maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून स्‍मार्ट कूलिंगला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या एआय वैशिष्‍ट्यांनी युक्‍त बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर सिरीज लाँच

गुरूग्राम, भारत – १८ फेब्रुवारी २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ३३० लिटर व ३५० लिटर क्षमतेच्‍या श्रेणीमधील नवीन बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर सिरीज लाँच केली. या नवीन श्रेणीमध्‍ये एआय एनर्जी मोड, एआय होम केअर व स्‍मार्ट फॉरवर्ड यांसारख्‍या प्रगत एआय-संचालित वैशिष्‍ट्यांसोबत आकर्षक डिझाइन्‍स आणि वैविध्‍यपूर्ण स्‍टोरेज पर्याय आहेत. भारतातील ग्राहकांच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्‍याचा मनसुबा असलेली ही सिरीज कार्यक्षमता, स्‍टाइल आणि नाविन्‍यतेचे सुसंगत एकत्रिकरण देते.

 

नवीन बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्समध्‍ये स्‍मार्ट एनर्जी मॅनेजमेंट, सुधारित फ्रेशनेस रिटेशन आणि अॅक्टिव्‍ह फ्रेश फिल्‍टर आहे, जे जवळपास ९९.९ टक्‍के घातक जीवाणूंना दूर करते. ही सर्व वैशिष्‍ट्ये स्‍लीक व कस्टमायझेबल एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये आहेत. टिकाऊ व ऊर्जा-कार्यक्षम डिजिटल इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर, २० वर्षांची वॉरंटी असलेली ही सिरीज भारतातील आधुनिक रेफ्रिजरेशनला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे.

 

“आमची बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर सिरीज ग्राहकांना तंत्रज्ञान, डिझाइन व सोयीसुविधेचे परिपूर्ण संतुलन देते. एआय-सचांलित एनर्जी ऑप्टिमायझेशनपासून नाविन्‍यपूर्ण कूलिंग व हायजिन सोल्‍यूशन्‍सपर्यंत ही सिरीज भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावशेक जीवनशैलीची पूर्तता करते. स्‍टायलिश फिनिशेस् आणि स्‍मार्ट फॉरवर्ड, एआय होम केअर, ट्विन कूलिंग प्‍लस™ व कन्‍वर्टिबल ५-इन-१ मोड्स अशा वैशिष्‍ट्यांसह आमचा ग्राहकांना दैनंदिन राहणीमान परिभाषित करणाऱ्या अप्‍लायन्‍सेससह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसचे वरिष्‍ठ संचालक गुफरान आलम म्‍हणाले.

 

डिझाइन, क्षमता, किंमत आणि उपलब्‍धता

रिअल स्‍टेनलेस, ल्‍यूक्‍स ब्‍लॅक, एलीगण्‍ट आयनॉक्‍स आणि ब्‍लॅक मॅट या रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे रेफ्रिजरेटर्स समकालीन घरांच्‍या इंटीरिअर्समध्‍ये विनासायासपणे एकीकृत होण्‍यासाठी ३३० लिटर आणि ३५० लिटर क्षमतांमध्‍ये डिझाइन करण्‍यात आले आहेत. यामुळे विविध कुटुंबाच्‍या गरजांची पूर्तता होते. हे रेफ्रिजरेटर्स आघाडीचे रिटेल स्‍टोअर्स, ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍स आणि सॅमसंगच्‍या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्‍ध आहेत.

 

एआय एनर्जी मोड:

एआय एनर्जी मोड रेफ्रिजरेटरच्‍या वापर पद्धतींचे विश्‍लेषण करत ऊर्जा वापर सानुकूल करण्‍यासाठी प्रगत एआय अल्‍गोरिदम्‍सचा वापर करते. ही इंटेलिजण्‍ट सिस्‍टम सर्वाधिक व कमी वापराच्‍या वेळेला ओळखते, जवळपास १०० टक्‍के ऊर्जा बचत करण्‍यासाठी ऊर्जा आवश्‍यकतांचे समायोजन करते. अनावश्‍यक ऊर्जा वापर कमी करत कुटुंबांसाठी बचतीची खात्री देण्‍यासोबत कार्बन फूटप्रिंट्स कमी करत शाश्‍वत राहणीमानाला पाठिंबा देखील देते. हे वैशिष्‍ट्य विशेषत: कार्यक्षमता व जबाबदारीमध्‍ये संतुलन राखण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक ग्राहकांसाठी लाभदायी आहे.

