maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ईवायव्हीएने १ दशलक्ष स्‍कॅन्‍सचा टप्पा गाठला

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३: ईवायव्हीए या वेलनेस तंत्रज्ञानामधील अग्रणी गॅझेटने आरोग्‍य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती आपल्‍या प्रयत्‍नामध्‍ये उल्‍लेखनीय यश संपादित केल्‍याची घोषणा केली आहे. जगातील पहिले वेलनेस गॅझेट ईवायव्हीएने १ दशलक्षहून अधिक नॉन-इन्‍वेसिव्‍हव्‍ह स्‍कॅन्‍स करत सुवर्ण टप्‍पा गाठला आहे, ज्‍यामध्‍ये उल्‍लेखनीय नॉन-इन्‍वेसिव्‍ह ग्‍लुकोज मॉनिटरिंगचा समावेश आहे. या उपलब्‍धीमधून ईवायव्हीएची वेलनेस क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याप्रती आणि व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या घरांमध्‍ये आरामशीरपणे स्‍वत:ची काळजी घेता येण्‍यासाठी सक्षम करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

टीम ईवायव्हीएची असे विश्‍व असण्‍याची इच्‍छा आहे, जेथे तुम्‍ही व्‍हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्‍याप्रमाणे स्‍वत:हून सुलभपणे आरोग्‍याची तपासणी करू शकता आणि फेसबुकवर स्‍क्रॉल करण्‍याप्रमाणे आरोग्‍यविषयक महत्त्वाच्‍या घटकांवर सुलभपणे देखरेख ठेवू शकता. ईवायव्हीए या फक्‍त ६० सेकंदांमध्‍ये सहा महत्त्वपूर्ण आरोग्‍यविषयक घटकांचे मापन करत या ध्‍येयाला वास्‍तविकतेमध्‍ये आणते.

ईवायव्हीएचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल मद्दीकतला यांची आरोग्‍यसंबंधित निर्णय सुलभपणे व कोणत्‍याही भितीशिवाय घेण्‍यास मदत करणारे गॅझेट प्रदान करण्‍याची इच्‍छा होती. या गॅझेटमध्‍ये सुलभतेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक घरामध्‍ये कोणतेही टोचणे किंवा वेदनेशिवाय रक्‍तातील ग्‍लुकोज पातळ्यांवर देखरेख ठेवू शकतात, तर इतर व्‍यक्‍ती इनसाइट्सवर देखरेख ठेवत जलदपणे आरोग्‍यसंदर्भातील ध्‍येये संपादित करू शकतात. ज्‍यामुळे ईवायव्हीए अनेक वापरकर्त्‍यांसाठी वेलनेस सोबती ठरला आहे. सुनिल यांच्‍यासाठी तंत्रज्ञान प्रगती महत्त्‍वाची असली तरी त्‍यांच्‍या मते डिझाइनला देखील तितकेच महत्त्व आहे. सुनिल म्‍हणाले, “व्हिज्‍युअली लक्षवेधक व युजर-अनुकूल असणारे उत्‍पादन निर्माण करण्‍यामध्‍ये हार्डवेअर, अंतर्गत वैशिष्‍ट्ये व पॅकेजिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. “सुनिल पुढे म्‍हणाले की, ईवायव्हीएच्‍या यशाचे श्रेय अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह विचारपूर्वक केलेली डिझाइन व सुलभतेला देखील जाते.”

ईवायव्हीए हा उल्‍लेखनीय वेलनेस सोबती आहे, जो कोणतेही टोचणे किंवा वेदनेशिवाय फक्‍त ६० सेकंदांमध्‍ये ६ महत्त्वपूर्ण आरोग्‍यविषयक घटकांची तपासणी करू शकते. यापैकी एक घटक म्‍हणजे क्रांतिकारी नॉन-इन्‍वेसिव्‍ह ब्‍लड ग्‍लुकोज मॉनिटरिंग, जे भारतासारख्‍या देशात सर्वात महत्त्वाचे आहे. नुकतेच लॅन्‍सेटने केलेल्‍या संशोधनामधून भारतातील १०१ दशलक्ष व्‍यक्‍तींना मधुमेह असल्‍याचे निदर्शनास आले आहे. ईवायव्हीएसह व्‍यक्‍ती व कुटुंबं त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करू शकतात आणि इतर महत्त्वाच्‍या आरोग्‍यविषयक घटकांवर बारकाईने देखरेख ठेवू शकतात.

Related posts

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

इझमायट्रिपचा लीप इअर ट्रॅव्‍हल सेल लाँच

Shivani Shetty

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ५ शीर्ष पर्याय

Shivani Shetty

Leave a Comment