maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

प्रमुख शहरांमधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ: हाऊसिंग डॉटकॉम

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४: २०१९ पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. दरम्‍यान, २०१९ च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत प्रमुख ८ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्‍पन्‍नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्‍मक ट्रेण्‍ड्स असताना देखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक रिअल इस्‍टेट हब्‍सच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी हाऊसिंग डॉटकॉमच्‍या अहवालामधून निदर्शनास आल्‍या आहेत.

देशातील आघाडीचे रिअल इस्‍टेट टेक व्‍यासपीठ हाऊसिंग डॉटकॉम चा नवीन अहवाल ‘रेसिडेन्शियल रेण्‍ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्‍टल प्रॉपर्टी इन इंडिया’ निदर्शनास आणतो की, मासिक सरासरी भाडेदरामधील वाढ भांडवल मूल्‍यांमधील वाढीपेक्षा उच्‍च आहे.

प्रमुख शहरांमधील मालमत्ता किमतींमध्‍ये २०१९ च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली, तर सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तसेच सेवा क्षेत्रातील अग्रणी शहरांमधील विशिष्‍ट प्रमुख ठिकाणी याच कालावधीदरम्‍यान भाडेदरांमध्‍ये ३० टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली.

हाऊसिंग डॉटकॉम आयआरआयएस इंडेक्‍समधून निदर्शनास आले की, महामारीनंतरच्‍या काळात मध्‍यम भाडेदरासह घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत वाढ झाली आहे. हे इंडेक्‍स व्‍यासपीठावरील ऑनलाइन सर्च क्रियाकलापावर देखरेख ठेवत आगामी मागणीबाबत माहित देते. या इंडेक्‍समधून निदर्शनास येते की, महामारीनंतरच्‍या काळात ऑनलाइन रेण्‍टल सर्च क्रियाकलापामध्‍ये गृहखरेदीच्‍या तुलनेत वाढ झाली आहे. सध्‍या भाडेदरासाठी आयआरआयएस इंडेक्‍स २३ पॉइण्‍ट्सवर आहे, जो घर खरेदी करण्‍याबाबतच्‍या इंडेक्‍सच्‍या तुलनेत उच्‍च आहे.

हाऊसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीईओ श्री. ध्रुव अग्रवाल म्‍हणाले, ”महामारीनंतर खरेदी व भाड्याने देण्‍यासंदर्भात घरांच्‍या मागणीमध्‍ये वाढ झाली आहे. गृहनिर्माण बाजारपेठेतील किमतींत गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये मोठी वाढ झाली आहे, जी जवळपास दशकाएवढी आहे. शहरामध्‍ये सरासरी किंमत वाढ पुरेशा प्रमाणात आहे, पण काही प्रमुख शहरांमध्‍ये वाढ मोठ्या प्रमाणात आहे.”

हाऊसिंग डॉटकॉम येथील संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूदम्‍हणाल्‍या, ”उच्च व्याजदर आणि संपादन खर्च यांसारख्या कारणांमुळे भारतातील भाडे परतावा ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. पण मालमत्तेच्‍या वाढत्‍या किमती, संभाव्य खरेदीदारांसाठी परवडण्‍याच्‍या बाबतीतील आव्हाने आणि तयार सदनिकांबाबत यादीचा मर्यादित पुरवठा यासह महामारीनंतर घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरूग्राम, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या सेवा क्षेत्रातील प्रबळ शहरांच्या सीबीडीमध्ये २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ दिसण्‍यात आली आहे.”

श्रीमती सूद पुढे म्‍हणाल्‍या, ”अधिक पुढे जात, पुढील २ ते ३ वर्षांमध्‍ये बाजारपेठेत नवीन तयार सदनिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असणार आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीमधील वाढ कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. या शाश्‍वत वाढीमुळे मध्‍यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्‍ये रूची निर्माण झाली आहे, ज्‍यामधून रेण्‍टल बाजारपेठेत उदयोन्‍मुख संधी दिसून येत आहेत.”

हाऊसिंग डॉटकॉम रिसर्चने देखील भारतातील प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठेतील भाडे परताव्‍यांचा प्रमुख जागतिक शहरांमधील भाडे परताव्‍यांसोबत तुलना करण्‍यासाठी किंमत-ते-भाडे गुणोत्तरचे गणन केले आहे. विशिष्‍ट भौगोलिक क्षेत्रामधील मध्‍यम मालमत्ता मूल्‍याला मध्‍यम वार्षिक भाडेदराने भागाकार करत किंमत-ते-भाडे गुणोत्तर निर्धारित केले जाते.

कमी किंमत-ते-भाडे गुणोत्तर म्‍हणजे मालमत्ता मालकांसाठी उच्‍च भाडे उत्‍पन्‍न किंवा गुंतवणूकीवर उच्‍च परतावा. हे गुणोत्तर मालमत्ता खरेदी करण्‍याच्‍या तुलनेत भाड्याने देण्‍यासंदर्भातील स्‍पर्धात्‍मक किफायतशीरपणाचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये मदत करते.

किंमत-ते-भाडे गुणोत्तर – संपूर्ण विश्‍व वि. भारत 

अनु. क्र.  शहर  देश  किंमत-ते-भाडे गुणोत्तर 
न्‍यूयॉर्क युनायटेड स्‍टेट्स १७
टोकियो जपान ४२
लंडन युनायटेड किंग्डम २४
दुबई यूएई १५
पॅरिस फ्रान्स ३१
सियोल दक्षिण कोरिया ४०
सिंगापूर सिंगापूर २३
सिडनी ऑस्ट्रेलिया २९
मुंबई (एमएमआर*)  भारत ३५
१० नवी दिल्ली भारत ३७
११ नोएडा भारत ३३
१२ गुरुग्राम भारत ३६
१३ पुणे भारत ३१
१४ हैदराबाद भारत २५
१५ बेंगळुरू भारत २५
१६ मेलबर्न ऑस्ट्रेलिया २१
१७ हॉंगकॉंग चीन ३६

* मुंबई महानगर क्षेत्रामध्‍ये मुंबई, ठाणे व नवी मुंबई यांचा समावेश आहे.

स्रोत: रेसिडेन्शियल रेण्‍ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्‍टल प्रॉपर्टी इन इंडिया २०२४, हाऊसिंग रिसर्च

Related posts

टाटा मोटर्स ने नेक्सन और पंच के साथ एसयूवी बाजार का नेतृत्‍व किया

Shivani Shetty

सॅमसंगने या महिन्‍यामध्‍ये लाँच करण्‍यात येणाऱ्या भारतीयांसाठी विशिष्‍ट एआय वॉशिंग मशिन सेटची झलक दाखवली

Shivani Shetty

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी यांची हॅबिट्समध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

Leave a Comment