maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह परत एकदा चाहत्यांची आवडती फ्रँचायजी ‘सीक्रेटस’ सोबत एकत्र येणार: ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’

मुंबई, 18 जानेवारी 2024: गौतम बुद्धांच्या अमर दृष्टीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे व काळाच्या चाकोरीवर मात करून तो संदेश आजही तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे. परंतु, गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत. ह्या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी सीक्रेट फ्रँचायजीच्या तिस-या भागासह परत आले आहे – ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,’ डिस्कव्हरी+ वर 22 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होईल व डिस्कव्हरी चॅनलवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होईल. नीरज पांडे व फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेल्या व वैविध्यपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व पद्मश्री पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी ह्या डॉक्युमेंटरीला हॉस्ट करेल व त्यामध्ये दर्शकांना बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल नवीन माहिती मिळेल.

सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्सबद्दल बोलताना कलाकार मनोज वाजपेयी ह्यांनी म्हंटले, “सीक्रेटस फ्रँचायजीसाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबत माझी भागीदारी पुढे नेताना मला अतिशय आनंद होत आहे. नीरज पांडेंसोबत काम करणे हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो व डॉक्युमेंटरीला वेगळा आकार देणा-या गोष्टी त्यांच्याकडून नेहमीच मिळतात. ही डॉक्युमेंटरी दर्शकांना नक्कीच बुद्धांच्या काळात घेऊन जाईल आणि त्यांचे जीवन व शिकवण ज्या काळात होती, त्या ऐतिहासिक काळाचे दर्शन घडवेल. आपल्या अध्यात्मिक वारशाला आकार देण्यामध्ये ज्या खोलवरच्या कहाण्यांनी योगदान दिले आहे, त्यांच्यासोबतही दर्शकांना जोडले जाण्याचे उद्दिष्ट ह्यात साध्य होईल.”
शोजचे निर्माता नीरज पांडे ह्यांची निर्मिती असलेल्या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये गौतम बुद्धांच्या शेवटच्या दिवसांभोवती असलेल्या रहस्यांना व आधुनिक काळात बौद्ध धर्मामध्ये केंद्रस्थानी असलेल्या असलेल्या अवशेषांच्या रहस्याला उलगडले जाईल. त्यामध्ये ह्या अवशेषांच्या मागे असलेले त्यांचे मूळ, सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामागे असलेल्या अध्यात्मिक कहाण्या ह्यांचा शोध घेतला जाईल आणि जगभरात त्यांचा झालेला प्रसार व बौद्ध धर्माला जगातील चौथा सर्वांत मोठा संप्रदाय बनवण्यामध्ये त्यांची भुमिका ह्याचाही शोध घेतला जाईल. अवशेषांविषयी अधिक खोलवर जाऊन त्यांचे वर्गीकरण शोधणा-या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये बौद्ध धर्मातील त्यांच्या भुमिकेला व्यापक प्रकारे लक्षात घेण्यासाठी ऐतिहासिक व पौराणिक दृष्टीकोनांना एकत्रि प्रकारे बघितले जाईल.
वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे दक्षिण आशियातील फॅक्च्युअल अँड लाईफ स्टाईल क्लस्टरचे प्रमुख साई अभिषेक, ह्यांनी म्हंटले, “वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीमध्ये आम्ही इतिहास प्रकाराला पुढे नेणे सुरू ठेवत आहोत व ‘सीक्रेटस’ फ्रँचायजी ही सर्वाधिक आवडली गेलेली व यशस्वी झालेली मालिका ठरली आहे. तिस-या आवृत्तीमध्ये ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’ द्वारे आम्ही ह्या अवशेषांबद्दल कमी माहिती असलेल्या बाबींचा शोध घेणार आहोत व आजच्या काळात असलेल्या त्यांच्या महत्त्वाबद्दल माहिती देणार आहोत. नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी ह्या दोन्ही‌ दिग्गज कथाकारांसोबतची आमची भागीदारी ही थरारक कहाणी सादर करण्याबद्दल आमची कटिबद्धता दर्शवते. ‘सीक्रेटस’ फ्रँचायजीच्या यशामुळे खूप मोठी क्षमता समोर आलेली आहे व ह्या प्लॅटफॉर्मवर आमच्या इतिहास प्रकाराचा आम्ही विस्तार करत आहोत व आमच्या दर्शकांना थरारक व खिळवून ठेवणा-या कहाण्या सादर करणार आहोत.
ह्या डॉक्युमेंटरीमध्ये वैविध्यपूर्ण असे विशेषज्ञांचे पॅनल माहिती देईल व त्यामध्ये विचारवंत, बौद्ध धर्माचे अनुयायी, इतिहासकार व पुरातत्त्व शास्त्रज्ञ असतील. चित्रपट निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (पद्मश्री पुरस्कार विजेते), डॉ. बी. आर. मणी (नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयाचे संचालक), डॉ. तिष्यारक्षिता भार्गव (एसएसपी युनिव्हर्सिटी पुणे येथील मानववंश शास्त्र विभागातील वरिष्ठ संशोधक सहाय्यक), डॉ. गुरूबक्ष सिंह (इंटरनॅशनल बुद्धीस्ट एक्स्चेंज सेंटरचे माजी संशोधक), श्री. तरित कान्ती रॉय (कोलकातामधील महा बोधी सोसायटी ऑफ इंडियाचे नियामक समिती सदस्य) , डॉ. हेल ओ नील (स्कॉटलंडमधील एडिंबरा बुद्धीस्ट स्टडीज युनिव्हर्सिटीज, एडिंबराचे सह- संचालक) आणि डॉ. अनील कुमार (शांतीनिकेतनमधील विश्व भारतीचे प्राचीन भारतीय इतिहास- संस्कृती व पुरातत्त्वशास्त्राचे प्रमुख) असे प्रसिद्ध वक्ते ह्या विषयावर आपली मते प्रेक्षकांपुढे ठेवतील. थरारक प्रकारे सांगितली जाणारी कहाणी व क्रिएटीव्ह स्वरूपामुळे ह्या डॉक्युमेंटरीमुळे प्रेक्षक खोलवर प्रभावित होतील.
दिग्दर्शक राघव जयरथ ह्यांनी म्हंटले, “व्यापक संशोधनानंतर आम्ही गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या शेवटच्या दिवसाबद्दलच्या प्रश्नांबद्दल व अवशेषांच्या उद्देशामागे असलेल्या व त्यांच्या शिकवणुकीच्या झालेल्या खोलवरच्या परिणामांशी संबंधित रोचक बाबींचा शोध घेतला आहे. आमच्या संशोधन टीमच्या व ह्या विषयातील विशेषज्ञांच्या सहाय्यासह झालेल्या ह्या मांडणीमध्ये आम्ही बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाला खोलवर जाऊन शोधण्याचा व अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”
“पहिल्या दोन ‘सीक्रेटस’ मालिकांच्या यशामुळे आम्हांला बौद्ध धर्मातील अध्यात्मिक व सांस्कृतिक घटकांचा आणखी शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. वॉर्नर ब्रदर्स‌ डिस्कव्हरीसोबतच्या आमच्या ह्या भागीदारीमुळे आम्ही अधिक मोठ्या, अधिक चांगल्या व अधिक धाडसी कहाण्या समोर माडू शकतो. मनोज सरांसोबत काम करणे अतिशय आनंददायक असते, कारण ते त्यांच्या अनुभवासह कहाणी मांडण्याला आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.” – राघव ह्यांनी म्हंटले.

मनोज वाजयेपी ह्यांनी हॉस्ट केलेली “सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स” डिस्कव्हरी+ वर 22 जानेवारी 2024 रोजी आणि डिस्कव्हरी चॅनलवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल.
ट्रेलरची लिंक – https://youtu.be/oOylgDByFaQ?

Related posts

मुंबई भारतातील टॉप टेक पदांसाठी सर्वाधिक वेतन देणारे ५वे शहर ठरले: टीमलीज डिजिटल

Shivani Shetty

ज्‍युलिओची २.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

Shivani Shetty

लेवरेज एड्युद्वारे १५०,००० डॉलर्सची स्‍कॉलरशिप्‍स

Shivani Shetty

Leave a Comment