मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३: अभिबस या भारतातील सर्वोच्च रेटिंग असलेल्या आघाडीच्या बस बूकिंग अॅपने सणासुदीच्या काळासाठी केवळ १ रुपये एवढ्या कमी दरात बस तिकिटांची ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर तत्काळ सुरू होत असून १९ ऑक्टोबर २०२३ ते २५ ऑक्टोबर २०२३ या काळातील प्रवासासाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी स्मरणीय प्रवासासाठी जाणे शक्य होणार आहे.
मर्यादित काळासाठी दिली जात असलेली ही ऑफर म्हणजे अभिबसने ग्राहकांना दिलेली दिवाळीपूर्व भेट आहे. आपल्या मौल्यवान ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिबसने ही ऑफर जाहीर केली आहे. प्रवाशांना ही ऑफर उपलब्ध करून घेण्यासाठी ‘लकी१’ हा कूपन कोड वापरावा लागेल.
अभिबसचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहित शर्मा म्हणाले, “सुट्टीचा काळ म्हणजे एकत्र जमण्याचा व आनंदाचा काळ असतो आणि अभिबसला या साजरीकरणाचा भाग होण्याची इच्छा आहे. आमची ‘एक रुपयाच्या प्रवासाची ऑफर’ हा आनंदाचा प्रसार करण्याचा व प्रवास सर्वांसाठी परवडण्याजोगा करण्याचा आमचा मार्ग आहे. सर्वांना आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची व प्रसन्न स्मृती साठवण्याची संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे.”
सर्वोत्तम दर्जाची ग्राहकसेवा, तत्काळ बस बुकिंगची सुविधा, विनाकटकट रद्दीकरण, २४x७ ग्राहक सहाय्य, अखंडित प्रवास अनुभवासाठी बसचे रिअर टाइम ट्रॅकिंग करण्याची सुविधा, यांप्रती दाखवल्या जाणाऱ्या बांधिलकीसाठी अभिबस प्रसिद्ध आहे. याशिवाय अॅपमध्ये ‘पिंक सीट’ नावाचे एक अनन्यसाधारण फंक्शन आहे. याद्वारे महिला प्रवाशांना महिला प्रवाशांनी आरक्षित केलेल्या आसनालगतचेच आसन दिले जाते.