maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यामाहाने भारतात ३०० ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर आऊटलेट्ससह गाठला उल्‍लेखनीय टप्‍पा

चेन्‍नई, 08 March 2024: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) ने आज भारतातील आपले नेटवर्क ३०० ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍सपर्यंत वाढवत महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठला. या उपलब्‍धीमधून यामाहाची यामाहा ब्‍ल्‍यू थीमअंतर्गत प्रबळ नेटवर्क निर्माण करण्‍याप्रती आणि ग्राहकांना उच्‍च दर्जाचा एण्‍ड-टू-एण्‍ड अनुभव प्रदान करण्‍याप्रती सुरू असलेली समर्पितता दिसून येते.

२०१८ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्या ‘कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’ ब्रॅण्‍ड मोहिमेने ग्राहक सहभाग वाढवण्‍याच्‍या आणि प्रिमिअम विशिष्‍टता स्‍थापित करण्‍याच्‍या यामाहाच्‍या प्रवासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१९ मध्‍ये यामाहाने ग्राहकांना त्‍यांच्‍या सर्व बाइकिंग गरजांसाठी सर्वसमावेशक सोल्‍यूशन निर्माण करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या मोहिमेचा भाग म्‍हणून ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍सची संकल्‍पना सादर केली. या वर्षांमध्‍ये हे प्रिमिअम आऊटलेट्स ग्राहकांसाठी ब्रॅण्‍डची संस्‍कृती व संपन्‍न रेसिंग वारसाशी कनेक्‍ट होण्‍याकरिता प्रबळ माध्‍यम म्‍हणून उदयास आले आहेत.

रिटेल स्‍पेस असण्‍याव्‍यतिरिक्‍त हे शोरूम्‍स ग्राहकांना यामाहाच्‍या ब्‍ल्‍यू स्‍ट्रीक्‍स राइडर समुदायासोबत संलग्‍न होण्‍यासाठी संपन्‍न हब म्‍हणून सेवा देतात, तसेच राइडिंगची समान आवड असलेल्‍या समविचारी व्‍यक्‍तींसोबत परस्‍परसंवाद व उत्‍साहवर्धक राइड्सचा आनंद घेण्‍याला चालना देतात. ‘ब्‍ल्‍यू’ थीममधून ब्रॅण्‍डचा अभिमानास्‍पद रेसिंग वारसा दिसून येतो आणि ‘स्‍क्‍वेअर’ यामाहाच्‍या दुचाकीच्‍या उत्‍साहवर्धक, स्‍पोर्टी व स्‍टायलिश श्रेणीसाठी क्‍यूरेटेड व्‍यासपीठाचे प्रतीक आहे. 

यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्‍यक्ष श्री. आयशिन चिहाना या महत्त्वपूर्ण प्रसंगी आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले,”मला ‘द कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’ मोहिमेअंतर्गत महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याच्‍या यशस्‍वी पूर्ततेची घोषणा करण्‍याचा आनंद होत आहे. यामाहाने भारतभरात ३०० ब्‍ल्यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍स लाँच करण्‍याचे उल्‍लेखनीय यश संपादित केले आहे. या शोरूम्‍समधून यामाहाची सर्वोत्तम ग्राहक समाधान व अद्वितीय मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती अविरत समर्पितता दिसून येते. तसेच या यशामधून भारतीय बाजारपेठेतील विक्री, सेवा व ग्राहक आनंदामध्‍ये नवीन मानक स्‍थापित करण्‍याप्रती आमचा दृष्टिकोन देखील दिसून येतो.” 

ते पुढे म्‍हणाले, ”देशभरात ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍स स्‍थापित करणे हे यामाहाला संपन्‍न रेसिंग डीएनए असलेला जागतिक ब्रॅण्‍ड म्‍हणून स्थापित करण्‍याच्‍या आमच्‍या धोरणामधील महत्त्वाचा पैलू आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की या यशामधून ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर आऊटलेट्सचे विस्‍तारीकरण करत राहण्‍यास प्रेरणा मिळेल,ज्‍यामधून भारतातील प्रत्‍येक याहामा ग्राहकाला यामाहा सारख्‍या जगप्रसिद्ध ब्रॅण्‍डकडून विशिष्‍ट अनुभवाची खात्री मिळेल.”

ट्रॅक-ओरिएण्‍टेड आर३, स्‍ट्रीट फाइटर एमटी-०३ आणि मॅक्‍सी-स्‍पोर्टस् ऐरॉक्‍स१५५ स्‍कूटर या ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअरच्‍या माध्‍यमातून विशेषरित्‍या विक्री करण्‍यात येतात. हे प्रिमिअम आऊटलेट्स ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम (टीसीएस) सह सुसज्‍ज इतर मोटरसायकल लाइन-अप देखील दाखवतात, ज्‍यामध्‍ये वायझेडएफ-आर१५ व्‍ही४ (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५५ व्‍ही३ (१५५ सीसी), एमटी-१५ व्‍ही२ (१५५ सीसी), एफझडेएस-एफआय व्‍हर्जन ४.० (१४९ सीसी), एफझडेएस-एफआय व्‍हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड-एफआय व्‍हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड-एक्‍स (१४९ सीसी) आणि स्‍कूटर्स जसे फॅसिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रे झेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रे झेडआर स्‍ट्रीट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी) यांचा समावेश आहे, ज्‍या यामाहाच्‍या अस्‍सल हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित असण्‍यासह उच्‍च इंधन कार्यक्षम आहेत. तसेच, हे आऊटलेट्स यामाहाच्‍या अॅपरल्‍स व अॅक्‍सेसरीजच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह श्रेणीला देखील दाखवतात. भारतात कार्यरत असलेल्‍या ३०० ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍सपैकी यामाहाचे भारतातील दक्षिण भागात १२९ आऊटलेट्स,पूर्व भागात ८१ आऊटलेट्स, पश्चिम भागात ५४ आऊटलेट्स आणि उत्तर भागात ३७ आऊटलेट्स आहेत.

यामाहाचे त्‍यांच्‍या वेबसाइटवर ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍सवरील समर्पित पेज आहे. ग्राहक ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर शोरूम्‍सबाबत अधिक माहितीसाठी लिंकला भेट देऊ शकतात: https://www.yamaha-motor-india.com/yamaha-bluesquare.html.

Related posts

सॅमसंगकडून भारतात ४के अपस्‍केलिंग, एअरस्लिम डिझाइन आणि नॉक्‍स सिक्‍युरिटी असलेला २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच

Shivani Shetty

परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील दिग्गजांना दिलेली ही सर्वोच्च राष्ट्रीय मान्यता ‘निलाद्री कुमार’ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Shivani Shetty

रोगप्रतिकारशक्तीला बळ आणि त्वचेची जपणूक: खेळाडूंच्या स्किनकेअरसाठी काही मार्गदर्शक सूचना

Shivani Shetty

Leave a Comment