maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात एआय टेलिव्हिजन्‍सच्‍या न्‍यू एराची घोषणा; शक्तिशाली एआय वैशिष्‍ट्ये असलेले निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टेलिव्हिजन्‍स लाँच

बेंगळुरू, भारत – एप्रिल १७, २०२४ – सॅमसंग या भारतताील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने आज बेंगळुरूमधील सॅमसंग ऑपेरा हाऊस येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘अनबॉक्‍स अँड डिस्‍कव्‍हर’ इव्‍हेण्‍टमध्‍ये त्‍यांच्‍या अल्‍ट्रा-प्रिमिअम निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टेलिव्हिजन्‍सच्‍या लाँचसह एआय टीव्‍हींच्‍या न्‍यू एराची घोषणा केली. निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टीव्‍हींची २०२४ लाइन-अप शक्तिशाली एआय-संचालित सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून होम एंटरटेन्‍मेंटचा अनुभव अधिक उत्‍साहित करते.

”सॅमसंग ग्राहक जीवनशैली अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी आपल्‍या उत्‍पादन श्रेणींमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) च्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेची भर करत आहे. याच कारणामुळे आम्‍ही ग्राहकांना अपवादात्‍मक टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव देण्‍यासाठी होम एंटरटेन्‍मेंटमध्‍ये एआयचा समावेश केला आहे. निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टीव्‍हींची आमची २०२४ श्रेणी होम एंटरटेन्‍मेंट अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते आणि एआयच्‍या क्षमतेसह उपलब्‍धता, शाश्‍वतता व सुधारित सुरक्षिततेसह नाविन्‍यता देते,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्‍हणाले.

”टेलिव्हिजन्‍स आाधुनिक राहणीमानाचे मुख्‍य आकर्षण ठरले आहेत, ज्‍यामध्‍ये तंत्रज्ञान व जीवनशैलीचे उत्तम संयोजन आहे. भारतातील मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍ससाठी वाढत्‍या मागणीमधून प्रिमिअम टेलिव्हिजन्‍सप्रतील ग्राहकांची पसंती दिसून येते. आम्‍ही एआय टेलिव्हिजन्‍स लाँच करत आहोत, जे सर्वोत्तम व्हिज्‍युअल व साऊंड क्‍वॉलिटीमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. एआय-पॉवर्ड ८के निओ क्‍यूएलईडी, ४के निओ क्‍यूएलईडी आणि ओएलईडी टीव्‍हींच्‍या आमच्‍या नवीन श्रेणीच्‍या लाँचसह, आम्‍हाला भारतातील आमच्‍या बाजारपेठ अग्रस्‍थानामध्‍ये वाढ होण्‍याचा विश्‍वास आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

निओ क्‍यूएलईडी ८के सह सुस्‍पष्‍टता, साऊंड व स्‍मार्ट अनुभवासाठी नवीन एनक्‍यू८ एआय जेन३ प्रोसेसर

सॅमसंगचा फ्लॅगशिप टीव्ही  निओ क्‍यूएलईडी ८के मध्‍ये प्रगत एनक्‍यू८ एआय जेन३ प्रोसेसर आहे, ज्‍यामधून एआय टीव्‍ही तंत्राानामधील मोठी झेप दिसून येते. एनक्‍यू८ एआय जेन३ प्रोसेसरमध्‍ये न्‍यूरल प्रो‍सेसिंग युनिट (एनपीयू) आहे, जे पूर्वीच्‍या युनिटच्‍या तुलनेत दुप्‍पट गती देते, तसेच न्‍यूरल नेटवर्क्‍समध्‍ये ६४ वरून ५१२ पर्यंत आठ-पट वाढ झाली आहे. यामधून इनपुट सोर्स कोणतेही असो सुस्‍पष्‍टतेसह अपवादात्‍मक टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव मिळतो.

मोठ्या स्क्रिन आकाराचा टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी २०२४ निओ क्‍यूएलईडी ८के मध्‍ये विविध एआय वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे:

एआय पिक्‍चर टेक्‍नॉलॉजी उल्‍लेखनीय सुस्‍पष्‍टता व न्‍यूट्रलनेससह चित्रे, तसेच व्‍यक्‍तींच्‍या चेहऱ्यांवरील हावभाव आणि इतर बारीक-सारीक गोष्‍टी सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते.

