maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून दिल्‍लीमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

दिल्‍ली, २० मार्च २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज दिल्‍ली येथे त्‍यांच्‍या पाचव्‍या रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ)च्‍या उद्घाटनासह शाश्‍वत गतीशीलतेप्रती आपली कटिबद्धता कायम राखली आहे. Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट’ नाव असलेल्‍या या केंद्राचे उद्घाटन टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या अत्‍याधुनिक केंद्रामध्‍ये पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो आणि या केंद्राची दरवर्षाला १८,००० एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍स सुरक्षितपणे विघटन करण्‍याची क्षमता आहे. जोहार मोटर्ससोबत सहयोगाने विकसित करण्‍यात आलेले आरव्‍हीएसएफ सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या प्रवासी व व्‍यावसायिक वाहनांचे जबाबदारपूर्वक स्‍क्रॅपिंग करते. जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत व चंदिगड येथे टाटा मोटर्सच्‍या चार आरव्‍हीएसएफना मोठे यश मिळाल्‍यानंतर हा मोठा टप्‍पा लाँच करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून कंपनीची शाश्‍वत उपक्रमांना प्रगत करण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ होते. 

या महत्त्वपूर्ण लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ”टाटा मोटर्स गतीशीलतेच्‍या भवितव्‍याला आकार देण्‍यासाठी नाविन्‍यता व शाश्‍वततेला चालना देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. लाँच करण्‍यात आलेले आमचे पाचवे स्‍क्रॅपिंग केंद्र शाश्‍वत पद्धती आणि जबाबदारपूर्वक वेईकल विघटन अधिक उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. स्‍क्रॅपमधून मूल्‍य निर्मितीचे ध्‍येय आमच्‍या चक्रीय अर्थव्‍यवस्‍था निर्माण करण्याच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. तसेच ते शाश्‍वत ऑटोमोटिव्‍ह पद्धतींना चालना देण्‍याच्‍या सरकारच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये देखील योगदान देते. हे अत्‍याधुनिक केंद्र वाहनांचे जबाबदारपूर्वक विघटन करण्‍यामध्‍ये आणि सर्वांसाठी शुद्ध, अधिक शाश्‍वत भविष्‍य घडवण्‍यासाठी मार्ग मोकळा करण्‍यामध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल.” 

अत्‍याधुनिक केंद्र Re.Wi.Re हे सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या एण्‍ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सचे विघटन करण्‍याच्‍या उद्देशाने निर्माण करण्‍यात आले आहे, जेथे पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. पूर्णत: डिजिटल सुविधा कमर्शियल व पॅसेंजर वेईकल्‍ससाठी अनुक्रमे समर्पित सेल-टाइप व लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्‍ज आहे आणि सर्व कार्यसंचालने एकसंधी व पेपरलेस आहेत. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्युमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. असे करत वेईकल स्‍क्रॅपेज पॉलिसीनुसार विघटन प्रक्रियेमधून बारकाईने लक्ष दिल्‍याची, तसेच सर्व घटकांच्‍या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.

Related posts

राहण्यासाठी घराचा शोध घेणे होणार सोपे

Shivani Shetty

इझमायट्रिपचा गोल्डन भारत ट्रॅव्हल सेल

Shivani Shetty

आयथिंक लॉजिस्टिक्सचा इंडिया पोस्टसोबत सहयोग

Shivani Shetty

Leave a Comment