मुंबई, २ फेब्रुवारी २०२४:* पेटीएमच्या सहयोगी बँकेला नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) निर्देश मिळाले. या निर्देशांबाबत प्रतिक्रिया देत पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी वापरकर्त्यांना आश्वासन दिले की, पेटीएम ॲप २९ फेब्रुवारी नंतर देखील कार्यरत राहिल. विजय शेखर शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”प्रत्येक पेटीएमरला सांगू इच्छितो की, तुमचे आवडते ॲप कार्यरत आहे आणि २९ फेब्रुवारी नंतर देखील कार्यरत राहिल. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी आणि प्रत्येक पेटीएम टीम सदस्य तुम्हाला सलाम करतो.”
त्यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे, ”प्रत्येक आव्हानासाठी सोल्यूशन असते आणि आम्ही सर्व अनुपालनासह देशातील आमच्या ग्राहकांना सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत. भारताला आर्थिक सेवांमधील पेमेंट नाविन्यता आणि सर्वसमावेशकतेसाठी जागतिक मान्यता मिळत राहतील, ज्यामध्ये पेटीएमकरो सर्वात मोठे चॅम्पियन ठरेल.”
To every Paytmer,
Your favourite app is working, will keep working beyond 29 February as usual.
I with every Paytm team member salute you for your relentless support. For every challenge, there is a solution and we are sincerely committed to serve our nation in full…— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) February 2, 2024
आरबीआयच्या निर्देशानंतर पेटीएम ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यामध्ये म्हटले आहे की, अॅप सुरू आहे आणि सुरू राहिल.
१. पेटीएमद्वारे देण्यात येणाऱ्या बहुतांश सेवा विविध बँकांसोबत (सहयोगी बँकासह) सहयोगाने असल्यामुळे पेटीएम आणि त्यांच्या सेवा २९ फेब्रुवारीनंतर देखील कार्यरत राहतील.
२. पेटीएमला कळवण्यात आले आहे की याचा वापरकर्त्यांच्या बचत खाती, वॉलेट्स, फास्टटॅग्स व एनसीएमसी खात्यांमधील जमा रकमेवर काहीच परिणाम होणार नाही आणि ते विद्यमान शिल्लक रकमेचा वापर करणे सुरू ठेवू शकतात.
३. पेटीएमच्या सहयोगी बँकेबाबत नुकतेच आरबीआयने सादर केलेल्या निर्देशांचा पेटीएम मनी लिमिटेडच्या (पीएमएल) कार्यसंचालनांवर किंवा इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा एनपीएसमधील ग्राहकांच्या गुंतवणूकांवर कोणताच परिणाम होणार नाही.
४. पेटीएमच्या इतर आर्थिक सेवा जसे कर्ज वितरण आणि विमा वितरण कोणत्याही प्रकारे त्यांच्या सहयोगी बँकेशी संबंधित नाहीत आणि नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील.
५. पेटीएमच्या ऑफलाइन पेमेंट नेटवर्क ऑफरिंग्ज जसे पेटीएम क्यूआर, पेटीएम साऊंडबॉक्स, पेटीएम कार्ड मशिन नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, जेथे त्यामध्ये नवीन ऑफलाइन मर्चंट्सना देखील ऑनबोर्ड करता येऊ शकते.
६. पेटीएम अॅपवरील मोबाइल रिचार्जेस्, सबस्क्रिप्शन्स आणि इतर रिकरिंग पेमेंट्स सुलभपणे कार्यरत राहतील.