maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

आचार्य प्रशांत ‘मोस्ट इन्फ्लूएन्शियल वेगन’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई, ९ डिसेंबर २०२२: आयआयटी-दिल्ली व आयआयएम-अहमदाबादचे माजी विद्यार्थी आणि माजी नागरी सेवक आचार्य प्रशांत यांना पेटाकडून (PETA) २०२२ मोस्ट इन्फ्लूएन्शियल वेगन पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले.

आचार्य प्रशांत म्हणतात, “अहिंसेबाबत सखोल जाणून घेतले पाहिजे. ही समज नसेल तर व्यक्ती करणारी कोणतीही गोष्ट हिंसा असते. शाकाहार हा शाकाहारीपणाचे तार्किक संयोजन आहे. हे शाकाहारीपण कोठून येते? मी प्राण्याला ठार करणार नाही, माझी प्राण्‍यांना दुखापत करण्याची इच्छा नाही ही भावना असणे गरजेचे आहे आणि हीच भावना शाकाहारामधून अभिव्यक्त होते.’’

सोशल मीडिया चॅनेल्सवर २ बिलियनहून अधिक लाइफटाइम व्ह्यूज असलेले आयार्च प्रशांत लाखो (शेकडो हजार) लोकांना शाकाहाराची ओळख करून देण्यासाठी ओळखले जातात, म्हणजे प्राणी, पर्यावरण आणि मानवी आरोग्याला अनावश्यक हानी पोहोचणार नाही याची खात्री मिळते. ते एक समाजसुधारक, वेदांत शिक्षक आणि महिला, प्राणी व पर्यावरणाचे समर्थक आहेत.

ते म्हणतात, “ग्रीनहाऊस उत्सर्जनात अन्न हे कदाचित सर्वात मोठे किंवा दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देणारे आहे. पण आम्ही त्याबद्दल बोलू इच्छित नाही. कार्बन उत्सर्जित करणाऱ्या अन्न निवडीमध्ये सामान्यत: प्राण्यांप्रती क्रूरतेचा समावेश असतो.’’

Related posts

भारतातील डॉक्टरांसाठी ‘क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन’

Shivani Shetty

खनीज भवन, १३२ फूट रिंग रोड, विद्यापीठ मैदानाजवळ, वस्त्रापूर, अहमदाबाद, गुजरात, ३८००५२

Shivani Shetty

११ मुलांवर ११ तासांत ‘मॅरेथॉन हृदयरोग शस्त्रक्रिया’

Shivani Shetty

Leave a Comment