(मुंबई, जानेवारी 3, 2024) – व्हिएतजेट या व्हिएतनामी आधुनिक विमानवाहतूक कंपनीने आपल्या आधुनिक ताफ्यामध्ये त्यांचे १०२वे विमान A321neo ACF 240 ची भर केली, जे हो ची मिन्ह सिटीमधील टॅन सन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एअरलाइनला सतत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि २०२३ मध्ये नवीन विमान कार्यरत केले आहे.
एअरबसने व्हिएतजेटला जगातील सर्वात अत्याधुनिक विमान वितरित केले आहे. या विमानामध्ये अपग्रेडेड पॅसेंजर केबिन आहे, जी आकार व एैसपैस आसन व्यवस्थेसंदर्भात गरजांची पूर्तता करते, ज्यामुळे प्रवाशांना सर्वोत्तम विमानप्रवासाचा अनुभव मिळतो.
A321neo ACF विमान जवळपास २० टक्के इंधन वापर, जवळपास ७५ टक्के ध्वनी उत्सर्जन आणि जवळपास ५० टक्के पर्यावरणीय उत्सर्जन कमी करण्याप्रती योगदान देते. यापूर्वी, व्हिएतजेट नवीन A321neo ACF 240चा वापर करणारी जगातील पहिली एअरलाइन होती.
व्हिएतनामपासून ऑस्ट्रेलिया, भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, तैवान (चीन) इत्यादींसारख्या परदेशीठिकाणांना कव्हर करणाऱ्या अनेक हवाई मार्गांवर ग्राहकांना सेवा देण्यासाठीव्हिएतजेट हे नवीन विमान तात्काळ सेवेत आणेल. व्हिएतनामला आशियाआणि ऑस्ट्रेलियातील इतर देशांशी जोडणाऱ्या १२० हवाई मार्गांवर दररोजजवळपास ४५० फ्लाइट्स सेवा देणारी ही एअरलाइन एका दशकाहूनअधिक काळ कार्यरत आहे.