maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिएतजेटकडून आकर्षक ट्रॅव्‍हल ऑफर्ससह इअर ऑफ द ड्रॅगनचे स्‍वागत!

(मुंबई, फेब्रुवारी २3, २०२४) इअर ऑफ द ड्रॅगन साजरा करत व्हिएतजेट या व्हिएतनामधील आघाडीच्‍या आधुनिक विमानवाहतूक कंपनीने विशेष ऑफर सादर केली आहे: देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय विमानप्रवासासाठी एक-मार्गी, सर्वसमावेशक इकॉनॉमी तिकिटांची किंमत ५,५५५ रूपये  (*). तसेच, प्रवासी बिझनेस तिकिटांवर २० टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. 

ही ऑफर २० फेब्रुवारी २०२४ (दुपारी १२.००) ते २६ फेब्रुवारी २०२४ (रात्री ११.५९) पर्यंत आहे, ज्‍यामधून प्रवाशांसह त्‍यांचे कुटुंबिय व मित्रांना लुनार न्‍यू इअर कालावधीदरम्‍यान प्रवास करण्‍याची संधी मिळेल. या ऑफरमध्‍ये १ एप्रिल ते ३० नोव्‍हेंबर २०२४ पर्यंतच्‍या फ्लाइट्सचा समावेश आहे. तसेच आंतरराष्‍ट्रीय किंवा कनेक्टिंग इंटरनॅशनल फ्लाइट्स बुक करणाऱ्या प्रवाशांना कोड SPRINGBU20 चा वापर करत बिझनेस तिकिटांवर २० टक्‍क्‍यांच्‍या सूटचा फायदा मिळू शकतो. प्रवाशी www.vietjetair.com या वेबसाइटवर आणि व्हिएतजेट एअर मोबाइल अॅप्‍सवर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 

नवीन वसंत ऋतूच्‍या साजरीकरणासह प्रवाशी व्हिएतनाममधील अनेक आकर्षक गंतव्‍यांसाठी ट्रिप्‍सचे सहजपणे नियोजन करू शकतात. एअरलाइन व्हिएतनाममधील शहरांपासून विविध आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍यांपर्यंत फ्लाइट्स ऑपरेट करते, जसे चेंगडू, शांघाय (चीन), ऑस्ट्रेलिया, जाकार्ता (इंडोनेशिया), व्हिएन्टिन (लाओस), आणि सिएम रीप (कंबोडिया). प्रत्‍येक प्रवासामधून प्रत्‍येकाला नवीन व लक्षवेधक गोष्‍टींना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची, तसेच नवीन वसंत ऋतूमध्‍ये प्रवासाचा सर्वोत्तम आनंद घेण्‍याची अद्भुत संधी मिळते. 

वर्षाची सुरूवात उत्‍साहात होण्‍यासाठी बिझनेस तिकिटांसह विमानप्रवास करणारे प्रवासी प्रिमिअम सुविधांचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतात, ज्‍यामध्‍ये समर्पित चेक-इन क्षेत्र व प्रवेशद्वार, आलिशान लाऊंज, खाजगी केबिन्‍ससह फ्लॅटबेड सीट्स आणि ऑर्गनिक फूडसह विविध आंतरराष्‍ट्रीय पाककलांचा समावेश आहे. या सर्व सुविधा १०,००० मीटर उंचीवर उड्डाण घेणाऱ्या विमानामध्‍ये उपलब्‍ध आहेत. एअरलाइन सर्व प्रवाशांना मोफत स्‍काय केअर ट्रॅव्‍हल विमा देते, ज्‍यामधून संपूर्ण प्रवासादरम्‍यान मन:शांती मिळण्‍यासह सर्व फ्लाइट्ससाठी परिपूर्ण संरक्षण मिळते. 

एअरलाइन सध्‍या भारतातील मुंबई, नवी दिल्‍ली, अहमदाबाद, कोची आणि तिरूचिरापल्‍ली या पाच प्रमुख शहरांमध्‍ये दर आठवड्याला ३५ राऊंड-ट्रिप फ्लाइट्स ऑपरेट करते.

(*) एक मार्गी सर्वसमावेशक;

(**) अटी व नियम.       

Related posts

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

भारतातील प्रथम क्रमांकाचे खाद्यतेल ब्रँड फॉर्च्युन तर्फे परंपरेचे पुनरुज्जीवन

Shivani Shetty

सर्वांगीण ईव्‍ही इकोसिस्‍टमच्‍या विकासाला ‘ऑडी इंडिया’चे प्राधान्‍य

Shivani Shetty

Leave a Comment