 

स्‍मार्टथिंग्‍ज होम केअर:

स्‍मार्टथिंग्‍ज होम केअर रिअल-टाइम मॉनिटरिंग व डायग्‍नोस्टिक्‍सचे विनासायास एकीकरण देते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांचे रेफ्रिजरेटर सर्वोच्‍च कार्यक्षमतेमध्‍ये ऑपरेट होत असल्‍याची खात्री मिळते. मागील व विद्यमान परफॉर्मन्‍स डेटाची तुलना करत हे वैशिष्‍ट्य संभाव्‍य समस्‍यांना लवकर ओळखते, व्‍यत्‍यय कमी करते. तसेच हे वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या माध्‍यमातून सक्रिय मेन्‍टेनन्‍स टिप्‍स देते, ज्‍यामुळे रेफ्रिजरेटरचा टिकाऊपणा वाढण्‍यासोबत सतत कूलिंग कार्यक्षमतेची खात्री मिळते. हे टूल सोयीसुविधा व प्रगत होम केअर सोल्‍यूशन्‍सप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

 

स्‍मार्ट फॉरवर्ड:

इंटरकनेक्‍टेड स्‍मार्ट होम इकोसिस्‍टम सुधारित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या स्‍मार्ट फॉरवर्ड कनेक्टेड डिवाईसेसदरम्‍यान विनासायासपणे टास्‍क्‍स हस्‍तांतरित करत विनाव्‍यत्‍यय कार्यसंचालनाची खात्री देते. उदाहरणार्थ, मल्‍टी-अप्‍लायन्‍स सेटअपमध्‍ये रेफ्रिजरेटर वापरानुसार आवश्‍यक कूलिंग समायोजित करण्‍यासाठी इतर डिवाईसेससोबत संवाद साधू शकतो. हे वैशिष्‍ट्य एकीकृत होम ऑटोमेशन सिस्‍टमवर अवलंबून असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी अनुकूल आहे, जेथे ते सोयीसुविधेमध्‍ये वाढ करते आणि खात्री देते की प्रत्‍येक डिवाईस स्‍मार्टर जीवनशैलीसाठी सुसंगतपणे ऑपरेट करेल.

 

वाय-फाय एनेबल्‍ड सोयीसुविधा:

वाय-फाय-एनेबल्‍ड रेफ्रिजरेटर्स सोयीसुविधेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, जेथे वापरकर्ते स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या माध्‍यमातून दुरून त्‍यांच्‍या अप्‍लायन्‍सवर नियंत्रण व देखरेख ठेवू शकतात. तापमान समायोजित करायचे असो, पॉवर कूल किंवा पॉवर फ्रिझ मोड्स कार्यान्वित करायचे असो किंवा मेन्‍टेनन्‍सबाबत नोटिफिकेशन्‍स मिळवायचे असो वापरकर्ते कुठूनही त्‍यांच्‍या रेफ्रिजरेटरचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. उदाहरणार्थ, किराणा मालाची खरेदी करताना वापरकर्ते घरी पतरल्‍यानंतर त्‍वरित नाशवंत वस्‍तूंना स्‍टोअर करण्‍यासाठी दूरुन तापमान कमी करू शकतात. हे वैशिष्‍ट्य डायनॅमिक जीवनशैलींसाठी आधुनिक सोयीसुविधेमध्‍ये अधिक वाढ करते.

 

कन्‍वर्टिबल ५-इन-१ मोड्स:

कन्‍वर्टिबल ५-इन-१ मोड्स अद्वितीय स्थिरता देतात, ज्‍यामुळे हे रेफ्रिजरेटर्स भारतातील कुटुंबाच्‍या वैविध्‍यपूर्ण गरजांसाठी अनुकूल आहेत. नॉर्मल, सीझनल, एक्‍स्‍ट्रा फ्रिज, व्‍हेकेशन आणि होम अलोन हे पाच मोड्स विशिष्‍ट स्थितींची पूर्तता करतात. या अनुकूलतेमधून सानुकूल ऊर्जा बचत आणि अधिकतम उपयुक्‍ततेची खात्री मिळते.

