maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून पहिला एंटरप्राइज एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७’ (Galaxy Xcover7) लाँच, ज्‍यामध्‍ये आहे मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, सतत काम करत राहण्‍याची क्षमता आणि सर्वोत्तम उत्‍पादकता

गुरूग्राम, भारत, फेब्रुवारी 6, २०२४ – सॅमसंग या भारताील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज त्‍यांचा पहिला एंटरप्राइज केंद्रित स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ लाँच केला. हा शक्तिशाली डिवाईस प्रबळ असण्‍यासह अपवादात्‍मक वापराची खात्री देतो. अत्‍यंत प्रखर स्थितीमध्‍ये कार्यरत राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ चा व्‍यावसायिकांचे जीवन सुलभ करण्‍याचा मनसुबा आहे. हा स्‍मार्टफोन जलद कनेक्‍टीव्‍हीटी, एकसंधी सातत्‍यता आणि बाह्य घटकांमुळे येणारे व्‍यत्‍यय कमी करण्‍याची खात्री देतो, ज्‍यामुळे प्रोफेशनल्स जलदपणे व स्‍मार्टपणे काम करू शकतात.

गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ ५जी कनेक्‍टीव्‍हीटी, अपग्रेडेड मोबाइल प्रोसेसर कार्यक्षमता आणि अधिक मेमरी क्षमतेसह सुधारित गतीशीलता देईल. तसेच, गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ सिंगल व विविध बारकोड/क्‍यूआर कोड स्‍कॅनिंगसाठी सानुकूल करण्‍यात आलेला नवीन शक्तिशाली रिअर कॅमेरा आणि विस्‍तारित डिस्‍प्‍ले आकार व रिझॉल्‍यूशनसह येतो, ज्‍यामुळे वापरकर्ते विविध सेटिंग्‍जमध्‍ये टास्‍क पूर्ण करू शकतात. कोणत्‍याही सेटिंगमध्‍ये सोईस्‍कर रिचार्जिंगसाठी सुलभ पोगो चार्जिंग पिन आणि हातांमध्‍ये ग्‍लोव्‍ह्ज असताना देखील वापराच्‍या खात्रीसाठी सुधारित टच संवेदनशीलता गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ ला विश्‍वसनीय व सोय-केंद्रित डिवाईस बनवतात.
टिकाऊपणा व अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्यांमुळे इतरांपेक्षा वरचढ असलेला गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ सातत्यता आणि सुधारित उत्‍पादकतेची खात्री देतो, ज्‍यामुळे वापरकर्ते जगात कुठूनही काम करू शकतात. या स्‍मार्टफोन सिरीजमध्‍ये सर्वोत्तम, मोठ्या स्क्रिन आकाराचा डिस्‍प्‍ले आहे, जो व्हिज्‍युअल सुस्‍पष्‍टता वाढवतो, ज्‍यामुळे वापरकर्ते सुर्यप्रकाशात देखील अधिक कार्यक्षमपणे काम करू शकतात. गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ मधील नॉक्‍स वॉल्‍ट या डिवाईसेसमधील सर्वात महत्त्वपूर्ण डेटासह लॉक स्क्रिन माहिती जसे पिन कोड्स, पासवर्ड्स व पॅटर्न्‍स यांचे संरक्षण करण्‍यास मदत करते.
”सॅमसंगमध्‍ये आमचा आमच्‍या उत्‍पादन ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून वापरकर्त्‍यांना सोयीसुविधा व टिकाऊपणा देण्‍याचा उद्देश आहे. आम्‍ही दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ लाँच केला आहे, गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ एंटरप्राइज एडिशन आणि स्‍टॅण्‍डर्ड एडिशन. दोन्‍ही डिवाईसेस अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांसह डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे अत्‍यंत मजबूत असण्‍यासह खडतर हवामान स्थितींमध्‍ये टिकून राहण्‍याची खात्री मिळते. नॉक्‍सच्‍या समर्थनासह आम्‍हाला कॉर्पोरेट ग्राहकांसाठी हे क्रांतिकारी मेड इन इंडिया उत्‍पादन लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍हाला आशा आहे की, ही उत्‍पादने कर्मचारी उत्‍पादकता वाढवतील आणि डेटा सुरक्षिततेची खात्री घेतील,” असे सॅमसंग इंडियाचे उपाध्‍यक्ष श्री. आकाश सक्‍सेना म्‍हणाले.
नेक्‍स्‍ट-लेव्‍हल टिकाऊपणासह दीर्घकाळापर्यंत टिकण्‍यासाठी निर्माण
प्रबळ केस आणि फोर्टिफाईड ग्‍लास डिस्‍प्‍लेसह गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा (MIL-STD-810H2) मानकांची पूर्तता करतो आणि अत्‍यंत प्रखर हवामान स्थितींसह अधिक तापमान व पावसामध्‍ये टिकून राहण्‍याच्‍या खात्रीसाठी चाचणी करण्‍यात आला आहे.
आयपी६८-प्रमाणित1 स्‍मार्टफोन जल-रोधक व धूळ-रोधक असण्‍यासह जवळपास १.५ मीटर3 उंचीवरून खाली पडल्‍यानंतर देखील टिकून राहण्‍यासाठी निर्माण करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून प्रखर हाताळणीची किंवा स्‍मार्टफोन नकळतपणे खाली पडल्‍यास कार्यसंचालनांवर कोणताच परिणाम न होण्‍याची खात्री मिळते.
उत्‍पादकता व सुरक्षितता वाढवण्‍यासाठी निर्माण
सानुकूल शॉर्टकट्ससाठी प्रोग्रामेबल की आणि जलद कार्यक्षमतेसाठी शक्तिशाली प्रोसेसर असलेला गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ वापरकर्त्‍यांना सर्वोत्तमपणे काम करण्‍यास सक्षम करतो, तर सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट त्‍यांच्‍या डेटाच्‍या सुरक्षिततेची, तसेच स्‍वतंत्र, टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट हार्डवेअरमधील महत्त्वाची माहिती सुरक्षित राहण्‍याची खात्री देते.
या डिवाईसमध्‍ये ५० मेगापिक्‍सल रिअल कॅमेरा व ५ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे, तसेच ६ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटर्नल मेमरी क्षमता आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्‍या माध्‍यमातून जवळपास १ टीबीपर्यंत वाढवता येते.
किंमत, व्‍हेरिएण्‍ट्स आणि कुठे खरेदी करता येईल
कॉर्पोरेट आणि संस्‍थात्‍मक ग्राहक येथे आणि आमचे ऑनलाइन ईपीपी पोर्टल – www.samsung.com/in/corporateplus येथे गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ खरेदी करू शकतात. बल्क खरेदीसाठी, ग्राहक https://www.samsung.com/in/business/smartphones/xcover/fill-details/ येथे चौकशी करू शकतात.
हे उत्‍पादन स्‍टॅण्‍डर्ड आणि एंटरप्राइज या दोन एडिशन्‍समध्‍ये अनुक्रमे २७२०८ रूपये आणि २७५३० रूपये या किमतीत उपलब्‍ध असेल.
नॉक्‍स सूट सबस्क्रिप्‍शन
सॅमसंग गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७ एंटरप्राइज एडिशनवर नॉक्‍स सूटचे १२ महिन्‍यांचे सबस्क्रिप्‍शन देत आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या जीवनचक्रादरम्‍यान डिवाईसेस सुरक्षित, अंमलबजावणी व व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी टूल्‍स मिळतात.
वॉरंटी
ग्राहकांना स्‍टॅण्‍डर्ड एडिशनवर १ वर्षाची वॉरंटी आणि एंटरप्राइज एडिशनवर २ वर्षांची वॉरंटी मिळेल.

Related posts

बोईंगने P-8I साठी आखला आत्‍मनिर्भर भारत भविष्‍याचा आराखडा

Shivani Shetty

भारतातील पहिली ‘गो कोडर्ज’ राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा

Shivani Shetty

जागतिक कर्करोग दिन २०२४मला स्‍तनाचा कर्करोग झाला आहे… आता काय?

Shivani Shetty

Leave a Comment