एआय अपस्‍केलिंग प्रो कन्‍टेन्‍टला ८के डिस्‍प्‍लेमध्‍ये बदलते.

एआय मोशन एन्‍हान्‍सर प्रो क्रीडा सारख्‍या गतीशील कन्‍टेन्‍टदरम्‍यान सुस्‍पष्‍टता वाढवण्‍यासाठी अत्‍याधुनिक मोशन डिटेक्‍शन अल्‍गोरिदमचा वापर करते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक क्षणाचा आनंद घेता येतो. सामन्‍यादरम्‍यान हे वैशिष्‍ट्य विनाव्‍यत्‍यय चेंडू ट्रॅक करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रत्‍यक्ष स्‍टेडियममध्‍ये लाइव्‍ह सामना पाहत असल्‍यासारखे वाटते.

रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर प्रो पिक्‍चरमध्‍ये वास्‍तविकतेची भर करते आणि प्रेक्षकांचे सीनमध्‍ये लक्ष वेधून घेते.

एआय साऊंड टेक्‍नॉलॉजी अॅक्टिव्‍ह वॉईस अॅम्प्लिफायर प्रोच्‍या माध्‍यमातून अचूक ऑडिओची खात्री देते, जे पार्श्‍वभूमीमधील आवाजांना ओळखते आणि आपोआपपणे साऊंड अॅडजस्‍ट करते. ऑब्‍जेक्‍ट ट्रॅकिंग साऊंड प्रो स्क्रिनवर सुरू असलेल्‍या अॅक्‍शननुसार साऊंड सिंक करत ऑडिओ अनुभव वाढवते आणि अधिक डायनॅमिक व सर्वसमावेशक व्‍युईंग अनुभव देते. अॅडप्टिव्‍ह साऊंड प्रो इंटेलिजण्‍टली कन्‍टेन्‍टचा आवाज व रूममधील आवाज समायोजित करत ऑडिओ अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते आणि मोठाव स्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येण्‍याची खात्री देते.  

एआय ऑटो गेम मोड गेम व शैलीला ओळखते आणि आपोआपपणे पिक्‍चर क्‍वॉलिटी व साऊंड क्‍वॉलिटी सेटिंग्‍ज तयार करते.

एआय कस्‍टमायझेशन मोड कन्‍टेन्‍ट प्रकारानुसार वापरकर्त्‍याच्‍या पसंतीवर आधारित प्रत्‍येक सीनसाठी पिक्‍चर समायोजित करते.

एआय एनर्जी मोड पिक्‍चर क्‍वॉलिटीबाबत तडजोड न करता ऊर्जेची बचत करते.

निओ क्‍यूएलईडी ८के दोन मॉडेल्‍स QN900DQN800D मध्‍ये आणि ६५ इंच, ७५ इंच व ८५ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध आहे.

सर्व मनोरंजन गरजांसाठी व्‍यापक लाइनटप: निओ क्‍यूएलईडी ४के, जगातील पहिला ग्‍लेअर-फ्री ओएलईडी

२०२४ निओ क्‍यूएलईडी ४के लाइनअपमध्‍ये एनक्‍यू४ एआय जेन२ प्रोसेसरची शक्‍ती आहे, जे कोणत्‍याही कन्‍टेन्‍टमध्‍ये वास्‍तविकतेची भर करते आणि आकर्षक ४के रिझॉल्‍यूशनचा अनुभव देते. रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर प्रो आणि क्‍वॉन्‍टम मॅट्रिक्‍स टेक्‍नॉलॉजीद्वारे सुधारित स्क्रिन गुंतागुंतीच्‍या सीनध्‍ये उत्तम कॉन्स्ट्रास्‍टची खात्री देते. अचूक रंगसंगतींसाठी जगातील पहिला पॅन्‍टोन व्‍हॅलिडेटे डिस्‍प्‍ले आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी डॉल्‍बी अॅटमॉससह निओ क्‍यूएलईडी ४के अल्टिमेट ४के यूएचडी अनुभवासाठी स्‍तर उंचावते.

निओ क्‍यूएलईडी ४के दोन मॉडेल्‍स QN85DQN90D मध्‍ये आणि ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८५ इंच व ९५ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध आहे.

