maharashtraprimenews
ठळक बातम्या
New productsठळक बातम्यामुंबई

ॲडव्हर्ब तर्फे लॉजिमॅट इंडिया २०२५ मध्ये क्रांतिकारी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन साल्युशन्सची भारतात सुरुवात- भारतातील सर्वांत मोठा क्वाड्रूपेड- ट्रॅकर २.० सह ब्रिस्क आणि एचओसीए चा समावेश

भारत, १८ फेब्रुवारी ,२०२५- ॲडव्हर्ब या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन उपाय प्रदान करणार्‍या जगभरातील आघाडीच्या कंपनी तर्फे त्यांच्या मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे
१३-१५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या प्रदर्शना मध्ये तीन अत्याधुनिक उत्पादनांची सुरुवात करण्याची घोषणा केली. या सुरुवातीमध्ये भारतातील पहिल्या सर्वांत मोठ्या असिस्टिव्ह डॉग रोबोट – ट्रॅकर २.० सह हाय ऑर्डर कॅरोसेल ऑटोमेशन सिस्टम -एचओसीए आणि सर्वसमावेशक युझर इंटरफेस- ब्रिस्क ची सुरुवात केली आहे. या सर्व उत्पादनांचे डिझाईन हे नाविन्यपूर्ण अशा वैशिष्ट्यांसह क्रांतिकारी पध्दतीने वेअरहाऊसिंगची कार्यक्षमता अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि विविध क्षेत्रांच्या व्यवसायांसाठी करण्यात आले आहे.

या सुरुवाती विषयी बोलतांना ॲडव्हर्ब चे सह संस्थापक आणि सीईओ श्री. संगीत कुमार यांनी सांगितले “ लॉजीमॅट इंडिया २०२५ मध्ये ट्रॅकर २.०, एचओसीए आणि ब्रिस्कचे पदार्पण हे आमच्या नाविन्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गेल्या वर्षी ट्रॅकरला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आंम्हाला ट्रॅकर २.० या त्याच्या पेक्षा शक्तीशाली आणि अधिक दृष्यमानतेसह जेस्चर वर आधारीत नियंत्रण असलेल्या व्हर्जनला तयार करण्यास प्रोत्साहन मिळाले. या उत्पादना बरोबरच आमचे दोन नाविन्यपूर्ण उपाय एचओसीए आणि ब्रिस्क ची निर्मिती ही आधुनिक वेअरहाऊसिंगच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असून यामध्ये अजोड कार्यक्षमता, अचूकता आणि अनुकूलता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲडव्हर्ब मध्ये आंम्हाला अभिमान वाटतो की आमच्या या नाविन्यामुळे कार्यक्षमतेमध्ये नवीन आयाम निर्माण होण्याबरोबरच जागे सह कार्यालयातील कार्यक्षमते मध्ये नवीन संकल्पना निर्माण झाल्या आहेत.”
• ट्रॅकर २.० , एक अत्याधुनिक क्वाड्रूपेड रोबोट, असून हा बहुआयामी रोबोट २० किलो पर्यंतचे पेलोड्स वाहून नेण्यास सक्षम आहे. ९० मिनिटांची बॅटरी क्षमता, अधिक दृष्यमानतेसह स्टिरिओ कॅमेराज आणि जेस्चर वर आधारीत कमांड्सची क्षमता या वैशिष्ट्यांनी युक्त हा क्वॉड्रूपेड रोबोट असून मटेरिअल हॅन्डलिंगच्या कामासाठी अतिशय अत्याधुनिक आणि युझर फ्रेन्डली आहे.
• एचओसीए, एक अत्याधुनिक हाय स्पीड ऑर्डर कन्सॉलिडेशन आणि ऑटोमेशन सिस्टम असून ही पध्‌दती अत्याधुनिक बॅच ओळखण्याची क्षमता, जागेचा अधिकत उपयो आणि कार्यातील लवचिकता उपलब्ध करते. एचओसीए पध्दती मध्ये वैविध्यपूर्ण कॉरोसेल चा आकार हा ५९०० मिमी पासून ते ४६,७०० मिमी पर्यंत आहे. यामध्ये विविध कॅरियर पर्याय असून याची क्षमता ही ५० टनांपर्यंत पेलोड वाहून नेण्याची आहे आणि अधिकतर पे लोड हे ६८०किलो प्रती कॅरियर आहे. याच्या मॉड्युलर डिझाईन मुळे याचा उपयोग विविध वेअरहाऊस सेटप्स नुसार बदलता येतो, जेणेकरुन कोणत्याही प्रमाणात याचा वापर करता येतो.
• ब्रिस्क, एक युझर फ्रेन्डली इंटरफेस असून याचे डिझाईन सुधारीत सामान उचलण्याची प्रक्रिया नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये जेस्चर बेस्ड तंत्रज्ञान आणि ग्लोव्ह वर आधारीत ईएएन स्कॅनिंगचा समावेश आहे. ब्रिस्क मधील इंट्युटिव्ह इंटरफेस मुळे विविध प्रकाशातील वातावरणात काम होऊन विविध वेअरहाऊस मधील परिस्थितीनुसार काम करण्याची क्षमता प्राप्त होते.
या नवीन उत्पादने आणि उपायांच्या सुरुवाती मुळे आता ॲडव्हर्ब रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्राच्या भविष्यातील आघाडीसाठी तयार आहे. या उपायांची निर्मिती ही औद्योगिक आणि व्यावसायिक कामांसाठी करण्यात आली असून यामुळे उद्योग जगतातील कामाच्या पध्दतीत मोठा बदल घडणार आहे. अगदी इंटेलिजेंट वेअरहाऊस सिस्टम पासून ते क्वाड्रूपेडचे वाहतूक आणि सुरक्षेसाठी च्या उपकरणातील पदार्पणा मुळे ॲडव्हर्ब ने मोठी महत्त्वपूर्ण घटना पार केली असून २०२५ मध्ये पहिला ह्युमनॉईड रोबोच्या सुरुवातीची योजना सुध्दा आखली आहे.

ॲडव्हर्बच्या गुणवत्ते संदर्भातील अजोड वचनबध्दते मुळे मोठ्या प्रतिथयश ग्राहकांची सूची निर्माण झाली असून यांत, रिलायन्स, एचयूएल, पेप्सीको, मर्स्क, माँडियाल रिले, डीएचएल आणि लँडमार्क यांचा समावेश आहे, यांतून हे बदलात्मक ऑटोमेशन उपाय देण्या विषयचे नांव अधोरेखित होते. यूएस, युरोप आणि एशिया मध्ये कामकाज करणार्‍या ॲडव्हर्ब तर्फे आता रोबोटिक्स क्षेत्रात बदल करुन भारतातील ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांचा अंगिकार करुन देशाला जागतिक रोबोटिक्स आणि उत्पादन क्षेत्रातील आघाडी वाढवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Related posts

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा*

Shivani Shetty

भास्कर जाधवांच्या मुलाचा पोलिसांवर गंभीर आरोप, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

cradmin

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते रहदारी संबंधित माहिती तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

Shivani Shetty

Leave a Comment