सोनी सबवरील कॉप ड्रामा मालिका ‘मॅडम सर’ लक्षवेधक स्थिती व अतिरिक्त मनोरंजनासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. प्रेक्षकांनी मालिकेवर अविरत प्रेम व पाठिंबा दर्शवला आहे आणि आता चाहते सरप्राईजेज व धमालच्या रोलर-कोस्टरची अपेक्षा करू शकतात, कारण करिष्माच्या कृतींमुळे कथानकाला रोमांचक वळण मिळणार आहे.
आगामी एपिसोडमध्ये शिवानी करूणाच्या नावाच्या महिलेमुळे हरवलेल्या हसीनाला शोधण्यामध्ये करिष्माला मदत करते. करिष्मा शिवानीला करूणाला तिच्या ताब्यात ठेवण्यास सांगते. पुष्पाला करिष्माच्या बेडरूममध्ये चिंगारी गँगचा पोशाख – लाल रंगाची साडी व काळ्या रंगाचा ब्लाऊज सापडतो. करिष्माच्या वागण्यावरून ती चिंगारी गँगशी संलग्न असण्याचा हसीनाला संशय येतो. हसीना करिष्माला शिवानीच्या ताब्यामधून करूणाला सोडण्यास आणि एमपीटीप्रती करिष्माच्या कटिबद्धतेची परीक्षा घेण्यासाठी तिला एमपीटीमध्ये घेऊन येण्यास सांगते.
करिष्मा एमपीटीप्रती तिची निष्ठा सिद्ध करू शकेल का? करिष्मा खरंच एमपीटीच्या बाजूने आहे का?
या रोचक एपिसोडबाबत सांगताना एसआय करिष्मा सिंगची भूमिका साकारणारी युक्ती कपूर म्हणाली, “करिष्मा तिच्या कामाप्रती अत्यंत कर्तव्यदक्ष आहे आणि तिची काम करण्याची स्वत:ची पद्धत आहे. कधीतरी तिचे वागणे विलक्षण वाटते, पण ती तिच्या कृतींबाबत आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांबाबत विचार देखील करते. पण यावेळी हसीनाला तिच्यावर विश्वास नाही आणि ती तिच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्याचे ठरवते. करिष्मा या परीक्षेमध्ये खरी ठरते की नाही हे फक्त येणारी वेळच सांगेल.’’
पाहत राहा ‘मॅडम सर’ दर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सोनी सबवर!