maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डिजिकोअरच्या आयपीओला मिळाले प्रचंड यश

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३: गुंतवणूदारांनी दाखवलेल्या अफाट उत्साहामुळे डिजिकोअरच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) आज अखेरचा दिवस संपेपर्यंत २८२ पट ओव्हरसबस्क्रिप्शन प्राप्त झाले. सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुला झालेला आयपीओ आज २७ सप्टेंबर २०२३ रोजी बंद झाला. प्रस्तावाच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी या आयपीओची तुफान मागणी केली. लक्षणीय बाब म्हणजे, डिजिकोअरच्या आयपीओला अँकर गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यांनी सप्टेंबर २२, २०२३ रोजी ८.२२ कोटी रुपयांची ग्वाही देत यशाची पायाभरणी केली.

डिजिकोअरच्या आयपीओने सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच दिवशी सबस्क्रिप्शनचे आकडे २२.५० पट होते, तर दुसऱ्या दिवशी ते ७६.८९ पटींनी अधिक होते. ह्याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी आयपीओला प्रचंड प्रतिसाद दिला. आयपीओने एकूण ११,२३,२०० उपलब्ध समभागांच्या मोबदल्यात ३१,६२,४८,८०० इक्विटी समभागांसाठी बोली आकर्षित केल्या. यातून डिजिकोअरचे समभाग घेण्याची गुंतवणूकदारांमधील प्रबळ इच्छा दिसून आली.

आयपीओचे एकूण आकारमान ३०.४८ कोटी रुपयांपर्यंत आहे. ह्यात २१.५५ कोटींच्या १२,६०,८०० इक्विटी समभागांच्या ताज्या इश्यूचा आणि ५,२१,६०० समभागांच्या विक्री प्रस्तावाचा (ओएफएस) समावेश आहे. डिजिकोअरच्या आयपीओची दरश्रेणी १६८ ते १७१ रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली होती, आयपीओचे लॉट आकारमान ८०० समभाग असल्यामुळे ते व्यवस्थापनास सोपे होते.

कंपनीने आयपीओपूर्व निधीउभारणी फेरीचीही यशस्वी सांगता केली होती. ह्यात उद्योगक्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या गुंतवणूका कंपनीने आकर्षित केल्या होत्या. यांमध्ये निखिल वोरा, विजय खेतान, मृणाल सिंग, प्रमोट कासट आणि अनेकांचा सहभाग होता. डिजिकोअरने अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) जगताला दिलेल्या नवोन्मेष्कारी योगदानांचे प्रचंड मूल्य या गुंतवणूकदारांनी ओळखले.

२००० साली स्थापन झालेली डिजिकोअर स्टुडिओज लिमिटेड ही कंपनी व्हिज्युअल इफेक्ट्स सेवांची विस्तृत श्रेणी पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये चित्रपट, वेबसीरिज, टीव्ही मालिका, माहितीपट व अन्य जाहिरातींना दिल्या जाणाऱ्या व्हिज्युअल इफेक्ट्स सेवांचा समावेश होतो.

Related posts

IRM एनर्जी लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर बुधवार, 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सुरू होणार आहे, किंमत बँड ₹480 ते ₹505 प्रति इक्विटी शेअर सेट केला आहे.

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून सुरतमध्‍ये अत्‍याधुनिक नोंदणीकृत वेईकल स्‍क्रॅपिंग केंद्राचे उद्घाटन

Shivani Shetty

ओटीटीवरील जगातील पहिला एंजल इन्व्हेस्टमेंट शो ‘इंडियन एंजल्स’ लॉन्च

Shivani Shetty

Leave a Comment