maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

चौथ्‍या तिमाहीत हायरिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा: टीमलीज स्‍टाफिंग

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४: टीमलीज सर्विसेस या रोजगार, रोजगारक्षमता व सुलभपणे व्‍यवसाय करण्‍यामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत असलेल्‍या भारतातील आघाडीच्‍या स्‍टाफिंग समूहाने आर्थिक वर्ष २०२४ च्‍या दुसऱ्या सहामाहीसाठी (ऑक्‍टोबर २०२३ ते मार्च २०२४) भारतातील रोजगार भागधारकांच्‍या हायरिंग भावना निदर्शनास आणण्‍याकरिता ‘टीमलीज एम्‍प्‍लॉयमेंट आऊटलुक रिपोर्ट’ जारी केला आहे. १४ शहरांमधील १८२० कंपन्‍यांच्‍या डेटासह अहवाल २२ उद्योगांमधील अपेक्षित रोजगार ट्रेण्‍ड्सचे सर्वसमावेशक विश्‍लेषण देतो, जे व्‍यवसाय, एचआर प्रमुख व धोरणकर्त्‍यांसाठी अपरिहार्य संसाधन आहे. अहवालामधून कर्मचारीवर्गात वाढ होण्‍यामधील उल्‍लेखनीय ट्रेण्‍ड निदर्शनास येतो, जेथे ७९ टक्‍के नियोक्‍त्‍यांचा आर्थिक वर्ष २०२४ च्‍या दुसऱ्या सहामाहीत त्‍यांचे कर्मचारीवर्ग कायम ठेवण्‍याचा किंवा वाढ करण्‍याचा मनसुबा आहे.

ग्राहक व रिटेल कंपन्‍यांना मागणी तिसऱ्या तिमाहीतील सणासुदीच्‍या काळात अर्धशहरी व ग्रामीण भागांमध्‍ये काहीशा मंदीच्‍या वातावरणानंतर चौथ्‍या तिमाहीत वाढ होताना पाहायला मिळेल. अहवालामधून आर्थिक सेवा क्षेत्रासाठी सकारात्‍मक भावना दिसून येते. आरबीआयकडून जोखीमयुक्‍त क्रेडिट्ससाठी नियमांचे पालन करण्‍यासंदर्भात वाढत्‍या नियामक दबावामुळे बँका, एनबीएफसी आणि फिनटेक्‍स सावधगिरीने पाऊल उचलताना पाहायला मिळेल.

अहवालामधील निष्‍पत्तींनुसार, दुसऱ्या सहामाहीमध्‍ये हायरिंगमध्‍ये सकारात्‍मक वाढ, तसेच कर्मचारीवर्गाचे विस्‍तारीकरण, नवीन हायरिंग व रिप्‍लेसमेंट हायरिंगची अपेक्षा आहे. कर्मचारीवर्ग विस्‍तारीकरणामधील या वाढीचे श्रेय सरकारी धोरणे व उपक्रमांना जाऊ शकते, ज्‍यांचा रोजगार संधींमध्‍ये वाढ करण्‍याचा आणि व्‍यवसाय अनुकूल वातावरण निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीदरम्‍यान (आर्थिक वर्ष २०२४ ची पहिली तिमाही) भारतातील जीडीपीमध्‍ये ७.८ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली. जीडीपीमधील या प्रबळ वाढीमधून प्रबळ आर्थिक विकास होण्‍यासह देशभरात हायरिंगमध्‍ये वाढ होण्‍याला गती मिळण्‍याची शक्‍यता दिसून येते. हा अहवाल भारतातील रोजगारावर परिणाम करणाऱ्या बहुआयामी घटकांना निदर्शनास आणतो. डेटानुसार, ६९ टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की आर्थिक स्थितीचा रोजगार वातावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तसेच, ५३ टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की व्यवसाय वाढ किंवा विस्‍तारीकरण महत्त्वपूर्ण घटक आहे. सरकार व खाजगी क्षेत्र उद्योजकतेला प्रेरित करत असल्‍यामुळे भारतातील रोजगार संधीमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.

अहवालाचे आणखी एक मोठे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ६७ टक्‍के प्रतिसादकांना ऑक्‍टोबर ते मार्च २०२३-२४ या सहामाहीदरम्‍यान प्रबळ व्‍यवसाय विकास होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून भारताचा आशावादी आर्थिक दृष्टिकोन दिसून येतो. या आशावादामधून निदर्शनास येते की, सणासुदीचा काळ अंतिम टप्‍प्‍यात असताना हायरिंगमध्‍ये गती वाढत जाईल. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍यांपैकी ७९ टक्‍के नियोक्‍त्‍यांना वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी पुढील सहा महिन्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍या संबंधित उद्योगांमधील कर्मचारीवर्गात वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. ७९ टक्‍के नवीन नियुक्‍ती आणि ७४ टक्‍के रिप्‍लेसमेंट नियुक्‍ती झपाट्याने होत आहेत, ज्‍यामधून देशातील कर्मचारीवर्ग बाजारपेठ संपन्न होण्‍याची निदर्शनास येते.

टीमलीज सर्विसेसच्‍या स्‍टाफिंगचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिक नारायण म्‍हणाले, ”भारतातील अर्थव्‍यवस्‍थेची गतीशील उत्‍क्रांती पाहता नियोक्‍ते आशावादी आहेत. ७९ टक्‍के नियोक्‍ते त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये वाढ करण्याचे नियोजन करत आहेत, ज्‍यामधून विशेषत: चौथ्‍या तिमाहीसाठी या आशावादाला साह्य करणारा प्रबळ आर्थिक पाया दिसून येतो. तिसऱ्या तिमाहीमध्‍ये गती काहीशी मंदावलेली असताना देखील रोजगारामधील हा वाढीव ट्रेण्‍ड फक्‍त आकडेवारी वाढवण्‍यापर्यंत मर्यादित नसून आर्थिक विकास व अनुकूल धोरणांचा फायदा घेण्‍यासाठी आणि देशाच्‍या आर्थिक विकासामध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्‍यासाठी धोरणात्‍मक पाऊल देखील आहे.”

Related posts

सुपरस्‍टार रणवीर सिंग टेलिशॉपिंग शो होस्‍टच्या भूमिकेत दिसणार

Shivani Shetty

चेतना जोशी मिसेस वर्ल्ड २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

Shivani Shetty

या ५ कारणासाठी नीरज पांडे यांची डिस्कव्हरी चॅनल वर प्रसारित होणारी ‘सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स’ हि डॉक्युमेंटरी अवश्य पहा

Shivani Shetty

Leave a Comment