maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३: क्विक हील या सायबरसिक्‍युरिटी सोल्‍यूशन्‍समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित करत व्‍हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत सिक्‍युरिटी सोल्‍यूशन सायबरसिक्‍युरिटीमधील गुंतागूंतींना सुलभ करते. यामध्‍ये पहिल्‍यांदाच ऑन-द-गो क्‍लाऊड-आधारित सुरक्षितता व्‍यासपीठ मेटाप्रोटेक्‍टसह सिक्‍युरिटी अॅण्‍ड प्रायव्‍हसी स्‍कोअर्स व यूट्यूब कन्‍टेन्‍ट कंट्रोल यांसारखी वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे सुलभता व सुरक्षिततेचा शोध घेत असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी हे अल्टिमेट सोल्‍यूशन आहे.

व्‍हर्जन २४ ची खासियत म्‍हणजे गोडीप.एआय तंत्रज्ञान, सेल्‍फ-अवेअर मालवेअर-हंटिंग इनोव्‍हेशन, जे सिस्‍टमच्‍या कार्यक्षमतेबाबत तडजोड न करता उदयोन्‍मुख धोक्‍यांपासून अधिक सुरक्षिततेची खात्री देते. रॅन्‍समवेअर, मालवेअर, झीरो डे असुरक्षितता निराकरणाचा समावेश असलेल्‍या अपवादात्‍मक डिटेक्‍शन क्षमतेचा ३० वर्षांचा वारसा असलेली आणि जागतिक स्‍तरावर एक्‍स्‍पीरो इन्‍फेक्‍टरसाठी असुरक्षिततेचे निराकरण करणारे पहिले व एकमेव देशातील सर्वात मोठ्या मालवेअर विश्‍लेषण केंद्र सेक्‍यूराइट लॅब्‍समधील व्‍यावसायिकांचे व्‍यापक कौशल्‍य व क्षमतांचा लाभ घेत व्‍हर्जन २४ तुम्हाला सेफ ठेवण्‍याची आणि संभाव्‍य फसवणूक करणाऱ्यांची माहिती देण्‍याची हमी देते.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्‍हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सद्वारे समर्थित गोडीप-एआय असलेल्‍या व्‍हर्जन २४  मध्‍ये पहिल्‍यांदाच मेटाप्रोटेक्‍ट, सिक्‍युरिटी अॅण्‍ड प्रायव्‍हसी सिन्‍क्रोनायझिंग व्‍यासपीठ आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते चालता-फिरता एका क्लिकसह अनेक डिवाईसेसचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. तसेच, आमची यूटयूब सुपरव्हिजन वैशिष्‍ट्ये विविध घटकांवर आधारित कन्‍टेन्‍ट फिल्‍टरिंगची सुविधा देतात, ज्‍यामुळे मुले विनासायास व्‍यासपीठाचा वापर करू शकतात, तर पालकांना खात्री मिळते की त्‍यांची मुले आक्षेपार्ह कन्‍टेन्‍ट पाहणार नाहीत. याव्‍यतिरिक्‍त, आमच्‍या

सिक्‍युरिटी अॅण्‍ड प्रायव्‍हसी स्‍कोअर कार्यक्षमता वैयक्तिकृत मूल्‍यांकन व कृतीशील शिफारसी देतात. यासह, क्विक हील डिजिटल संरक्षणामध्‍ये नवीन मानक स्‍थापित करत आहे, तसेच भारतातील व जगभरातील वापरकर्त्‍यांना डिजिटली सेफ राहण्‍याची खात्री देत आहे.”

व्‍हर्जन २४ युजर-अनुभवाला प्राधान्‍य देते, सर्व वयोगटातील व टेक्निकल पार्श्‍वभूमींमाील वापरकर्त्‍यांना सिम्प्लिफाईड यूआय उपलब्‍ध करून देते. यामध्‍ये दोन उल्‍लेखनीय वैशिष्‍ट्ये आहेत – सिक्‍युरिटी स्‍कोअर आणि प्रायव्‍हसी स्‍कोअर, जे डिवाईसेस सुरक्षिततेचे वैयक्तिकृत मूल्‍यांकन व वापरकर्त्‍यांची प्रायव्‍हसी स्थिती, तसेच सुधारणेसाठी कृतीशील शिफारसी देतात.

प्रगत रिमोट सिक्‍युरिटी व प्रायव्‍हसी व्‍यवस्‍थापनासाठी सर्वोत्तम क्‍लाऊड-आधारित व्‍यासपीठ मेटाप्रोटेक्‍ट वापरकर्त्‍यांना एका क्लिकमध्‍ये कुठूनही त्‍यांच्‍या कुटुंबामधील सर्व सदस्‍यांच्‍या डिवाईसेसच्‍या सुरक्षिततेची सुविधा देते. यामध्‍ये लायसेन्‍स सबस्क्रिप्‍शन मॅनेजमेंट, स्‍मार्ट पॅरेण्टिंग, अॅण्‍टी-थेफ्ट उपाय यांसारखी वैशिष्‍ट्ये आहेत, जी विविध डिवाईसेसमध्‍ये एकसंधी सिन्‍क्रोनाइज्‍ड सायबरसिक्‍युरिटी अनुभव देतात. हे क्‍लाऊड-आधारित व्‍यासपीठ लवकरच अॅप म्‍हणून उपलब्‍ध असणार आहे.

Related posts

IMDb द्वारे गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

Shivani Shetty

डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ‘हिस्टरी हंटरच्या’ एपिसोड 2 मध्ये मनिष पॉल नालंदाच्या हरवलेल्या ज्ञानाचा शोध घेणार

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा मुंबईत विस्तार

Shivani Shetty

Leave a Comment