पुणे, भारत: पॉवर सोल्युशन्सच्या क्षेत्रातील आघाडीवरील टेक्नोलॉजी प्रोव्हायडर असलेल्या कमिन्स इंडियाने आपल्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या बिझनेस स्कूल (बी-स्कूल) केस स्टडी स्पर्धेचे नवे पर्व ‘रिडिफाइन 2023’ची घोषणा केली आहे. ह्या स्पर्धेमध्ये भारतातील 18 सहयोगी बी-स्कूल्सचे विध्यार्थी भाग घेऊ शकतील. ह्या वर्षी केस स्टडीची थिम “अनलॉकिंग द पॉवर ऑफ डिजिटायझेशन इन द आफ्टरमार्केट: एनहांसिंग एफिशिअन्सी, कस्टमर एक्सपेरियन्स एंड कॉम्पिटिटिव एडवांटेज इन बी2बी (B2B) बिज़नेस एनवायरनमेंट” या विषयसूत्रामधून आफ्टरमार्केटमधील डिजिटलायझेशनची ताकद वापरत B2B व्यापाराच्या क्षेत्राची कार्यक्षमता, ग्राहकअनुभव आणि स्पर्धात्मकतेतील लाभांत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
रिडिफाइन हा बी-स्कूल्सना सहभागी करून घेणारा वार्षिक उपक्रम आहे, ज्यामध्ये भविष्यातील व्यावसायिक लीडर्स विकसित करण्यावर भर दिला जातो. या उपक्रमातून दरवर्षी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष जगातील उद्योगक्षेत्रातील एक अनोखे आव्हान ठेवले जाते, जे पार करताना त्यांना आपले धोरणात्मक कौशल्य, नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची क्षमता आणि विश्लेषण कौशल्य प्रदर्शित करता येते. वेगवेगळ्या फेऱ्यांमधून पुढे जाणारी ही स्पर्धा 8 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होणार आहे आणि 20-21 नोव्हेंबर 2023 रोजी कमिन्स इंडियाच्या पुणे येथील ऑफिस कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या भव्य अंतिम सोहळ्यामध्ये तिची सांगता होणार आहे. विजेत्या टीमला रोख बक्षिसासह कमिन्स इंडियाच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
स्पर्धेच्या घोषणेबद्दल आपले मत व्यक्त करताना कमिन्स इंडियाच्या ह्यूमन रिसोर्सेस लीडर अनुपमा कौल म्हणाल्या, “रिडिफाइन ही आमची वार्षिक बी-स्कूल केस स्टडी स्पर्धा उदयोन्मुख प्रतिभेला सक्षम बनविण्याच्या आणि मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने आखण्यात आली आहे, जिथे त्यांच्यातील अंगभूत क्षमतांना मुक्तपणे व्यक्त होता येईल व त्यातून भविष्यातील नेतृत्व व नव्या वाटा निर्माण करणाऱ्या व्यक्ती घडू शकतील. ही स्पर्धा व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीची मानसिकता निर्माण करते आणि खऱ्याखुऱ्या जगातील व्यवसायांसमोरील आव्हाने सोडविण्यासाठी आपली नेतृत्वकुशलता, व्यावसायिक चाणाक्षपणा आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधण्याची क्षमता प्रत्यक्ष वापरात आणण्याची संधी त्यांना देते. देशाच्या अग्रगण्य बिझनेस स्कूल्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काही सर्वात तेजस्वी युवा प्रतिभावंतांशी सहयोग साधण्यासाठी आणि त्यांच्याकडून मौल्यवान विचारधन मिळविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. शिकणे ही एक आयुष्यभर चालणारी निरंतर गोष्ट आहे आणि रिडिफाइन विद्यार्थ्यांना आपले कौशल्य परजून घेण्याची व भविष्यातील आव्हाने व संधींसाठी स्वत:ला तयार करण्याची एक अनोखी संधी आहे.”
ही केस स्टडी स्पर्धा आयोजित करण्यामागचे कारण विशद करताना कमिन्स इंडियाचे स्ट्रॅटेजी लीडर सुब्रमणियन चिदंबरन म्हणाले, “आजच्या गुंतागूंतीच्या आणि सतत बदलत्या जगामध्ये एखाद्या व्यवसायाला आपली भरभराट साधायची असेल तर त्यासाठी नवसंकल्पनांना आकार देणे अत्यावश्यक आहे. सरकार, शिक्षणक्षेत्र, उद्योगसंस्था आणि समुदायांसारख्या व्यवसायाशी संबंधित विविध प्रकारच्या घटकांशी सहयोग साधणे हा अशा नवसंकल्पना साकारण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे कमिन्समध्ये आम्हाला ठामपणे वाटते. युवा मनांमध्ये सर्जनशीलतेची ठिणगी चेतविण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष जगातील व्यवसायांसमोरील आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आमच्या रिडिफाइन केस स्टडी स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही केस स्टडी बुद्धिमत्तेचा कस लावणारी वाटेल याची मला खात्री आहे आणि त्यांच्याकडून येणारे मर्मस्पर्शी विचार आमच्यासाठी अनमोल असतील.”
