नवी मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५:अपोलो हॉस्पिटल्सने नवी मुंबईतील नेरुळ जिमखान्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह जागरूकता वॉकथॉनचे आयोजन केले होते. रस्त्यावरील अपघातांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य ध्यानात घेऊन अपोलो हॉस्पिटल्स असे मानते की, रस्ता सुरक्षा आणि जबाबदारीने ड्रायव्हिंग याविषयी जागरूकता निर्माण करणे खूप गरजेचे आहे. ही चिंता दूर करण्यासाठी त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह जागरूकता वॉकथॉनमार्फत रस्ता सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यावर प्रकाश टाकला. या उपक्रमामध्ये नागरिक, डॉक्टर्स आणि पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक बांधिलकीचे प्रभावी प्रदर्शन केले. अपोलो हॉस्पिटल्सने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह जागरूकता वॉकथॉनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांना रस्ता सुरक्षेविषयी शिक्षित करण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी जबाबदारीने ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवर या उपक्रमाने भर दिला. कार्यक्रमाची सुरुवात झुम्बा आणि वॉर्म अपने झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून १०६६ साठी एक मानवी साखळी तयार केली.
एनएमएमसी, वाहतूक पोलीस आणि अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांसमोर मनोगत मांडले आणि त्यांना सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी प्रोत्साहित केले. आणीबाणीच्या परिस्थितीत काय करावे याबाबतच्या काही सूचना देखील दिल्या. या कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब राजले (विशेष कर्तव्य अधिकारी, मंत्रालय) आणि डॉ दिनेश बागुल (वरिष्ठ आरटीओ निरीक्षक, आरटीओ मुंबई पूर्व) हे देखील उपस्थित होते. बायकर्स, सायकल चालक, फिटनेस प्रेमी अशा वेगवेगळ्या समूहांच्या नेतृत्वाखाली, रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणारे संदेश लिहिलेले फलक दर्शवत नागरिकांनी वॉकथॉन पूर्ण केले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या मेडिकल टीम्सनी वॉकथॉनमध्ये ऍम्ब्युलन्स ब्रिगेडचे नेतृत्व केले. सहभागी झालेल्या सर्वांच्या बांधिलकीचा सन्मान करण्यासाठी वॉकथॉन पूर्ण केल्याबद्दल त्यांना पदके देण्यात आली.
डॉ कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका म्हणाले,”आज उचललेले प्रत्येक पाऊल जीव वाचवण्याच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल ठरणार आहे. रस्ता सुरक्षा जागरूकता नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित नाही, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीच्या भावनेतून चांगल्या सवयी अंगिकारण्याचा देखील यामध्ये समावेश व्हायला हवा. अपोलो हॉस्पिटल्सचा हा उपक्रम सुरक्षा व सतर्कता यांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे.”
डॉ नितीन जगासिया, पश्चिम क्षेत्र-रीजनल डायरेक्टर, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”रस्त्यांवरील अपघातांमध्ये तात्काळ मेडिकल सेवा मिळाल्यास जीवन आणि मृत्यूदरम्यानचे अंतर वाढवता येणे शक्य आहे. या वॉकथॉनमार्फत जागरूकतेला प्रोत्साहन देऊन आम्ही सुरक्षित रस्त्यांचे महत्त्व आणि प्रत्येक घराने आणीबाणीसाठी सज्ज असणे आवश्यक असल्याचा संदेश देत आहोत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आमच्या २४X७ इमर्जन्सी सेवा हे सुनिश्चित करतात की प्रत्येक आघातग्रस्त रुग्णाला प्राथमिकता दिली जाईल. आमच्या ऍम्ब्युलन्समध्ये प्रशिक्षित मेडिकल कर्मचारी उपलब्ध असतात आणि त्या ५जी सक्षम आहेत. हे एक व्हर्च्युअल हॉस्पिटल-ऑन-व्हील आहे, त्यामुळे रुग्णांना थेट अपघात स्थळीच देखभाल उपलब्ध होते.”
अपोलो रस्ता सुरक्षा सप्ताह वॉकथॉनने संदेश दिला की, सुरक्षा हे एक सामुदायिक कर्तव्य आहे. हा उपक्रम अतिशय यशस्वी ठरला. नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी सुरक्षित रस्ते आणि निरोगी जीवनशैलीप्रती बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.