सॅमसंग जगातील पहिला ग्‍लेअर-फ्री ओएलईडी देखील लाँच करत आहे, ज्‍यामुळे कोणत्‍याही प्रकाशात अनावश्‍यक रिफ्लेक्‍शन दूर होण्‍यासह कॉन्स्ट्रास्‍ट व सुस्‍पष्‍टपणे चित्रे दिसण्‍याची खात्री मिळते. निओ क्‍यूएलईडी ४के लाइनअपप्रमाणे एनक्‍यू४ एआय जेन२ प्रोसेसरची शक्‍ती असलेल्‍या सॅमसंगच्‍या ओएलईडी टेलिव्हिजन्‍समध्‍ये रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर आणि ओएलईडी एचडीआरप्रो यांसारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी पिक्‍चर क्‍वॉलिटीला नव्‍या उंचीवर घेऊन जातात.

तसेच, मोशन एक्‍ससेलरेटर १४४ हर्ट्झ सारखी वैशिष्‍ट्ये सुलभ गती व जलद रिस्‍पॉन्‍स रेट्सची खात्री देतात. सॅमसंग ओएलईडी गेमिंगसाठी अल्टिमेट पर्याय आहे. आकर्षक डिझाइन्‍स असलेले ओएलईडी टीव्‍ही व्‍युईंग स्‍पेसमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतात. सॅमसंग ओएलईडी टीव्‍ही दोन मॉडेल्‍स S95DS90D मध्‍ये आणि ५५ इंच, ६५ इंच, ७७ इंच व ८३ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध असेल.

सॅमसंगने गेमिंग, मनोरंजन, शिक्षण व फिटनेस अशा सेवांची श्रेणी समाविष्‍ट करण्‍यासाठी भारतीय ग्राहकांकरिता स्‍थानिकीकृत स्‍मार्ट एक्‍स्‍पेरिअन्‍स देखील क्‍यूरेट केले आहेत.

क्‍लाऊड गेमिंग सर्विस वापरकर्त्‍यांना प्‍लग अँड प्‍लेसह एएए गेम्‍सचा अनुभव घेण्‍यास सक्षम करते, ज्‍यासाठी कोणतेही कन्‍सोल किंवा पीसीची गरज नाही.

सॅमसंग एज्‍युकेशन हब वापरकर्त्‍यांना बिग स्क्रिन लर्निंगसह लाइव्‍ह क्‍लासेसचा अनुभव घेण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे मुलांसाठी शिक्षण अधिक इंटरअॅक्टिव्‍ह व सर्वोत्तम बनते.

स्‍मार्ट योगाचा एआय-सक्षम मॅटसोबत अनुभव घेता येऊ शकतो. रिअल-टाइममध्‍ये आसनासंदर्भात टिप्‍स, तसेच योग्‍य पवित्राबाबत अभिप्राय देखील मिळू शकतात.  

तसेच, टीव्‍ही की क्‍लाऊड सर्विससह ग्राहकांना आता सेट-टॉप बॉक्‍सची गरज नाही, जेथे क्‍लाऊडच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष कन्‍टेन्‍टचे ट्रान्‍समिशन होते.

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस मोफतपणे १०० हून अधिक चॅनेल्‍स देते, जेथे बातम्‍या, चित्रपट, मनोरंजन असे विविध चॅनेल्‍स त्‍वरित उपलब्‍ध होतात.

२०२४ निओ क्‍यूएलईडी ८के, नवीन क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टेलिव्हिजन्‍स सेटअप केल्‍यानंतर त्‍वरित स्‍मार्ट इकोसिस्‍टमशी कनेक्‍ट होण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहेत. वापरकर्त्‍यांनी नवीन सॅमसंग टीव्‍ही ऑन करताच टीव्‍ही विद्यमान नेटवर्क्‍स व डिवाईसेसला ओळखतोआणि कनेक्‍ट होतो, तसचे वापरकर्त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सवरील साध्‍या नोटिफिकेशनद्वारे व्‍यवस्‍थापन केले जाते. हे प्रभावी सेटअप घरातील सर्व सॅमसंग डिवाईसेसमध्‍ये, तसेच थर्ड-पार्टी अप्‍लायन्‍सेस आणि आयओटी डिवाईसेसमध्‍ये आहे.