या केस स्टडीव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना कमिन्स इंडियातील नेतृत्वासोबत संवादात्मक सत्रांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल. युवा प्रतिभावंतांमध्ये कमिन्सचा बिझनेस व ब्रॅण्ड यांविषयीची जागरुकता वाढविण्यासाठी कंपनीकडून एक स्वतंत्र स्पर्धेचे आयोजनही केले जाईल, ज्यात विद्यार्थ्यांची व्यवसायक्षेत्रातील नवे प्रवाह, तंत्रज्ञान व कमिन्सविषयीचे ज्ञान या विषयांवर किती पकड आहे हे आजमावले जाईल.
2022 मध्ये रिडिफाइनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि १२ पार्टनर बी-स्कूल्सच्या 1800 हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी आपले नाव नोंदविले होते. गेल्या वर्षी, झेव्हियर लेबर रिलेशन्स इन्स्टिट्यूट (XLRI), जमशेदपूर (दिल्ली कॅम्पस) ची टीम व्हिजन REDEFINE2022 ची विजेती ठरली होती. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS), मुंबईची टीम क्वाड्रँगल्स या स्पर्धेची प्रथमउपविजेती ठरली.
रिडिफाइन 2023 ही स्पर्धा पुढील यादीमधील बी-स्कूल्समधून दोन वर्षांचा प्रमुख PGP/PGDM/PGDBM/MBA अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या बोनाफाइड विद्यार्थ्यांसाठी खुली आहे:
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ
- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट, मुंबई
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, थिरुचिरापल्ली
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, हैदराबाद
- के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई
- मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, गुरगाव
- नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई
- एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई
- सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुणे
- सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे
- झेव्हिअर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुबनेश्वर
- झेव्हिअर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI), जमशेदपूर
REDEFINE विषयी अधिक जाणून घेण्यासाठी – Cummins Redefine | Cummins Inc. येथे भेट द्या आणि LinkedIn, Facebook, Instagram आणि YouTube व फॉलो करा.
कमिन्स इंडिया लिमिटेड बाबत:
१९६२ मध्ये स्थापना करण्यात आलेली आणि पुण्यामध्ये मुख्यालय असलेली कमिन्स इंडिया लिमिटेड भारतातील कमिन्स ग्रुपचा भाग आहे. कमिन्स इंडिया लिमिटेड ऊर्जा निर्मिती, औद्योगिक व ऑटोमोटिव्ह बाजारपेठांसाठी डिझेल आणि नैसर्गिक वायू इंजिन्सची देशातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कमिन्स इंडिया लिमिटेडचे ४८० हून अधिक सर्विस पॉइण्ट्ससह १८ एक्सक्लुसिव्ह ४एस वितरकचे देशव्यापी नेटवर्क आहे, जे भारत, नेपाळ व भूतानमधील ग्राहकांना कमिन्स उपकरण व इंजिन्सच्या अपटाइमसाठी उत्पादने, सेवा व आफ्टर-मार्केट सोल्यूशन्स देते.
कमिन्स ग्रुप इन इंडिया बाबत:
कमिन्स इन इंडिया ग्रूप हा ऊर्जा क्षेत्रातील पूरक बिजनेस युनिटसचा अग्रणी ग्रूप आहे व तो सर्विस इंजिन्स आणि संबंधित तंत्रज्ञान जसे फ्युएल सिस्टीम्स, एअर हँडलिंग, फिल्टरेशन, इमिशन सोल्युशन्स आणि इलेक्ट्रिकल ऊर्जा निर्मिती सिस्टीम्स अशा संबंधित तंत्रज्ञानांचे डिझायनिंग, उत्पादन व वितरण आणि सर्विसिंग करतो. नुकतेच मेरिटोरच्या संपादनासह कमिन्सने आपला पोर्टफोलिओ विस्तारित करत व्यावसायिक वाहन व औद्योगिक बाजारपेठांसाठी ड्राइव्हट्रेन, मोबिलिटी, ब्रेक लाइनिंग, आफ्टरमार्केट व इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सोल्यूशन्सचा समावेश केला आहे. कंपनीचे तंत्रज्ञान व अग्रणी उपक्रम देशभरातील वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम मूल्यामध्ये नवोन्मेष्कारी सोल्यूशन्स व विश्वासार्ह सेवा देत आहेत. कंपनीचा उच्च-कार्यक्षम दृष्टीकोन ग्राहक केंद्रितपणा, प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्यांची क्षमता यावर आधारित आहे. २८.१ बिलियन डॉलर्स कमिन्स इन्क. यूएसएचा भाग असलेली भारतातील कमिन्स देशातील २०० ठिकाणी असलेल्या १२ कायदेशीर कंपन्यांची ग्रुप आहे आणि त्यांचे १०,००० हून अधिक कर्मचारी आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या: cummins.com.