मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३: जीवनसाथी डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या मॅट्रिमनी ब्रॅण्डने ‘स्ट्रिंग्सऑफलव्हबायजेएस’ या अभियानाचे दुसरे पर्व बॉलिवूडमधील आघाडीच्या पार्श्वगायिका नीती मोहन यांच्यासह सुरू केले आहे. आधुनिक प्रेमकथेला एक भावपूर्ण वळण देत, नीती यांनी हर्षिल व चैताली या जीवनसाथी जोडप्याला नुकताच एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या ‘शगना’ या नवीन गाण्याच्या माध्यमातून त्यांनी या जोडप्याच्या रोमॅण्टिक भेटीला संगीताची जोड दिली.
हर्षिलला विश्वासात घेऊन जीवनसाथी डॉटकॉम ने हा जादूई सोहळा मोठ्या कुशलतेने आयोजित केला आणि या रोमॅण्टिक संध्येला आश्चर्य व उत्स्फूर्तता यांचा स्पर्श झाला. या खऱ्याखुऱ्या व हृदयस्पर्शी धक्क्यामुळे चैताली नि:शब्द झाली. तिच्यासाठी हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील असा झाला.
जीवनसाथी डॉटकॉमच्या ईव्हीपी आणि मार्केटिंग विभागाच्या प्रमुख हिमानी बहुगुणा म्हणाल्या, “स्ट्रिंगऑफलव्ह’ हे आमच्या प्लॅटफॉर्मवर फुललेल्या असंख्य प्रेमकथांना केलेले वंदन आहे. आमच्या यूजर्सच्या आयुष्याचे जोडीदार शोधण्याच्या प्रवासातील भावनांना नीती यांचा ‘सरप्राइज परफॉर्मन्स’ खूपच पूरक आहे. प्रत्येक जोडप्याचे एकत्र येणे विशेष करणाऱ्या हे हृदयस्पर्शी क्षण साजरे करणे जीवनसाथी डॉटकॉमसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
नीती मोहन त्यांचा उत्साह व्यक्त करताना म्हणाल्या, “प्रेम आणि संगीत यांच्यात एक सुंदर नाते आहे. जीवनसाथीच्या स्ट्रिंग्सऑफलव्हबायजेएस अभियानात सहभागी झाल्यामुळे मला एका अनन्यसाधारण प्रेमकथेची साक्षीदार होता आले आणि त्यांच्या या विशेष क्षणाला स्वरांचा स्पर्श देण्याची संधी मिळाली. त्यांच्यातील प्रेम बघणे खऱ्या अर्थाने सुखद होते. चैताली आणि तिच्या जोडीदाराच्या आयुष्यात पुढेही असेच आनंदाचे क्षण येत राहोत अशा शुभेच्छा मी मनापासून देते.”
या भारावून टाकणाऱ्या सरप्राइजची छोटीशी झलक नीती मोहन यांच्या इन्स्टाग्राम व यूट्यूब हॅण्डल्सवर दाखवली जाणार आहे. त्यातून प्रेमाच्या सांगितिक उत्सवाचे क्षण सर्वांना बघता येतील. जीवनसाथी डॉटकॉम सातत्याने वैवाहिक अनुभवाला नवनवीन रूपे देत आहे आणि जोडप्यांच्या आनंददायी कहाण्यांवर प्रकाश टाकत आहे.