maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्‍लीअरट्रिपकडून बस श्रेणीमध्‍ये १५० टक्‍के वाढीची नोंद*

बेंगळुरू, १२ सप्‍टेंबर २०२४: क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने एप्रिल २०२३ मध्‍ये लॉंच केलेल्‍या बस श्रेणीमध्‍ये अद्वितीय १५० टक्‍के वाढीची नोंद केली. या प्रभावी वाढीमधून विशेषत: द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये बस प्रवासासाठी प्रबळ मागणी दिसून येते. या श्रेणीमधील संधीचा फायदा घेत क्‍लीअरट्रिपने इंडस्‍ट्री-फस्‍ट ऑफरिंग ‘बस पास’ लॉंच केले आहे, ज्‍यामुळे ग्राहकांसाठी बस प्रवास अधिक किफायतशीर होईल. ‘बस पास’ किफायतशीर सोल्‍यूशन आहे, ज्‍याचा बसमधून वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी बचत आणि सुधारित मूल्‍य-आधारित ऑफरिंग्‍ज देण्‍याचा मनसुबा आहे.

क्‍लीअरट्रिपवरील कंझ्युमर डेटामधून पुढील बाबी निदर्शनास आल्‍या:

बस श्रेणीमध्‍ये वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वोच्‍च आकडेवारी दिसण्‍यात आली, जेथे गेल्‍या ३ महिन्‍यांमध्‍ये ३२ टक्‍के वापरकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या बुकिंग्‍जची पुनरावृत्ती केली आहे.
तीन महिन्‍यांमध्‍ये १५ टक्‍के वापरकर्त्‍यांनी किमान तीन वेळा बुकिंग केले.
बस युजर्स बचत करण्‍याप्रती अत्‍यंत जागरूक आहे, जेथे ७५ टक्‍के प्रवाशांनी बुकिंग करताना डिस्‍काऊंट कूपन्‍सचा वापर केला.
इंदौर-भोपाळ, बेंगळुरू-हैदराबाद, इंदौर-पुणे, चेन्‍नई-मदुराई आणि कोईम्‍बतूर-बेंगळुरू हे सर्वोच्‍च रिपीट बुकिंग्‍जसह अव्‍वल मार्ग आहेत.
ग्राहक बस बुकिंग करताना १५० रूपयांच्‍या शुल्‍कामध्‍ये बस पास खरेदी करू शकतात. बस पासचे फायदे पुढीलप्रमाणे:

ग्राहकांना किमान ३०० रूपयांच्‍या ऑर्डर मूल्‍यासाठी विद्यमान बुकिंगवर त्‍वरित १०० रूपये सूटचा (इतर कूपन्‍सचा लाभ घेण्‍यासोबत) आनंद घेऊ शकतात.
एका बस पाससह ग्राहक या सवलतीच्‍या दरामध्‍ये अधिकतम ५ बुकिंग्‍ज करू शकतात.
ग्राहक एका बस पाससह ५०० रूपयांच्‍या बचतीचा आनंद घेऊ शकतात.
प्रत्‍येक बस पास खरेदीच्‍या तारखेपासून ९० दिवसांसाठी वैध आहे.
क्‍लीअरट्रिपचे चीफ बिझनेस अँड ग्रोथ ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, ”गेल्‍या वर्षभरात क्‍लीअरट्रिपच्‍या बस श्रेणीने उल्‍लेखनीय १५० टक्‍के वाढीची नोंद केली आहे, ज्‍यामधून या श्रेणीमधील वाढती ग्राहक मागणी दिसून येते. आम्‍ही सखोल बाजारपेठ संशोधनाचे पाठबळ असलेली उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जी ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करतात. क्‍लीअरट्रिप ‘बस पास’ वापरकर्त्‍यांना अद्वितीय मूल्‍य आणि सोयीसुविधा देईल. आमचा प्रवास किफायतशीर करण्‍यासोबत विश्‍वसनीय प्रवास सहयोगी म्‍हणून आमचे स्‍थान प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.”

क्‍लीअरट्रिप आपल्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये विविधता आणण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि नुकतेच फ्लिपकार्टवर देखील बस सर्विस लाँच केली आहे.

Related posts

सॅमसंगने भारतात सॅमसंग वॉलेटमध्‍ये ट्रॅव्‍हल व एंटरटेन्‍मेंट सेवांची भर करण्‍यासाठी पेटीएमसोबत सहयोग केला

Shivani Shetty

इझे चे ट्रैवल-साइज़ परफ्यूम्स लाँच

Shivani Shetty

द बॉडी शॉपने विशेष फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन लाँच केले

Shivani Shetty

Leave a Comment