सॅमसंगची २०२४ स्क्रिन लाइनअप वापरकर्त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍ससोबतच्‍या एकीकरणाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. वापरकर्ते टीव्‍हीजवळ स्‍मार्टफोन आणत स्‍मार्ट मोबाइल कनेक्‍ट कार्यान्वित करू शकतात, जे डिवाईसला टीव्‍ही व कनेक्‍टेड होम अप्‍लायन्‍सेससाठी युनिव्‍हर्सल रिमोटमध्‍ये बदलते.

नवीन एआय टेलिव्हिजन्‍स अॅप्‍स व प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून उच्‍च वैयक्तिकृत अनुभव देखील देतात. या नवीन विजेट्ससह टीव्‍ही स्क्रिन्‍स आता वैयक्तिकृत डॅशबोर्ड्स बनले आहेत, जे वापरकर्त्‍यांना सहजपणे घरातील स्थिती, कॅमेरा फीड्स, ऊर्जा वापर, हवामान अपडेट्स यावर देखरेख ठेवण्‍यास मदत करतात. सुरक्षिततेला अधिक महत्त्व देण्‍यात आले आहे आणि सॅमसंग नॉक्‍ससह प्रत्‍येक वैशिष्‍ट्य, अॅप व प्‍लॅटफॉर्मचे प्रबळ संरक्षण करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे कनेक्‍टेन्‍ट अनुभव गोपनीय व सुरक्षित राहतो.

सॅमसंगने ऑल-न्‍यू म्‍युझिक फ्रेमची देखील घोषणा केली, ज्‍यामध्‍ये प्रिमिअम ऑडिओसह द फ्रेमद्वारे प्रेरित कलात्‍मक डिझाइनचे मिश्रण आहे. हा वैविध्‍यपूर्ण डिवाईस वापरकर्त्‍यांना स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांसह वायरलेस ऑडिओचा आनंद घेत असताना स्क्रिनवर वैयक्तिक फोटोज किंवा कलाकृती पाहण्‍याची सुविधा देतो. स्‍वतंत्र डिवाईस म्‍हणून वापरायचा असो किंवा टीव्‍ही व साऊंडबारसोबत वापरायचा असो म्‍युझिक फ्रेम टीव्‍ही कोणत्‍याही स्‍पेसमध्‍ये सामावून जात विशाल व सुस्‍पष्‍ट आवाजात मनोरंजनाचा अनुभव देतो.

किंमत आणि प्री-ऑर्डर ऑफर

प्री-ऑर्डर ऑफरचा भाग म्‍हणून निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ग्‍लेअर-फ्री ओएलईडी श्रेणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३० एप्रिल २०२४ पर्यंत मॉडेलनुसार जवळपास ७९,९९० रूपये किमतीचा साऊंडबार, ५९,९९० रूपये किमतीचा फ्रीस्‍टाइल आणि २९,९९० रूपये किमतीचा म्‍युझिक फ्रेम मोफत मिळेल. ग्राहक मॉडेलनुसार जवळपास २० टक्‍के कॅशबॅकचा देखील आनंद घेऊ शकतात.  

सॅमसंगच्‍या निओ क्‍यूएलईडी ८के श्रेणीची किंमत ३,१९,९९० रूपयांपासून सुरू होते.
सॅमसंगच्‍या निओ क्‍यूएलईडी ४के श्रेणीची किंमत १,३९,९९० रूपयांपासून सुरू होते.
सॅमसंगच्‍या ओएलईडी श्रेणीची किंमत १,६४,९९० रूपयांपासून सुरू होते.  

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, home appliances, network systems, and memory, system LSI, foundry and LED solutions, and delivering a seamless connected experience through its SmartThings ecosystem and open collaboration with partners. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/in. For Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharat. You can also follow us on Twitter @SamsungNewsIN.

Related posts

आयडीपी एज्‍युकेशनचे बोरीवली येथे भारतातील त्‍यांच्‍या ७७व्‍या कार्यालयाचे उद्घाटन

Shivani Shetty

यामाहा आणत आहे २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लाइन-अप.

Shivani Shetty

भारतात मेटा एआयचे आगमन: आघाडीचे एआय असिस्‍टण्‍ट आता तुमच्‍यासाठी उपलब्‍ध

Shivani Shetty

Leave a Comment