maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सने व्‍यावसायिक वाहन फायनान्सिंगसाठी ईएसएएफ स्‍मॉल फायनान्‍स बँकेसोबत सामंजस्‍य करार

मुंबई, २० सप्‍टेंबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आपल्‍या व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना आकर्षक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी ईएसएएफ स्‍मॉल फायनान्‍स बँकेसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. सुरूवातीला स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स (एससीव्‍ही) आणि लाइट कमर्शियल वेईकल्‍स (एलसीव्‍ही) यावर लक्ष केंद्रित करत हा सहयोग टाटा मोटर्सच्‍या संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओसाठी फायनान्सिंग देण्‍यापर्यंत विस्‍तारित होईल.

टाटा मोटर्सच्‍या एसीव्‍हीअँडपीयूचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. विनय पाठक म्‍हणाले, “ईएसएएफ स्‍मॉल फायनान्‍स बँकेसोबतचा आमचा सहयोग देशातील कानाकोपऱ्यापर्यंत ग्राहकांसाठी विनासायास फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देतो. या सहयोगामुळे ग्राहकांना सर्वोत्तम व कार्यक्षम सोल्‍यूशन्‍ससह साह्य करण्‍याप्रती, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय ध्‍येयांची पूर्तता करण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. हा सहयोग विशेषत: फर्स्‍ट- आणि लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍समध्‍ये उद्योजकता व रोजगार निर्मितीला चालना देण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नाला अधिक दृढ करतो.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत ईएसएएफ स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे कार्यकारी उपाध्‍यक्ष्‍ज्ञ श्री. हेमंत कुमार तम्‍ता म्‍हणाले, “आम्‍हाला ग्राहकांना सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. उद्योजकांना सक्षम करण्‍याचा आमचा संयुक्‍त दृष्टिकोन या सहयोगाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. आर्थिक समावेशनामधील आमचे व्‍यापक नेटवर्क व कौशल्‍यासह आम्‍हाला विश्‍वास आहे की, हा सहयोग मोठ्या विकासाला चालना देईल आणि व्‍यावसायिक वाहन व्‍यवसायांच्‍या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देईल.”

टाटा मोटर्स सब १-टन ते ५५ टन कार्गो वाहनांची आणि १०-सीटर ते ५१-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामध्‍ये लॉजिस्टिक्‍स आणि मास मोबिलिटी विभागांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍स, ट्रक्‍स आणि बसेस विभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्‍या २५०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून अद्वितीय दर्जा आणि सेवा कटिबद्धतेची खात्री देते. या नेटवर्कचे कार्यसंचालन प्रशिक्षित स्‍पेशालिस्‍ट्सकडून पाहिले जाते आणि टाटा जेन्‍यूएन पार्ट्सचे पाठबळ आहे.

Related posts

फ्रेशर्सच्या नेमणूकीत पहिल्या सहामाहीत ६ टक्के वाढीची अपेक्षा: टीमलीज

Shivani Shetty

सॅमसंगने या महिन्‍यामध्‍ये लाँच करण्‍यात येणाऱ्या भारतीयांसाठी विशिष्‍ट एआय वॉशिंग मशिन सेटची झलक दाखवली

Shivani Shetty

हिरो मोटोकॉर्पने नवीन श्रेणी व भावी कन्‍सेप्‍टमधील प्रॉडक्‍शन-रेडी वेईकल्‍ससह ईआयसीएमए २०२३ येथेसर्वांचे लक्ष वेधून घेतले

Shivani Shetty

Leave a Comment