maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एल्‍गी (ELGi) कडून भारतात कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍ससाठी स्‍मार्ट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम ‘Air~Alert’ सादर

कोईम्‍बतूर, १३ सप्‍टेंबर २०२३: एल्‍गी (Elgi) इक्पिमेण्‍ट्स लिमिटेड या जगातील अग्रगण्‍य एअर कम्‍प्रेसर उत्‍पादक कंपनीने आज भारतीय बाजारपेठेसाठी आयओटी-आधारित एअर कम्‍प्रेसर मॉनिटरिंग सिस्‍टमAir~Alertच्‍या सादरीकरणाची घोषणा केली. या वर्षाच्‍या सुरूवातीला जर्मनीमधील हॅनोव्‍हर मेसे येथे यशस्‍वी लाँचनंतर एल्‍गीAir~Alert स्‍मार्ट २४/७ रिमोट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम आता नवीन व विद्यमान इन्‍स्‍टॉलेशन्‍ससाठी* भारतातील एल्‍गीच्‍या ग्राहकांसाठी उपलब्‍ध आहे.

Air~Alert ही डेटा ट्रान्‍समिशन व विश्‍लेषण सेवा आहे, जी महत्त्वाच्‍या घटकांवर देखरेख ठेवते आणि वापरकर्त्‍यांना कृतीशील इनसाइट्स व अलर्टस् देते. या इनसाइट्ससह ग्राहक अपटाइम सुधारू शकतात आणि एअर कम्‍प्रेसर कार्यक्षमतेशी संबंधित स्‍मार्ट मॉनिटरिंग व डेटासह कार्यक्षमता वाढवू शकतात. ही सेवा ग्राहकांना वेळेत कृती करण्‍यास आणि संभाव्‍य फेल्युअर्सना प्रतिबंध करण्‍यास सक्षम करते. तसेच,Air~Alert एअर कम्‍प्रेसरवर दुरूनच २४/७ देखरेख ठेवते. ही सिस्‍टम ट्रेण्‍ड ग्राफ्स आणि ऑपरेटिंग घटकांसह डिस्‍चार्ज प्रेशर, ऑईल टेम्‍परेचर, व्‍हेरिएबल फ्रिक्‍वेन्‍सी ड्राइव्‍ह (व्‍हीएफडी) स्‍पीड (बसवले असल्‍यास), एकूण कार्यसंचालन वेळ, ट्रिप्‍स यांबाबत माहिती देते. तसेच जगात कुठेही दूरून उपलब्‍ध असलेल्‍या लाइव्‍ह ऑनलाइन इंटरफेसबाबत अलर्ट देते.

Air~Alert ग्राहकांना व एल्‍गी चॅनेल सहयोगींना नियोजित मेन्‍टेनन्‍स व त्रुटींबाबत देखील माहिती देते, सतत होणाऱ्या फेल्युअर्सबाबत आधीच कळवते. प्राप्‍त झालेल्‍या डेटानुसार एकूण हेल्‍थ व ऑपरेटिंग घटकांवर,तसेच पुढील सर्विसची गरज आणि प्रतिबंधात्‍मक देखभाल यांबाबतचा मासिक सारांश अहवाल ग्राहकांना दिला जातो.

कम्‍प्रेसर्ससंदर्भात ऑपरेशनल व परफॉर्मन्‍स डेटा कम्‍प्रेसर कंट्रोलरमधीलAir~Alert मधून प्राप्‍त केला जातो, एन्क्रिप्‍टेड स्‍वरूपात प्रसारित केला जातो आणि क्लाउडमधील सुरक्षित व समर्पित Air~Alert सर्व्हरवर पाठवला जातो. त्‍यानंतर स्मार्ट अल्गोरिदम कृतीशील अलर्टस्, अहवाल आणि ट्रेण्‍ड्ससह सर्वोत्तम अंदाज वर्तवण्‍यासाठी डेटावर काम करते,जो ऑपरेटर्सना वाचण्‍यास सुलभ कृतीशील डॅशबोर्ड म्‍हणून सुरक्षितपणे सादर केला जातो.

संपूर्ण प्रक्रियेदरम्‍यान स्‍मार्ट विश्‍लेषण प्रदान करण्‍यासाठी डेटाची रचना व विश्‍लेषण केले जाते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना देखभाल कृतींचे नियोजन करण्‍यास मदत होते आणि कम्‍प्रेसरसह ऊर्जा कार्यक्षमतेमध्‍ये वाढ होते. Air~Alert फेल्युअर प्रेडिक्‍शन मॉड्यूल कम्‍प्रेसर भविष्‍यात निकामी होऊ शकते का याबाबत देखील अंदाज सांगते. प्रक्रियेच्‍या शेवटी डेटा समजण्‍यास सुलभ होईल अशा अलर्टस् व अहवालांमध्‍ये भाषांतरित केला जातो, ज्‍यामुळे वापरकर्त्‍याला वेळेवर कृती करण्‍यास मदत होते.

एल्‍गीच्‍या Air~Alert सह कृतीशील माहिती देणाऱ्या अत्‍यंत माहितीपूर्ण ट्रेण्‍ड्सवर देखरेख ठेवू शकतात आणि योग्‍य कृती करू शकतात, जसे:

  • वापराच्‍या प्रमाणानुसार ऑपरेटिंग प्रेशर बॅण्‍ड ऑप्टिमाइज करू शकतात.
  • विद्यमान फिक्‍स केलेल्‍या स्‍पीट युनिटच्‍या जागी व्‍हेरिएबल स्‍पीड व्‍हीएफडी युनिट बसवू शकतात/ किंवा रिट्रोफिट व्‍हीएफडीची भर करू शकतात.
  • वापराचे प्रमाण अत्‍यंत कमी असल्‍यास ऊर्जा कार्यक्षम, कमी आकाराचा कम्‍प्रेसर प्रदान करू शकतात.
  • कालांतराने सर्वाधिक वापरामुळे अनपेक्षित बदल झाल्‍यास लीक (गळती) ओळखू शकतात.

*Air~Alert डिवाईस फॅक्‍टरीत नवीन एल्‍गी ईजी, एबी व ओएफ सिरीज कम्‍प्रेसर्समध्‍ये बसवता येऊ शकतो किंवा न्‍यूरॉन III, III+,किंवा IV कंट्रोलरसह युनिट्सवर रेट्रोफिट करता येऊ शकतो.

Related posts

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे तिमाही परिणामांची घोषणा

Shivani Shetty

सुपरस्‍टार रणवीर सिंग टेलिशॉपिंग शो होस्‍टच्या भूमिकेत दिसणार

Shivani Shetty

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरसोबत जगताना: परतलेल्या ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रगत उपचारपद्धतींची मदत

Shivani Shetty

Leave a Comment