औद्योगिक केंद्र तसेच ट्रेकर्ससाठी नंदनवन असलेल्या अंबरनाथमध्ये हिरव्यागार वनराईंची शांतता आणि शहरी औद्योगिक जीवनशैलीचे चैतन्य ह्यांचे मिश्रण आहे. मुंबईतील उपनगरांमधील औद्योगिक विकास हा पायी चालत कामाला जाण्याच्या (वॉक-टू-वर्क) संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. व्यवसायांना त्यांची आस्थापने स्थापन करणे सोपे करण्याच्या दृष्टीने हे विकास करण्यात आले आहेत. मुंबई आणि सुरत यांसारख्या औद्योगिक केंद्रांशी जोडलेली असल्यामुळे तर ही जागा आदर्श झाली आहे. पण त्याशिवाय यामध्ये त्वरित सामान हलवता येईल (रेडी-टू-मुव्ह) औद्योगिक गाळेही आहेत. अंबरनाथ या ठिकाणाने औद्योगिक वर्तुळात (इंडस्ट्रियल एरीना) एक नवीन मापदंड स्थापन केला आहे.
इतिहास बघितला असता, अंबरनाथ हे अनेक युगांपासून औद्योगिक शहर आहे. येथील आयुधांचा कारखाना खूप पूर्वी म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात स्थापन झालेला आहे. आज अंबरनाथमध्ये ५०० हून अधिक औद्योगिक कंपन्या आहेत. भारत सीरम अँड वॅक्सिन्स, इन्वेन्शिया हेल्थकेअर, सीएट टायर्स, गोदरेज, व्हॉल्वोलाइन, कमिन्स, सेंटॉर हेल्थ केअर आदी त्यांतील काही नावे आहेत.
सर्व उद्योगक्षेत्रांतील वाढत्या व्यवसायांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या ‘बिल्ट-टू सूट’ प्रकारच्या औद्योगिक गाळ्यांना वाढती मागणी आहे. एमएसएमईंसाठी उत्तम असलेले हे गाळे व्यवसाय व कंपन्यांना भविष्यकालीन औद्योगिक विश्वाचा भाग होण्याची उत्तम संधी देतात. त्याचा मोठा लाभ व्यवसाय व कंपन्यांना होणार हे निश्चित आहे. चातुर्याने नियोजन केलेल्या जागा ही काळाची गरज आहे. औद्योगिक व लॉजिस्टिक्सशी निगडित वाहतुकीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तसेच चारपदरी रुंद रस्ते, पार्किंगसाठी पुरेशी जागा, सामान उतरवण्याच्या व चढवण्याच्या जागा, सोयीस्कर प्रवेश व निर्गमन द्वारे, सर्व्हिस लिफ्ट्स, अग्निशमन सुविधा, त्रिस्तरीय सुरक्षा आणि अशा अनेक सुविधा असलेल्या, वसाहतींचा विकास करणे आवश्यक आहे.
*स्थान आणि कनेक्टिव्हिटी*
भौगोलिक स्थानाचा फायदा व कंपन्यांच्या दळणवळणाविषयीच्या चिंतांची काळजी घेणारी, हेवा वाटावा अशा कनेक्टिव्हिटीची मिळालेली जोड या गोष्टी अंबरनाथ अभिमानाने मिरविते. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे आणि सहापदरी विरार-जेएनपीटी एक्स्प्रेसवे यांच्यामुळे केवळ महाराष्ट्रातील इतर भागांशीच नव्हे तर गुजरातमधील महत्त्वाच्या जिल्ह्यांशीही (वलसाड, सुरत) आणि तिथूनही पुढे दिल्लीशी अंबरनाथ उत्तम प्रकारे आणि सहज जोडले गेले आहे. अंबरनाथच्या आगळ्यावेगळ्या स्थानामुळे अनेक नव्या संभाव्य बाजारपेठांसाठी हे अगदी सुयोग्य असे प्रवेशद्वार आहे. इथले सुलभ रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गाद्वारे (मुंबई विमानतळमार्गे) तयार झालेल्या कनेक्टिव्हिटीला याचे श्रेय जाते. अंबरनाथमधून जाणाऱ्या एक्स्प्रेस अर्थात द्रुतगती मार्गांमुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे JNPT बंदर व्यापारी संस्थांना सहज पोहोचता येईल अशा अंतरावर आले आहे, ज्याचा वापर करून या संस्थांना समुद्रीमार्गे निर्यातीच्या संधी मिळविणे आर्थिकदृष्ट्या शक्य व्हावे.
