maharashtraprimenews
ठळक बातम्या
AviationBreaking newsgeneralPublic Interest

व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्‍यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्‍या माध्‍यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्‍टीव्‍हीटी वाढवली

(Tiruchirappalli, Tamil Nadu, India, October 05, 2023) व्हिएतजेटने २७ सप्‍टेंबर रोजी अधिकृतरित्‍या हो ची मिन्‍ह सिटी (व्हिएतनाम) आणि तिरूचिरापल्‍ली (भारत) दरम्‍यान थेट फ्लाइट सादर केली आहे, जी २ नोव्‍हेंबर २०२३ रोजी उड्डाणाला सुरूवात करेल आणि सुरूवातीला दर आठवड्याला तीन रिटर्न फ्लाइट्सची सुविधा देण्‍यात येईल.

या अनुषंगाने दर सोमवार, बुधवार व शुक्रवार फ्लाइट्स तिरूचिरापल्‍लीवरून रात्री १२.३० वाजता (स्‍थानिक वेळ) उड्डाण घेतील आणि एचसीएमसी येथे सकाळी ७ वाजता (स्‍थानिक वेळ) उतरतील. दर रविवार, मंगळवार व गुरूवार रिटर्न फ्लाइट्स एचसीएमसी येथून रात्री ८ वाजता (स्‍थानिक वेळ) उड्डाण घेतील आणि तिरूचिरापल्‍ली येथे रात्री ११.३० वाजता (स्‍थानिक वेळ) उतरतील.

तामिळनाडू ते व्हिएतनामपर्यंत थेट विमानसेवा तिरूचिरापल्‍ली विमानतळाच्‍या आणि दोन्‍ही देशांमधील पर्यटन उद्योगाच्‍या विकासासाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे. यामुळे व्हिएतनाम व भारतामधील पर्यटन, आर्थिक व व्‍यापार सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधाच्‍या विकासाला अधिक चालना मिळण्‍याची अपेक्षा आहे.

व्‍हेण्‍टप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत व्हिएतजेटचे कमर्शियलचे उपाध्‍यक्ष श्री. जय एल लिंगेश्‍वर म्‍हणाले, ”कोची ते हो ची मिन्‍ह सिटीपर्यंत फ्लाइटसह या नवीन विमानसेवेमधून व्हिएतजेटची हवाईमार्गाद्वारे भारताचा दक्षिणी भाग आणि व्हिएतनाम शहरांना कनेक्‍ट करण्‍याची क्षमता दिसून येते. यामुळे दोन्‍ही देशांमधील लोकांना किफायतशीर दर व उत्तम सेवांसह प्रवास व ट्रेड एक्‍स्‍चेंजेसच्‍या अधिक संधी मिळाल्‍या आहेत.

व्हिएतनाम नॅशनल ऑथोरिटी ऑफ टूरिझमच्‍या मते, २०२३ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये व्हिएतनामला प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांच्‍या संख्‍येमध्‍ये महामारीपूर्वी २०१९ मधील आकडेवारीच्‍या तुलनेत २०० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली. ज्‍यामुळे भारत व्हिएतनामच्‍या टॉप १० इनबाऊंड बाजारपेठांमध्‍ये सामील झाला आहे.

व्हिएतनामचे  प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाणारे हो ची मिन्ह सिटी हे आशियाई संस्कृतीच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे आणि आधुनिक महानगराच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, तसेच व्हिएतनाममधील इतर शहरांशी आणि प्रादेशिक गंतव्यस्थानांशी असलेल्‍या सोईस्‍कर कनेक्‍टीव्‍हीटीमुळे पसंतीचे स्‍थान आहे. तसेच विविध प्रकारचे रंग व साऊंड्स हे पर्ल ऑफ द फार ईस्‍टचे वैशिष्‍ट्य आहे, ज्‍यामुळे पर्यटक, जोडपे व कुटुंबांमध्‍ये सर्वात लोकप्रिय आशियाई पर्यटन स्‍थळ म्‍हणून हो ची मिन्‍ह सिटीचे स्‍थान अधिक दृढ होत आहे.

हो ची मिन्‍ह सिटीमध्‍ये व्हिएतजेट पर्यटकांना एअरलाइनचे व्‍यापक फ्लाइट नेटवर्क, सोईस्‍कर फ्लाइट वेळ आणि किफायतशीर तिकिट दरांच्‍या माध्‍यमातून व्हिएतनाममधील प्रसिद्ध किनारी स्‍थळे जसे डा नांग, न्‍हा ट्रँग यांचा आनंद घेण्‍याची संधी देऊ शकते.

याप्रसंगी एअरलाइन भारतीयांना २५ सप्‍टेंबर ते २५ ऑक्‍टोबर २०२३ पर्यत स्‍पेशल प्रमोशन सादर करत आहे, जे भारत ते व्हिएतनामपर्यंतच्‍या फ्लाइट्ससाठी बिझनेस व स्‍कायबॉस सीट्ससाठी (*) लागू आहे. प्रवासाच्‍या तारखा १ ऑक्‍टोबर २०२३ ते ३० नोव्‍हेंबर २०२३ पर्यंत आहेत. तसेच, व्हिएतजेट भारतीयांसाठी फक्‍त ५,५५५ रूपयांच्‍या (**) वन-वे प्राइससह (एक-मार्गी विमानप्रवास किंमत) दर बुधवार, गुरूवार व शुक्रवार सिग्‍नेचर मेगा सेल प्रमोशन्‍स देत आहे. सविस्‍तर माहिती www.vietjetair.com या वेबसाइटवर किंवा त्‍यांच्‍या मोबाइल अॅपवर उपलब्‍ध आहे.

२ नोव्‍हेंबर २०२३ पासून व्हिएतजेट एअरक्राफ्टच्‍या आधुनिक ताफ्याचा वापर करत भारतातील पाच शहरे नवी दिल्‍ली, मुंबई, अहमदाबाद,कोची व तिरूचिरापल्‍ली आणि व्हितनाममधील हनोई व हो ची मिन्‍ह सिटी यांना कनेक्‍ट करणाऱ्या ३५ साप्‍ताहित राऊंड-ट्रिप फ्लाइट्स ऑपरेट करेल.

(*) अटी व शर्ती लागू;

(**) कर, शुल्‍क समाविष्‍ट.

Related posts

किटकॅटकडून तीन संपन्‍न व स्‍वादिष्‍ट व्‍हेरिएण्‍ट्ससह नवीन प्रिमिअम श्रेणी लाँच

Shivani Shetty

अक्षय कुमारचा 56 वा वाढदिवस! IMDb वरील त्याच्या सर्वोच्च रेटींग असलेल्या 11 मूव्हीजची यादी

Shivani Shetty

एसीटी फायबरनेटचे मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल

Shivani Shetty

Leave a Comment