मुंबई, 03 एप्रिल, 2023: कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (कोटक जनरल इन्शुरन्स), नवीन युगातील सुक्ष्म, छोट्या व मध्यम उद्योग (एमएसएमई) कंपन्यांना छोट्या आकारमानाचा विमा उपलब्ध करून देण्यासाठी , actyv.ai सोबत भागीदारी केल्याची घोषणा आज केली. छोट्या उद्योगांना दीर्घ काळ टिकून राहण्यात मदत व्हावी म्हणून कोटक जनरल इन्शुरन्स, actyv.aiच्या एआय-पॉवर्ड प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेणार आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून, actyv.aiचे तंत्रज्ञान तसेच कोटक जनरल इन्शुरन्सच्या कस्टमाइझ्ड विमा उत्पादनांचा मेळ घालून, उद्योगांना तसेच परिसंस्थेतील सुमारे एक लाख पुरवठा साखळी सहयोगींना, नाविन्यपूर्ण विमा उत्पादने देऊ केली जातील. जेणेकरून, ह्या उद्योगांना व्यवसायातील जोखमींचा विचार न करता व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.
कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मल्टीलाइन बिझनेस विभागाचे प्रमुख जगजीत सिंग सिद्धु म्हणाले, “शॉपकीपर (दुकानदार) पॉलिसी, गंभीर आजार व व्यक्तिगत अपघात पॉलिसी आदी छोटी ओटीसी उत्पादने संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पुरवण्यासाठी actyv.ai सोबत भागीदारी करणे आमच्यासाठी उत्साह वाढवणारा अनुभव आहे. बीएफएसआय उत्पादनांची विक्री जनतेला व उद्योगांना करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे, असे आम्हाला वाटते. औद्योगिक मूल्यसाखळीतील शेवटच्या घटकाला पूर्वी कधीही पुरवण्यात आली नसतील अशा पद्धतीने मूलभूत विमा उत्पादने, ह्या भागीदारीमुळे, पुरवली जाणार आहेत.”
actyv.ai चे संस्थापक व ग्लोबल सीईओ रघुनाथ सुब्रमणियन म्हणाले, “कोटक जनरल इन्शुरन्सशी झालेल्या आमच्या भागीदारीच्या माध्यमातून actyv.ai प्लॅटफॉर्मवरील उद्योगांना आणि त्यांच्या सर्व वितरक, रिटेलर्स व पुरवठादारांना समूह विमा उत्पादने देऊ शकतात. डिजिटल प्रवासांमध्ये सहाय्य करणे, व्यवसायातील जोखमींचा विमा काढण्यावर लक्ष केंद्रित करून जबाबदार व शाश्वत उपायांची निर्मिती करणे आणि त्यायोगे वाढीवर व लवचिकतेवर भर देणारी परिसंस्था बळकट करणे हे सर्व आम्ही, एक प्रवर्ग निर्माते, म्हणून सातत्याने करत राहू.”