maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

प्‍लस गोल्‍डने ‘मीरा ज्‍वेलरी’ कलेक्‍शन लाँच केले

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२४:* प्‍लस गोल्‍ड या आघाडीच्‍या डिजिटल सोने बचत प्‍लॅटफॉर्मला त्‍यांचे बहुप्रतिक्षित गोल्‍ड ज्‍वेलरी कलेक्‍शन ‘मीरा’च्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. ही उत्‍साहवर्धक नवीन ऑफरिंग वापरकर्त्‍यांना घरपोच डिलिव्‍हरी केल्‍या जाणाऱ्या आकर्षक, उच्‍च दर्जाच्‍या दागिन्‍यांसाठी त्‍यांच्‍या गोल्‍ड बचतींना रिडिम करण्‍याची सुविधा देते. मीरा कलेक्‍शनमध्‍ये बीआयएस व एचयूआयडी प्रमाणित सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या विस्‍तृत श्रेणीचा समावेश आहे, ज्‍यामध्‍ये अंगठ्या, पेण्‍डंट्स, चेन्‍स, ब्रेसलेट्स, बांगड्या, कानातले आणि सोन्‍याच्‍या नाण्‍यांचा समावेश आहे. प्रत्‍येक दागिना बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून कंपनीची सर्वोत्तमता आणि ग्राहक समाधानाप्रती कटिबद्धता दिसून येते.

 

प्‍लस गोल्‍ड अॅपने मीरा दागिने ब्राऊज करण्‍यासह खरेदी करण्‍यासाठी सर्वोत्तम व युजर-अनुकूल इंटरफेस डिझाइन केले आहे. प्‍लॅटफॉर्म विविध विशेष डिझाइन्‍स देतो, ज्‍यामधून प्रत्‍येक ग्राहकाला त्‍यांच्‍या स्‍टाइलनुसार परिपूर्ण दागिन्‍याची खात्री मिळते. नजीकच्‍या भविष्‍यात, अॅप शॉपिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी वैयक्तिकृत शिफारशी आणि व्‍हर्च्‍युअल ट्राय-ऑन्‍स अशी प्रगत वैशिष्‍ट्ये सादर करेल. ग्राहकांच्‍या विविध गरजा समजून घेत प्‍लस गोल्‍ड अॅप मीरा ज्‍वेलरीसाठी स्थिर पेमेंट पर्याय देते. वापरकर्ते अंशत: किंवा पूर्ण पेमेंटसाठी त्‍यांच्‍या संग्रहित गोल्‍ड बचतींचा वापर करू शकतात, जेथे इतर माध्‍यमांद्वारे कोणतीही उर्वरित शिल्‍लक कव्‍हर करण्‍याचा पर्याय आहे. हा नाविन्‍यपूर्ण दृष्टिकोन लक्‍झरी गोल्‍ड ज्‍वेलरी अधिकाधिक ग्राहकांना उपलब्‍ध करून देतो.

 

*प्‍लस गोल्‍डचे संस्‍थापक वीर मिश्रा* म्‍हणाले, “प्‍लस गोल्‍डमध्‍ये आम्‍ही अॅपवर वापरकर्त्‍यांच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड प्रवास सोपा करण्‍याप्रती काम करत आहोत. मीरा ज्‍वेलरीच्‍या लाँचसह आम्‍ही वापरकर्त्‍यांना त्‍यांचा सोन्‍याकडे पाहण्‍याचा व संवाद साधण्‍याचा दृष्टिकोन बदलणारा अनुभव देत आहोत. आमचा प्रत्‍यक्ष सोने खरेदी प्रभावी करण्‍याचा, तसेच ग्राहकांना काही क्लिक्‍समध्‍ये त्‍यांच्‍या गोल्‍ड बचत रिडिम करण्‍यास सक्षम करण्‍याचा आणि आकर्षक दागिने घरपोच डिलिव्‍हर करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला माहित आहे की, वापरकर्ते दर्जा व सोयीसुविधेला महत्त्व देतात, याच कारणामुळे आमच्‍या कलेक्‍शनमधील प्रत्‍येक दागिना बीआयएस व एचयूआयडी प्रमाणित आहे. आम्‍ही पुढे जात असताना वैयक्तिक पसंती व प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करणाऱ्या वैयक्तिकृत वैशिष्‍ट्यांसह आमच्‍या प्‍लॅटफॉर्मला अधिक दृढ करण्‍याप्रती समर्पित आहोत.”

Related posts

तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना वाढती मागणी: टीमलीज डिजिटल

Shivani Shetty

इझमायट्रिपची दुस-या तिमाहीत दमदार कामगिरी

Shivani Shetty

रिषभ पंतच्‍या गाथेने सुरक्षित भविष्‍यासाठी एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम लाँच

Shivani Shetty

Leave a Comment