऑपरेशन्‍स, फ्रेट टर्मिनल सेवा आणि इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर मॅनेजमेंट सेवा प्रदान करतील. ते विमानतळांवर सर्वोच्‍च आंतरराष्‍ट्रीय मानकांनुसार कार्गो टर्मिनल सिस्‍टम्‍सचे देखील व्‍यवस्‍थापन पाहतील. 

(*) अटी व नियम लागू  

Related posts

सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी ‘पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

Shivani Shetty

स्‍टडी ग्रुपने यूएसमधील आपली उपस्थिती वाढवली

Shivani Shetty

भारत-केंद्रित नेटवर्किंग व्‍यासपीठ ‘खुल के’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment