maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फ्लिपकार्टचा वार्षिक इव्‍हेण्‍ट ‘द बिग बिलियन डेज’ आता क्‍लीअरट्रिपवर देखील उपलब्‍ध असणार


*बेंगळुरू, 4 ऑक्‍टोबर २०२३:* सणासुदीचा काळ जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी वर्षातील सर्वात मोठ्या ट्रॅव्‍हल महोत्‍सवासाठी सज्‍ज आहे. क्‍लीअरट्रिप आपल्‍या व्‍यासपीठावर ८ ते १५ ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत फ्लिपकार्टचा प्रमुख इव्‍हेण्‍ट ‘द बिग बिलियन डेज’ (टीबीबीडी) घेऊन येत आहे (क्‍लीअरट्रिपवर ७ ऑक्‍टोबर २०२३ पासून सेलला सुरूवात). ग्राहकांना मूल्‍य व किफायतशीरपणा देण्‍याच्‍या उद्देशासह यंदाचा टीबीबीडी क्‍लीअरट्रिपवरील (Cleartrip) व्‍यवसाय श्रेणींमध्‍ये अभूतपूर्व ऑफर्स सादर करेल.

फ्लिपकार्टच्‍या यंदाच्‍या टीबीबीडी एडिशनमध्‍ये श्रेणींमधील आकर्षक वैशिष्‍ट्ये पाहायला मिळतील. क्‍लीअरट्रिपने आपल्‍या व्‍यासपीठावरील युजर अनुभवामध्‍ये बदल केला आहे. विशेषत: सणासुदीच्‍या काळात होत असलेल्‍या उच्‍च मागणीमुळे अपवादात्‍मक ग्राहक अनुभवाप्रती कटिबद्धतेमधून हा बदल करण्‍यात आला. या परिवर्तनामध्‍ये किंमत पर्याय व सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये वाढवण्‍यावर भर देण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना बुकिंग प्रक्रियेदरम्‍यान योग्‍य निर्णय घेता येईल.

आमच्‍यासोबत व्‍यवहार करताना ग्राहकांच्‍या अनुभवामध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी, तसेच सेल्‍फ-सर्विसला चालना देण्‍यासाठी सिस्‍टममध्‍ये अनेक सुधारणा करण्यात आल्‍या आहेत. ग्राहकाच्‍या समस्‍येचे ऑनलाइन निराकरण झाले नाही तर तो/ती कॉलबॅकची विनंती करू शकतो/शकते. समस्‍येचे त्‍वरित निराकरण करण्‍याच्‍या उद्देशाने कॉलवर व सोशल मीडियावर (ट्विटर/फेसबुक) २४/७ तास सपोर्ट उपलब्‍ध करून देण्‍याकरिता प्रक्रियेमध्‍ये नवीन बदल करण्‍यात आले आहेत. तसेच, ग्राहकांच्‍या कॉल्‍सना ३० सेकंदांच्‍या आत प्रतिसाद देण्‍यात येईल आणि ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ कॉल्‍स प्रतिक्षेत राहिल्‍यास ग्राहकांसाठी लाइव्‍ह चॅट पर्याय कार्यान्वित होईल.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अय्यप्‍पन म्‍हणाले, ”क्‍ली‍अरट्रिपमध्‍ये मूल्‍य, किफायतशीरपणा व पारदर्शकता ही ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याची तत्त्वे आहेत. सणासुदीचा काळ आमच्‍या संपूर्ण ट्रॅव्‍हल इकोसिस्‍टमसाठी अत्‍यंत महत्त्वाचा कालावधी असतो. टीबीबीडीदरम्‍यान आमच्‍या अद्वितीय डिल्‍ससह आमचा भारतीयांच्‍या प्रवास करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही अद्वितीय तत्त्वे – कॅन्‍सल फॉर नो रिजन, सीटी फ्लेक्‍समॅक्‍स, नो-कॉस्‍ट ईएमआय, मेडि-कॅन्‍सल आणि बाय नाऊ पे लेटर यांसह ग्राहकांच्‍या समस्‍यांचे निराकरण करत राहू. सणासुदीच्‍या काळादरम्‍यान किमतींमध्‍ये वाढ होत असताना देखील प्रत्‍येक उत्‍पादन वापरकर्त्‍यांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स व बसेससाठी सर्वोत्तम दर प्रदान करेल.”

ते पुढे म्‍हणाले, ”आम्‍हाला द बिग बिलियन डेज २०२३ सह फ्लिपकार्टचा मूल्‍य व नाविन्‍यता वितरित करण्‍याचा वारसा सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. तसेच आम्‍ही इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ऑफरिंग्‍ज आणि वैयक्तिकृत युजर अनुभवासह ट्रॅव्‍हलचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या आमच्‍या महत्त्‍वाकांक्षेच्‍या दिशेने वाटचालचा करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

काही प्रमुख ऑफर्स पुढीलप्रमाणे:

तत्‍काल: दुपारी १२ वाजेपर्यंत डेअली लिमिटेड पीरियड ऑफर (उपलब्‍धतेनुसार)

1. विमानभाडे: ९९९ रूपयांपासून देशांतर्गत विमानभाडे आणि ५९९९ रूपयांपासून आंतरराष्‍ट्रीय विमानभाडे

2. हॉटेल्‍स: देशांतर्गत हॉटेल्‍सवर ५० टक्‍के सूट

चाइल्‍ड फाइल्‍स फ्री: दररोज सायंकाळी ७ वाजता लिमिटेड पीरियड ऑफरदरम्‍यान बुक करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक २ अडल्‍ट तिकिटांसाठी १ चाइल्‍ड तिकिट मोफत (१२ वर्षांखालील मुलांसाठी)

सीटी फ्लेक्‍समॅक्‍स: फक्‍त ४४९ रूपयांमध्‍ये तुमच्‍या फ्लाइट्स कॅन्‍सल करा किंवा त्‍यामध्‍ये बदल करा.

हॉटेल भाडे: २४९९ रूपयांपासून सुरू होणारे ५-स्‍टार हॉटेल्‍स (देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय)

कॅन्‍सल फॉर नो रिजन: विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये चेक-इन पर्यत हॉटेल बुकिंग्‍ज रद्द करा आणि जवळपास २५,००० रूपयांचा संपूर्ण रिफंड मिळवा.

अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड बेनीफिट्स: या सहयोगांतर्गत अॅक्सिस बँक केडिट कार्ड ग्राहक विशेष फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, जसे मोफत सीट्स, भोजन, सुविधा शुल्‍कमध्‍ये सूट आणि सीटी फ्लेक्‍समॅक्‍स अंतर्गत फक्‍त १ रूपयामध्‍ये फ्लाइट मोडिफिकेशन व कॅन्‍सलेशन.
वरील ऑफर्सचा लाभ घेण्‍यापूर्वी आणि आमच्‍या व्‍यासपीठावर बुकिंग करण्‍यापूर्वी कृपया सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा.
टीबीबीडी २०२३ जवळ येत असताना प्रवासाच्‍या उत्‍साहवर्धक युगाची सुरूवात होत आहे, ज्‍यामध्‍ये सुधारित उपलब्‍धता, स्थिरता व उत्‍साहाचा समावेश आहे.

Related posts

स्‍टडी ग्रुपने उत्तर अमेरिकन शिक्षण संधींसह भारतीय विद्यार्थ्‍यांना सक्षम केले

Shivani Shetty

माता-बाल स्वास्थासाठी ‘झी-स्नेहा’ चा एकत्रित उपक्रम

Shivani Shetty

जागतिक दर्जाच्या आरोग्‍यसेवा शिक्षणाकरिता ओसी अकॅडमीचा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment