मुंबई, भारत, ८ डिसेंबर २०२२: पेमेट इंडिया लिमिटेड (“पेमेट” किंवा “कंपनी”) या आघाडीच्या बी२बी पेमेंट आणि सेवा पुरवठादार असलेल्या आणि पुरवठा साखळीत बिझनेस टू बिझनेस (बी२बी) पेमेंट्स डिजिटाइज, ऑटोमेट आणि सुलभीकृत करणाऱ्या कंपनीने आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)कडून पेमेंट एग्रेगेट्स (पीए) आणि पेमेंट गेटवे (पीजी) विनियमांवरील १७ मार्च २०२० रोजीच्या आणि वेळोवेळी अद्ययावत केल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या (“आरबीआय मार्गदर्शक तत्वे”) पेमेंट एग्रीगेटर (पीए) म्हणून काम करण्यास तत्वतः प्राधिकृतता दिल्याची घोषणा केली आहे.
पेमेंट एग्रीगेटर्स या अशा आस्थापना आहेत, ज्या व्यापारी आणि उद्योगांना पेमेंट करणे आणि प्राप्त करणे, साठवणे आणि त्यांना आरबीआय मार्गदर्शक तत्वांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत व्यापाऱ्यांकडे हस्तांतरित करणे शक्य करतात. आरबीआय मार्गदर्शक तत्वे व्यापाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध नियम लागू करतात, जसे निव्वळ मालमत्ता आवश्यकता, केवायसी मार्गदर्शक तत्वांची पूर्तता तसेच टोकनायझेशनच्या माध्यमातून डेटा साठवणूक आवश्यकता. पेमेट प्लॅटफॉर्ममध्ये या सर्व बाबी समाविष्ट आहेत आणि त्यामुळे ग्राहक व वापरकर्त्यांना टोकनाइज्ड कार्ड व्यवहारांच्या सुरक्षेसह सक्षम केले जाऊ शकते.
या घटनेबाबत बोलताना पेमेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय अदीसेशन म्हणाले की, “आम्हाला आरबीआयकडून भारतात पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी तत्वतः प्राधिकृतता मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. डिजिटल पेमेंट्स वेगाने स्वीकारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास व विश्वास वाढतो आणि आम्हाला धोक्यांच्या व्यवस्थापनासाठी सुयोग्य आराखडे अंगीकारण्यात मदत होते. त्याचबरोबर यामुळे आम्हाला आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म उपाययोजनांचे आणि क्षमतांचे नूतनीकरण करणे शक्य होईल आणि एसएमईंपासून उद्योगांपर्यंत व्यवसायांना सक्षम होता येईल.
पेमेटने अलीकडेच आपल्या व्यापक भौगोलिक विस्तार योजनेचा भाग म्हणून सिंगापूर आणि श्रीलंकेत प्रवेश केल्याची ( its entry into Singapore and Sri Lanka) घोषणा केली आहे. त्याचबरोबर मध्य युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका (“सिमिया”), दक्षिण आशिया आणि आशिया पॅसिफिक (एपॅक) मध्येही प्रवेश करण्याची त्यांची योजना आहे. पेमेटने भारतात व्हिसासोबत भागीदारी केली आहे (PayMate has an established relationship with Visa) आणि तो एक व्हिसा प्रमाणित बिझनेस पेमेंट सोल्यूशन पुरवठादार (बीपीएसपी) देखील आहे.
पेमेट प्लॅटफॉर्ममवर आर्थिक वर्ष २०२१ साठी एकूणच वाणिज्यिक क्रेडिट कार्ड प्रक्रिया टीपीव्ही १८७,१४२.३१ दशलक्ष रूपये होती आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नवमाहीत ४६४,७६६.४५ दशलक्ष रूपये होती. ३१ डिसेंबर २०२१ नुसार पेमेट प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या ग्राहक आणि वापरकर्त्यांची एकूण संख्या १६६८११ होती[1].
[1] Source – RedSeer report titled ‘Opportunities in B2B Payments in India’, May 2022