*पायाभूत सोयीसुविधा आणि व्यापारातील वाढ*
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी परवडण्याजोग्या पायाभूत सोयीसुविधा आणि मनुष्यबळ या दोन बाबी अपरिहार्य असतात. परवडणाऱ्या दरांत पायाभूत सोयीसुविधा देणारे एक उदयोन्मुख उपनगर म्हणून अंबरनाथ या दोन्ही गोष्टी देऊ करते, ज्यामुळे व्यापारी संस्थांना जागेच्या मर्यादा किंवा आर्थिक व्यवहार्यतेची चिंता न करता आपल्या कंपनीचा विस्तार करणे शक्य होते. इतकेच नव्हे तर अंबरनाथ एमआयडीसीने लोकांसाठी आणि व्यापारी संस्थांसाठीही वाढीच्या कितीतरी संधी खुल्या केल्या आहेत. हे ठिकाण वॉक टू वर्क संकल्पनेचाही पुरस्कार करते. एम्पायर सेंट्रममधील लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणारे ४०० औद्योगिक गाळे व्यावसायिक संस्थांना ‘बिल्ट-टू-सूट’ उपाययोजना देऊ करतात. विविध आकारात उपलब्ध असलेले आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार करण्यात आलेले हे गाळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची गरज (MSMEs) नेमकेपणाने भागविणारे आहेत, कारण इथे त्यांच्या खास गरजांचा विचार केला गेला आहे.
अंबरनाथ हा एक उदयोन्मुख निवासी भागही आहे, जिथे अनेक विख्यात विकासकांचे प्रकल्प आहेत. अंबरनाथची निवड करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे हे ठिकाण या गोदामांचे प्रमुख केंद्र असलेल्या भिवंडीपासून अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावर (गाडीने सुमारे १.५ तास) आहे.
*एक हिरवेगार शहरी जीवन*
औद्योगिक केंद्राचा विषय निघाला की बरेचदा एका प्रदूषित आणि मर्यादित सोयीसुविधा असलेल्या, दाटीवाटीने वसलेल्या जागेची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण इथेच अंबरनाथचे वेगळेपण आहे. हे ठिकाण विस्तीर्ण हरित भूभाग, परवडण्याजोगी घरे आणि चांगले जीवन जगण्यासाठी अनिवार्य असलेल्या भरपूर नागरी सोयीसुविधा देऊ करते. खरेतर, अंबरनाथ हे ठिकाण परवडणाऱ्या आणि आलिशान घरांसाठीचा पर्याय म्हणून वेगाने उदयास येत आहे. हे औद्योगिक केंद्र असल्याने कामाच्या ठिकाणाच्या जवळच राहू इच्छिणाऱ्या व लांबच लांब प्रवासाची दगदग टाळू पाहणाऱ्या स्थानिक तसेच स्थलांतरित लोकांसाठी इथे रोजगाराच्या आणि राहत्या घरांच्या कितीतरी संधी उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर इथे युनेस्कोद्वारे जागतिक वारशाचे ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या अंबरनाथ शिव मंदिरासारख्या अनोख्या जागा, डोंगरदऱ्यांतील भटकंतीसाठीची अनेक निसर्गरम्य ठिकाणे आणि एक उत्साहपूर्ण सामाजिक जीवन जगण्याच्या संधी आहेत.
अंबरनाथ हे त्या काही दुर्मिळ औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे, ज्याच्याकडे प्रत्येकासाठी देण्यासारखे काही ना काही आहे. स्टार्टअप्सपासून ते छोट्या व मध्यम उद्योगांपर्यंत ते उद्योगसमूहांपर्यंत आपला व्यवसाय विस्तारू पाहणाऱ्या सर्वांसाठी अंबरनाथ हे एक आदर्श ठिकाण आहे.