मुंबई, २२ सप्टेंबर २०२३: डिजिकोअर स्टुडिओज लिमिटेड (डिजिकोअर) हा भारतातील आघाडीचा व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओ एनएसई इमर्जवर आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) आणण्यासाठी सज्ज आहे. हा आयपीओ सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होऊन बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी संपेल आणि त्यातून गुंतवणूकदारांना डिजिकोअरच्या भविष्यातील यशोगाथेचा भाग होण्याची संधी मिळेल.
या आयपीओमध्ये एकूण १७,८२,४०० समभाग आहेत. त्यात नवीन १२,६०,८०० समभाग नव्याने तर ५,२१,६०० समभाग ऑफर ऑन सेल (ओएफएस)वरील आहेत. या आयपीओसाठी किमतीची श्रेणी १६८ रूपये ते १७१ रूपये या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांसाठी किमान बोलींचा लॉट ८०० समभागांचा आहे. एका लॉटसाठीचा अर्ज रिटेल वितरणाचा भाग असेल.
सारथी कॅपिटल एडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या वित्तीय सल्ला कंपनीवर या ऑफरिंगसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरची भूमिका निभावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ऑफरसाठी रजिस्ट्रारच्या भूमिकेत असेल. त्यामुळे सर्व भागधारकांसाठी प्रक्रिया सुलभपणे पार पडेल.
डिजिकोअर स्टुडिओजने अलीकडील वर्षांमध्ये उत्तम आर्थिक कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे आणि तो ३५.५६ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. त्याउलट मागील आर्थिक वर्षात हा महसूल २८.८८ कोटी रूपये होता. या कालावधीतील निव्वळ नफा ४.३७ कोटी रूपयांवर गेला आहे. आर्थिक वर्ष २२ मध्ये हाच नफा ४६.५४ लाख रूपये होता. जून २०२३ मध्ये संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने ११.८३ कोटी रूपयांचा महसूल नोंदवला असून त्याचबरोबर २.८० कोटी रूपयांचा निव्वळ नफाही दर्शवला आहे.