नवी मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४- अपोलो कॅन्सर सेंटर्स (एसीसी) ३ रुग्णांवर सीएआर टी-सेल थेरपी यशस्वीपणे करुन भारतातील पहिले खाजगी रुग्णालय म्हणून नावारुपाला आले आहे आणि या प्रक्रियेत विकास घडवून आणण्यासाठी हे रुग्णालय ‘मेड इन इंडिया’ सीएआर टी-सेल थेरपी सुरु केले, याची सुरुवात १५ वर्षे आणि त्यावरील अधिक वयाच्या रुग्णांमध्ये बी-सेल लिम्फोमा आणि बी-ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या उपचारांसाठी NexCAR19™️ (ऍक्टालिकॅब्टाजीन ऑटोल्यूसेल) पासून केली.
’लिविंग ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएआर टी-सेल थेरपीजमध्ये रुग्णाचे टी-सेल्स (पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार, ज्यांचे कार्य कर्करोगाच्या पेशींशी लढणे असे आहे) काढले जातात आणि या प्रक्रियेला ऍफेरेसिस म्हणतात. नंतर या टी-सेल्स तज्ञांच्या देखरेखीखाली सुसज्ज प्रयोगशाळेत सेफ वेहिकलद्वारे (व्हायरल व्हेक्टर) अनुवांशिकरित्या सुधारित केल्या जातात, जेणेकरुन ते आपल्या सर्फेसवर सुधारित कनेक्टर्स अभिव्यक्त करतील, ज्यास कायरॅमिक अंटिजेन रिसेप्टर्स (सीएआर) असे म्हणतात. हे सीएआर विशेषतः असे प्रोटीन ओळखण्यासाठी तयार केले जातात, जे कर्करोगाच्या पेशींचे निर्मूलन करण्यास सज्ज होतात. त्यानंतर त्याद्वारे अनेक डोस तयार केले जातात आणि थेट रुग्णाला दिले जातात.आव्हानात्मक असा बी-सेल घातक रोग असलेल्या रुग्णांच्या जीवनात सीएआर टी-सेल थेरपीद्वारे अमुलाग्र सकारात्मक बदल घडवून आणला गेला, म्हणून या थेरपीला जागतिक मान्यता मिळाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, जगभरातील सुमारे २५,००० रुग्णांना या थेरपीचा लाभ झाला आहे.
डॉ.पुनित जैन, सल्लागार हेमॅटोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई म्हणाले,“व्यावसायिक स्तरावर सीएआर टी-सेल थेरपीचा वापर करत 3 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन बी-सेल लिम्फोमा आणि ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया विरुद्धच्या लढ्यात आम्ही जणू एक उंच भरारी घेतली आहे. या यशामुळे या आव्हानात्मक समस्यांचा सामना करणाऱ्या रूग्णांना नवीन आशा देण्याकरिता या परिवर्तनीय थेरपीची प्रभावीता आणि क्षमता सिद्ध होते.”
डॉ.विपिन खंडेलवाल, सल्लागार-लहान मुलांचे हेमॅटो ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई म्हणाले,“सीएआर टी-सेल थेरपीची यशस्वी अंमलबजावणी ही भारतातील कर्करोगाच्या उपचारांच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा घटना आहे. या क्रांतिकारी थेरपीद्वारे रूग्णांवर उपचार केल्याने बी-सेल अशा आव्हानात्मक व घातक रोगांचा सामना करण्यासाठी या परिवर्तनीय थेरपीची क्षमता आणि परिणामकारकता स्पष्ट दिसून येते. या यशाद्वारे कर्करोगाविरुद्धच्या आपल्या लढ्यात एक नवीन अध्याय रचला गेला आहे, तसेच जे या समस्येविरुद्ध लढा देत आहेत, त्यांना नवीन आशा आणि शक्यता प्राप्त झाली आहे.”
संतोष मराठे, सीईओ-पश्चिमी विभागाचे प्रादेशिक, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की,“यशस्वी वाटचाल करताना अपोलो कॅन्सर सेंटर्सने कर्करोगाच्या उपचारात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आम्ही यशस्वीपणे उपचार करत आहोत, याचाच अर्थ सीएआर टी-सेल थेरपीला चालना देण्यासाठी आमची वचनबद्धता अढळ आहे. या परिवर्तनीय थेरपीद्वारे 3 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करणारे आमचे रुग्णालय हे भारतातील पहिले खाजगी रुग्णालय असल्याने एक नवा मानदंड स्थापित केला गेला आहे. यामुळे आमच्या अभूतपूर्व आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या समर्पण वृत्तीला बळ मिळाले आहे. स्वदेशी सीएआर टी-सेल थेरपी – NexCAR19 द्वारे सुलभ आणि प्रभावी उपाय प्रदान करण्याबाबत असलेली आमची बांधिलकी दर्शवली जाते. अपोलो कॅन्सर सेंटर्स केवळ कथेमध्ये बदल करत नाही; तर आम्ही संपूर्ण भारत आणि जगभरातील कर्करोगाच्या रूग्णांसाठी चांगले उपचारात्मक परिणाम देण्याच्या शक्यतेची गाथा पुन्हा लिहित आहोत.”