 

ट्विन कूलिंग प्‍लस™:

ट्विन कूलिंग प्‍लस™ तंत्रज्ञान फ्रेशनेस रिटेशन वाढवण्‍यासाठी आणि दुर्गंधी मिक्‍स होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. दोन स्‍वतंत्र एव्‍हेपोरेटर्स आणि फॅन्‍सचा वापर करत ते फ्रिज व फ्रिझर कम्‍पार्टमेंट्ससाठी स्‍वतंत्र कूलिंग वातावरण ठेवते. यामुळे फळे व भाज्‍यांसाठी दुप्‍पट फ्रेशनेस आणि जवळपास ७० टक्‍के ओलावा टिकून राहतो. दुर्गंधीला दूर करत हे वैशिष्‍ट्य स्टोअर केलेल्‍या वस्‍तूंमधील नैसर्गिक फ्लेवर्स कायम ठेवते. हे वैशिष्‍ट्य दीर्घकाळापर्यंत फ्रेशनेस आणि हायजेनिक स्‍टोरेजचा शोध घेणाऱ्या कुटुंबांसाठी गेम-चेंजर आहे.

 

अॅक्टिव्‍ह फ्रेश फिल्‍टर+:

अॅक्टिव्‍ह फ्रेश फिल्‍टर+ सिस्‍टम प्रगत कार्यान्वित कार्बन फिल्‍ट्रेशनच्‍या माध्‍यमातून रेफ्रिजरेटरच्‍या आत शुद्ध आणि हायजेनिक हवा प्रसारित ठेवते. ही सिस्‍टम जवळपास ९९.९९ टक्‍के जीवाणूंना दूर करते आणि दुर्गंधीला प्रतिबंध करते, ज्‍यामधून फूड स्‍टोरेजसाठी आरोग्‍यदायी व निर्जंतुक वातावरणाची खात्री मिळते. तसेच, ही सिस्‍टम हवेला सतत निर्जंतुक करण्‍यासोबत दुर्गंधींना दूर करते, ज्‍यामधून आरोग्‍य व स्‍वच्‍छतेला प्राधान्‍य देणाऱ्या वापरकर्त्‍यांना मन:शांती मिळते.

 

पॉवर कूल आणि पॉवर फ्रिझ:

पॉवर कूल आणि पॉवर फ्रिझ फंक्‍शन्‍स त्‍वरित कूलिंग व फ्रिझिंग गरजांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. पॉवर कूल त्‍वरित फ्रिजचे तापमान कमी करते, जे पेये थंड करण्‍यासाठी आणि पदार्थ ताजी ठेवण्‍यासाठी अनुकूल आहे. पॉवर फ्रिझ त्‍वरित बर्फ तयार करते, तसेच फूड घटकांना फ्रिझ करते, ज्‍यामुळे हे वैशिष्‍ट्य पार्टी किंवा त्‍वरित गॅदरिंग्‍जसाठी अनुकूल आहे. एकत्रित, ही वैशिष्‍ट्ये कार्यक्षम रेफ्रिजरेशनची गरज असलेल्‍या व्‍यस्‍त जीवनशैलींसाठी त्‍वरित सोल्‍यूशन्‍स देतात.

 

डिजिटल इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर:

डिजिटल इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर कूलिंग मागण्‍यांनुसार आपोआपपणे गती समायोजित करत सतत व ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग देते. यामुळे रेफ्रिजरेटरमधील नुकसान कमी होते, तसेच आवाज व ऊर्जा वापर कमी होतो. २० वर्षांच्‍या वॉरंटीसह हा कॉम्‍प्रेसर अद्वितीय टिकाऊपणा व विश्‍वसनीयता देतो, ज्‍यामुळे दीर्घकालीन कार्यक्षमता व मन:शांतीसाठी अनुकूल आहे.

Related posts

कोटक साजरी करत आहे भारतीय स्टार्टअप्सची अदम्य उर्मी

Shivani Shetty

तरूण व्‍यावसायिकांच्या सक्षमतेसाठी झेल एज्‍युकेशनची मोहीम

Shivani Shetty

*टाटा मोटर्सने विष्‍णू गोंड यांना शाश्‍वत कृषीचा अवलंब करण्‍यास मदत केली*

Shivani Shetty

Leave a Comment