मुंबई, डिसेंबर ४, २०२३ – आयडीपी एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवांमधील जागतिक अग्रणी कंपनीने बोरीवली, मुंबई येथे भारतातील त्यांच्या ७७व्या कार्यालयाचे उद्घाटन करत आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अंधेरी – मुंबई, चर्चगेट – मुंबई, दादर – मुंबई, वाशी – मुंबई आणि ठाणे येथे कंपनीची कार्यालये आहेत. या उद्घाटनासह आयडीपीने देशभरातील ६३ शहरांमधील सर्वाधिक कार्यालयांसह आपले नेतृत्वस्थान कायम ठेवले आहे.
या धोरणात्मक पुढाकारामधून खात्री मिळते की, बोरीवलीमधील विद्यार्थ्यांना आता परदेशात शिक्षण घेण्यासंदर्भात सर्वांगीण समुपदेशन सेवा सोईस्करपणे मिळतील. नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून उच्च पात्र व अनुभवी शिक्षण व्यावसायिक असतील, जे इच्छुकांसोबत सहयोगाने काम करतील आणि त्यांना ऑस्ट्रेलिया, यूएस, यूके, कॅनडा, न्यूझीलंड किंवा आयर्लंड येथील परदेशातील दर्जेदार शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करतील.
आयडीपी एज्युकेशनचे साऊथ एशिया व मॉरिशस येथील प्रादेशिक संचालक पियुष कुमार म्हणाले, ”आम्हाला बोरीवली येथे आमच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या विस्तारीकरणामधून आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्याप्रती आमची स्थिर कटिबद्धता दिसून येते.
शहराच्या उत्तरेकडील भागामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी मोठी मागणी असल्याचे आमच्या निदर्शनास आले, म्हणून आम्ही बोरीवलीमध्ये आमची शाखा स्थापित करण्याचे ठरवले. या विचारशील पुढाकाराचा इच्छुकांना त्यांच्या परिसरात परदेशात शिक्षण घेण्यासंदर्भात दर्जेदार मार्गदर्शन मिळण्याची खात्री घेण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे त्यांना होणाऱ्या कोणत्याही गैरसोयी टाळता येतील. बोरीवलीपर्यंत आमची पोहोच वाढवत आमचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणाप्रती प्रवासामध्ये सक्षम करण्याचा मनसुबा आहे.”
आयडीपी सेवांची व्यापक श्रेणी देते, ज्यामध्ये कोर्सची निवड व अर्ज सबमिशनसंदर्भात तज्ञ सहाय्यता, ऑफर स्वीकृतीसाठी एकसंधी साह्य, व्हिसा प्रक्रियेमध्ये साह्य, निवास व्यवस्था, शैक्षणिक कर्ज सुविधा, पैसे हस्तांतरण अशा सेवांचा समावेश आहे. या अत्यावश्यक सेवा ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, न्यूझीलंड आणि आयर्लंड येथील प्रख्यात शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम व मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षण घेण्याप्रती वाढत्या रूचीचे श्रेय अनुकूल स्थलांतर धोरणे आणि या देशांमधील उच्च दर्जाच्या जीवनशैलीप्रती महत्त्वाकांक्षेला जाते. आयडीपीने भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय शिक्षणसेवा संस्था म्हणून आपले स्थान कायम राखले आहे, जे त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास आणि प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या विस्तारीकरणामधून दिसून येते.
विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुढील पत्त्यावर नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे:
आयडीपी एज्युकेशन इंडिया प्रा. लि. ७, पहिला मजला, भव्य स्फूर्ती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ६२०, शिम्पोली रोड, कस्तुर पार्क, बोरीवली पश्चिम, महाराष्ट्र – ४०००९२.