maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इन्शुरन्सदेखोची सीरिज बी फंडिंगमध्ये ६० दशलक्ष डॉलर्सची उभारणी

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३: इन्शुरन्सदेखो या भारताच्या आघाडीच्या इन्शुरटेक कंपनीने सध्याच्या सीरिज बी फंडिंग फेरीत ६० दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली असून त्यांनी कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नवीन भांडवलाच्या मदतीने ज्यात समभाग आणि कर्ज या दोन्हींचा समावेश आहे, या कंपनीने आपल्या कॅप टेबलमध्ये नवीन ख्यातनाम गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे आणि त्याचवेळी विद्यमान ग्राहकांचा विश्वासदेखील कायम राखला आहे. या गुरूग्रामस्थित स्टार्टअपसाठी २०२३ मधली ही दुसरी निधी उभारणीची फेरी आहे. त्यांनी आपला उभारलेला निधी २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक केला असून आघाडीची भारतीय इन्शुअरटेक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.

इन्शुरन्सदेखोचे सीईओ आणि संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले की, “आमच्या स्वप्न आणि क्षमतांमध्ये विश्वास ठेवल्याबद्दल गुंतवणूकदारांचे आम्ही खूप आभारी आहोत. आमचे ध्येय कायमच विमा सर्व भारतीयांसाठी सहजसाध्य आणि वापरकर्ता स्नेही असावा असे आहे आणि या वित्तपुरवठ्याद्वारे आम्ही आमच्या प्रयत्नांचा वेग वाढवू, जास्तीत-जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवू आणि इन्शुअरटेक क्षेत्रात नावीन्यपूर्णता आणू शकू. भारतातील विमा क्षेत्र हे तंत्रज्ञानावर आधारित क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. माझा विश्वास आहे की, इन्शुरन्सदेखो या बदलाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक म्हणून आघाडी घेण्यासाठी सज्ज आहे.”

जपानी दिग्गज कंपनी मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप आयएनसी, (एमयूएफजी), विमा कंपनी बीएनपी परिबस कार्डिफ यांनी युरोपियन गुंतवणूक कंपनी युरेझिओकडून व्यवस्थापित इन्शुअरटेक फंड भारतावर लक्ष केंद्रित करणारा फिनटेक फंड आणि योगेश महानसरिया फॅमिली ऑफिसच्या माध्यमातून नवीन गुंतवणूकदार म्हणून प्रवेश केला आहे. इन्शुरन्सदेखोचे विद्यमान गुंतवणूकदार असलेले टीव्हीएस कॅपिटल, गोल्डमन सॅशच एसेट मॅनेजमेंट आणि अवतार व्हेंचर्स यांनीदेखील कंपनीवरील आपला विश्वास पुन्हा सिद्ध करून गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात इन्शुरन्सदेखोने एका इन्शुअरटेककडून दक्षिण आशियात उभारलेल्या सर्वांत मोठ्या सीरिज एक फंडिंगमध्ये १५० दशलक्ष डॉलर्स प्राप्त केले होते.

इन्शुरन्सदेखो एकाच वर्षात २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उभारून फक्त एक आघाडीची भारतीय इन्शुअरटेक ठरली नाही, तर तिने एकाच वर्षात मोठ्या प्रमाणावर सीरिज ए आणि बी फंडिंग प्राप्त करणाऱ्या खूप कमी स्टार्टअप्समध्ये आपले स्थापन प्राप्त केले आहे. सध्याचा वित्तपुरवठ्याची परिस्थिती आटलेली असताना ही महत्त्वाची कामगिरी आहे. हा अद्वितीय फंड रेज हा प्रत्येक भारतीयाचा विमा उतरवण्याच्या इन्शुरन्सदेखो स्वप्नाचे आणि त्यांच्या बिझनेस मॉडेलचे प्रतीक आहे.

Related posts

न्यू चॅप्टरच्या संवादाचे उद्घाटन करून अॅबॉटकडून मेनोपॉजबाबत जास्तीत जास्त लोकांना बोलते करण्याचे आवाहन

Shivani Shetty

मेड इन इंडिया ‘इझे परफ्यूम्स’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

Shivani Shetty

इझमायट्रिपचा आदरातिथ्‍य क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment