maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोस्‍टा कॉफीकडून शरद ऋतूमधील बेस्‍ट-केप्‍ट सिक्रेट ‘मॅपल हेझल’ मेनू लाँच

भारत, सप्‍टेंबर २०२४: कोस्‍टा कॉफी या कोका-कोला कंपनी अंतर्गत असलेल्‍या कॉफी ब्रँडने भारतात शरद ऋतूमधील सर्वोत्तम सिक्रेट नवीन ‘मॅपल हेझल’ मेनू लाँच केले आहे. शरद ऋतूमध्‍ये सर्वत्र सोनेरी ट्रेपेस्‍ट्री पसरण्‍यासह निसर्ग लाल व अंबर रंगसंगतींमध्‍ये उजळून दिसत असताना कोस्‍टा कॉफी मॅपल हेझल लॅट्टे, आइस्‍ड लॅट्टे आणि फ्रॅप्‍पे या ३ विशिष्‍ट फ्लेवर्सच्‍या माध्‍यमातून आल्‍हाददायी आस्‍वाद देत आहे. या लॉंचमधून कोस्‍टा कॉफीची ऑफरिंग्‍ज व हंगामी फ्लेवर्सचा दर्जा, नाविन्‍यता आणि वैविध्‍यप्रती कटिबद्धता दिसून येते, जेथे हे फ्लेवर्स भारतातील कॉफीप्रेमींना अद्वितीय आस्‍वादाचा अनुभव देतात.

शरद ऋतूच्‍या उत्‍साहाला व्‍यापून घेणाऱ्या अद्वितीय स्‍वादाच्‍या अनुभवासह ही पेये थंडावा व हंगामी उत्‍साहाचा आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. मॅपल हेझल लॅट्टेमध्‍ये समृद्ध हेझलनट आणि गोड मॅपल सिरपचा समावेश आहे, तर मॅपल हेझल आइस्‍ड लॅट्टे कूल, उत्‍साहवर्धक आस्‍वाद देते. फ्रॉस्‍टी ट्रीटची आवड असलेल्‍यांसाठी मॅपल हेझल फ्रॅप्‍पे क्रीमी, थंडगार स्‍वरूपात हंगामी फ्लेवर्सचे उत्‍साहवर्धक मिश्रण देते. भारतात मॅपल हेझलच्‍या लॉंचमधून बदलत असलेली कॉफी संस्‍कृती, तसेच हंगामी फ्लेवर्सची वाढती लोकप्रियता दिसून येते. हे लॉंच अद्वितीय व कलात्‍मक कॉफी अनुभवांच्‍या वाढत्‍या ट्रेण्‍डशी संलग्‍न आहे, ज्‍यामधून जगभरात अधिक वैयक्तिकृत व वैविध्‍यपूर्ण कॉफी ऑफरिंग्‍जप्रती बदलती आवड दिसून येते.
भारतातील बाजारपेठेत कोस्‍टाचे स्‍वादिष्‍ट सिक्रेट लॉंच करत कोस्‍टा कॉफीचे भारतातील व इमर्जिंग मार्केट्समधील जनरल मॅनेजर विनय नायर म्‍हणाले, ”आम्‍हाला यंदा शरद ऋतूमध्‍ये भारतात आमच्‍या मॅपल हेझल मेनूचा उत्‍साह आणि मोहकता सादर करण्‍याचा आनंद होत आहे. हे लॉंच ताज्‍या हंगामी ट्विस्‍टचा अनुभव देते, जेथे उत्‍साहवर्धक आस्‍वादाचा समावेश असलेल्‍या ऑंटम फ्लेवर्सच्‍या जागतिक ट्रेण्‍डला साजरे केले जात आहे. कोस्‍टा कॉफीमध्‍ये आम्‍ही हंगामी अनुभव डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहोत, जे व्‍यक्‍तींना एकत्र आणतात. आम्‍ही आशा करतो की आमच्‍या मॅपल हेझल कॉफी शरद ऋतूमधील उत्‍साहवर्धक दिवस आणि आरामदायी क्षणांसाठी परिपूर्ण सोबती बनतील.”
कोस्‍टा कॉफीला सर्वोत्तम दर्जाची काफी तयार करण्‍यामध्‍ये ५० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कोस्‍टा कॉफीने समृद्ध फ्लेवर आणि स्‍वादिष्‍ट आस्‍वादासह भारतात क्रांती घडवून आणणे सुरू ठेवले आहे. ब्रँड इनोव्हेशनच्‍या आधारावर आपली उपस्थिती वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित सक्रियपणे फूटप्रिंट वाढवत आहे, तसेच भारतातील बदलत असलेल्‍या कॉफीचा आस्‍वाद घेण्‍याच्‍या गरजांची पूर्तता करत आहे. नवीन मॅपल हेझल मेनू आता तुमच्‍या जवळच्‍या कोस्‍टा कॉफी आऊटलेटमध्‍ये किंवा ऑनलाइन https://www.costacoffee.in/ येथे ऑर्डरसाठी उपलब्‍ध आहे.

Related posts

Mobil 1 50वीं वर्षगांठ: आगे के लिए तैयार

Shivani Shetty

केकाकडून भारतातील सर्वात मोठ्या व्‍हर्च्‍युअल एचआर परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment