maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिसा: बिगर-महानगरीय क्षेत्रांमध्ये कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चातील १७५ टक्‍के डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ

मुंबई, जानेवारी २०२४: बिगर महानगरीय शहरे, विशेषत: श्रेणी बी (Cat B) व श्रेणी सी+ (Cat C+) मधील शहरे वाढीला वेग देणारी महत्त्वाची ठिकाणे म्हणून उदयास येत असल्याने भारताच्या डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्राने लक्षणीय उसळी घेतल्याचे दिसत आहे. डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी व्हिसाने प्रसिद्ध केलेल्या, “ब्रिजिंग द गॅप: पेमेंट्स इन इंडिया बियाँड मेट्रोज” या शीर्षकाच्या श्वेतपत्रिकेमधून समोर आलेल्या तथ्यांनुसार बिगर-महानगरीय प्रांतांमधील डिजिटल पेमेंटचे व्यवहार महानगरांहूनही वेगाने वाढत असून, २०१९ पासून कार्डद्वारे केला जाणारा खर्च पार १७५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

व्हिसाची सल्लागार शाखा व्हिसा कन्सल्टिंग अँड अॅनॅलिटिक्स (VCA)ने केलेल्या या अभ्यासातून बिगर-महानगरीय शहरांमधील (नॉन-मेट्रो सिटीज) वाढीचा कल दिसून आला आहे व या अधिक उत्क्रांत होत असलेल्या ग्राहक वर्गांचे व देशभरातील डिजिटल सोयीसुविधांमध्ये झालेल्या सुधारणांची भर लाभली आहे. व्हिसाजवळील आकडेवारीमधून हाती आलेल्या अंतर्गत माहितीवर आधारित असलेल्या या श्वेतपत्रामध्ये तीन श्रेणींचा सखोल वेध घेतला गेला आहे: श्रेणी ए (Cat A) – बेंगळरू, दिल्ली, मुंबई सारखी महानगरे व पुणे आणि अहमदाबादसारखी शहरे; श्रेणी बी (Cat B) – त्रिची, भुबनेश्वर आणि जयपूरसारखी वेगाने विकसित होत असलेली शहरे आणि जिल्हे; आणि श्रेणी सी+ (Cat C+) – तिरुपूर (तमिळनाडू), सांगली (महाराष्ट्र) आणि तुमकुर (कर्नाटक) सारखी उदयोन्मुख शहरे आणि जिल्हे.

व्हिसा कन्सल्टिंग अँड अॅनालिटिक्सचे भारत व दक्षिण आशियासाठीचे प्रमुख सुश्मित नाथ म्हणाले, “भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट परिसंस्थेमध्ये बिगर-महानगरीय शहरे सुसंधी व आकांक्षांची उत्फुल्ल ऊर्जा असलेली ठिकाणे म्हणून उदयास येत आहे, ज्यांना डिजिटल माध्यमाच्या वेगवान स्वीकाराची चालना प्राप्त आहे. जसजशा या भागांच्या महत्त्वाकांक्षा उत्क्रांत होत आहेत, तसतसे इथले ग्राहक त्यांच्या विशिष्ट गरजांबरहुकुम बेतलेल्या, लवचिक आणि सुरक्षित वित्तीय सेवांचा शोध घेऊ लागले आहेत. जागतिक स्तरावरील अनुभव आणि डीप डेटा विश्लेषण यांची साथ असलेले व्हिसा कन्सल्टिंग अँड अॅनालिटिक्स (VCA) वित्तीय संस्थांना या श्रेणींमध्ये अधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी सुसज्ज करण्याच्या दृष्टीने अत्यंत आदर्श जागी आहे. व्हिसामध्ये आम्ही पेमेंट्सच्या क्षेत्रात महानगरांच्या बाहेरील ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील अशाप्रकारे नवसंकल्पनांना चालना देत देशाच्या प्रगतीला पाठबळ पुरविण्याप्रती कटिबद्ध आहोत.”

वाढीला चालना देणारे प्रमुख घटक: वाढते उत्पन्न, ई-कॉमर्स आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी

बिगर-महानगरीय क्षेत्रांमध्ये डिजिटल पेमेंट्सनी घेतलेल्या उसळीला उत्पन्नाची वाढती पातळी, ई-कॉमर्समध्ये वेगाने झालेली वाढ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये झालेली सुधारणा यांचे इंधन लाभले आहे, व या घटनांना प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY), डिजिटल इंडिया प्रोग्राम तसेच वस्तू व सेवा कर (GST) सारख्या सक्षमीकरण साधणाऱ्या सरकारी योजनांचा पाठिंबा आहे.

व्हिसाच्या आकडेवारीनुसार Cat C+ मधील वर्षाकाठी रु. २ लाखांहून अधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांमध्ये (२०१९ च्या तुलनेत) लक्षणीय चारपट वाढ झाली आहे – ही वाढ Cat A शहरांमध्ये पाहण्यात आलेल्या १.४ पट वाढीपेक्षा लक्षणीयरित्या अधिक आहे. ई-कॉमर्स उद्योगाचा विस्तार हे या वाढीमागचे महत्त्वाचे कारण असून Cat C+ शहरांमध्ये ऑनलाइन खर्चाचा हिश्श्याने ५३ टक्‍क्‍यांवरून ७३ टक्‍क्‍यांवर उडी घेतली आहे, व कपडे व प्रवासासारख्या श्रेणींमध्ये ऐच्छिक खर्च करण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर बिगर-महानगरीय शहरांतील डिजिटल सेवांच्या वापरातही वाढ नोंदवली गेली आहे, जिथे ऑनलाइन गेमिंगवरील खर्चामध्ये १६ पट वाढ झाली आहे व याच कालावधीमध्ये डिजिटल कन्टेन्टवरील खर्चही ९ पटीनी वाढला आहे.

आर्थिक समावेशकतेची दारे खुली करण्यासाठी परिवर्तनकारी संधी

२०१९ साली Cat B+ शहरांमध्ये औपचारिक पतपुरवठ्याची सुविधा सर्वदूर पोहोचण्याचे प्रमाण महानगरीय प्रांतातील ४२.४ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत केवळ १०.५ टक्‍के इतकेच होते. Cat B आणि Cat C+ शहरांतील ग्राहकांना औपचारिक पतपुरवठा करणारी माध्यमे उपलब्ध असली तरीही मर्यादित पत असल्याने त्यांना सावकार किंवा कौटुंबिक कर्जांसारख्या पतपुरवठ्याच्या अनौपचारिक स्त्रोतांवर अधिक प्रमाणात अवलंबून असतात. आणि इथेच लेंडर्स व व्यापारी संस्थांसाठी वाढत्या ग्राहकवर्गाला त्यांच्या गरजेनुसार बेतलेल्या पतपुरवठ्याच्या योजनांमध्ये नाविन्य आणण्याची सुसंधी दडलेली आहे.

नवनव्या गरजांनुसार बेतलेल्या वित्तीय सुविधा

Cat B आणि Cat C+ शहरांतील ग्राहक त्यांच्या गतीशील मूल्यरचना, कर्जाचा लवचिक कालावधी व पारदर्शक, कमी खर्चिक पर्याय यांच्यासह त्यांच्या विशिष्ट गरजा भागवू शकतील अशा, बेतीव, लवचिक आणि समावेशक वित्तीय उत्पादनांचा अधिकाधिक प्रमाणात शोध घेत आहेत. या वाढत्या मागणीचा लाभ घेण्यासाठी व्हिसाने यशाचे चार प्रमुख आधार कोणते याचा शोध घेतला आहे:

• परवड्यासारखे दर: जसजसा वापर वाढत आहे तसतसे परतफेडीच्या लवचिक पर्यायांनाही ग्राहकांकडून अधिकाधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

• आकांक्षा: या ग्राहकांना बक्षिसादाखल मिळणाऱ्या सोयी-सवलती, एकनिष्ठतेचा मोबदला देणारे लॉयल्टी प्रोग्राम्स, फायदे आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होऊ शकेल अशा असे खास अनुभव मिळवून देऊ करणाऱ्या वित्तीय उत्पादनांचा शोध असतो.

• सोय: डिजिटल सेवांना नव्याने सन्मुख झालेले ग्राहक साधी, वापरसुलभ आणि विविध भाषांमधून सेवा पुरवू शकणाऱ्या वित्तीय उत्पदनांना प्राधान्य दिले जाते.

• विश्वासार्हता: त्याचबरोबर ग्राहक विश्वासार्ह, अत्यंत सुरक्षित आणि तक्रारनिवारणाची जोमदार यंत्रणा असलेल्या डिजिटल पेमेंट पद्धतींनाही प्राधान्य देतात.

भारताची अर्थव्यवस्था अधिकाधिक डिजिटाइज्ड होत असताना, व्हिसाच्या पेमेंट उपाययोजना व्यवसायांसाठी तसेच ग्राहकांसाठीही वाढीच्या नव्या संधी खुल्या करू शकतात. आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा, विश्वासार्हता, व्याप्ती आणि पोहोच यांच्यासह आवर्जून घेण्यायोग्या सुविधा देऊ करते व लक्षावधी लोकांना आपल्या वित्तीय क्षमता प्रत्यक्षात आणण्यास सक्षम बनविते.

Related posts

किया सेल्टोस, सॉनेट आणि कॅरेन्सचा देखभालीचा खर्च सर्वात कमी: फ्रॉस्ट अँड सुलिव्हॅन

Shivani Shetty

डोंबिवली एक्सपेरिया मॉल येथे केनडियरचे नवीन शोरूम लॉन्च

Shivani Shetty

इझमायट्रिपचा आदरातिथ्‍य क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment