मुंबई, सप्टेंबर, २०२४: टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स प्रदाता व टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या उपकंपनीने आज भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्याची घोषणा केली. या सहयोगांतर्गत मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता अशा सर्व मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी २०० फास्ट-चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. हे धोरणात्मक पाऊल शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करण्यामध्ये त्यांच्या सुरू असलेल्या सहयोगाला विस्तारित करते, जेथे लघु इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी सुलभ चार्जिंग सोल्यूशन्स देण्यावर लक्ष केंद्रित आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून, टाटा मोटर्स व टाटा पॉवर टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक सीव्ही मालकांना विशेष चार्जिंग टेरिफ्स देतील, ज्यामुळे ग्राहकांसाठी कार्यसंचालन खर्च कमी होण्यासह फायदा वाढेल. देशभरातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन वापरकर्त्यांना लवकरच जवळपास १००० धोरणात्मकरित्या स्थित फास्ट चार्जर्स उपलब्ध होतील, तसेच चार्जिंग नेटवर्कचे विस्तारीकरण करण्याची योजना देखील आहे.
टाटा मोटर्सच्या एससीव्हीअॅण्डपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. विनय पाठक म्हणाले, ”आम्हाला देशभरात सोईस्कर ठिकाणी फास्ट चार्जर्स उपलब्ध करून देत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्यासाठी टाटा पॉवरसोबतच्या आमच्या सहयोगाला अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे. आमचा जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने डिझाइन व उत्पादित करण्यासोबत या इको-फ्रेण्डली व उत्सर्जन-मुक्त वाहनांचा वापर अधिक वाढवण्याकरिता आवश्यक इकोसिस्टम विकसित करण्यास मदत करण्याचा देखील प्रयत्न आहे. हा सहयोग इलेक्ट्रिक वाहन कार्यसंचालनांना हरित करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणाऱ्या मार्गांचा शोध देखील घेईल.”
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपेश नंदा म्हणाले, ”देशातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क टाटा पॉवर देशभरातील आपल्या विश्वसनीय आणि उपलब्ध होण्याजोग्या चार्जिंग सोल्यूशन्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन मालकांना सक्षम करत आहे. सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक, बस/ताफा व होम चार्जर्स अशा विविध विभागांमध्ये उपस्थिती असण्यासह आम्ही व्यावसायिक वाहन चार्जिंग विभाग विस्तारित आहोत, एकीकृत ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स वितरित करत आहोत. या सहयोगामधून भारतभरात व्यापक व विश्वसनीय ईव्ही चार्जिंग नेटवर्क देत ई-मोबिलिटीला गती देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
टाटा पॉवरने ईझी चार्ज ब्रँड नावांतर्गत आपले नेटवर्क ५३० शहरे व नगरांमध्ये १,००,००० हून अधिक होम चार्जर्स, ५,५०० हून अधिक सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक व ताफा चार्जिंग पॉइण्ट्सपर्यंत, तसेच ११०० हून अधिक बस चार्जिंग स्टेशन्सपर्यंत वाढवले आहे. हे चार्जर्स महामार्ग, हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स, कार्यालये, निवासी संकुल इत्यादी यांसारख्या विविध व उपलब्ध होण्याजोग्या ठिकाणी धोरणात्मकरित्या तैनात करण्यात आले आहेत. या सहयोगात्मक प्रयत्नामुळे भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या अपवादात्मक वाढीला चालना देण्यास मदत झाली आहे.
टाटा मोटर्स भारतातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक लघु व्यावसायिक वाहन एस ईव्ही देते, जिला देशभरातील १५० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल सर्विस सेंटर्सचे पाठबळ आहे. एस ईव्हीमध्ये प्रगत बॅटरी व्यवस्थापन सिस्टम व ‘फ्लीट एज’ टेलिमॅटिक्स, वेईकल अपटाइम व रस्त्यावरील सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञान आहे, तसेच वेईकल स्थिती, हेल्थ, लोकेशन आणि ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग वर्तणूकीबाबत रिअल-टाइम माहिती मिळते.
previous post