भारत – सप्टेंबर २०२४ – सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आपल्या ‘बिग टीव्ही फेस्टिवल’ प्रमोशनच्या लाँचसह यंदाचा सणासुदीचा काळ अधिक उत्साहपूर्ण करण्यास सज्ज आहे. निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही अशा प्रीमियम एआय-पॉवर्ड बिग-स्क्रिन टेलिव्हिजन्सवर अद्वितीय डिल्स देत या लिमिटेड पीरियड ऑफर्स १४ सप्टेंबरपासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहेत, ज्यामध्ये आकर्षक फ्रीबी, कॅशबॅक, ३-वर्ष वॉरंटी आणि स्पेशल ईएमआय ऑफर्सचा समावेश आहे.
सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल एआय-सक्षम वैशिष्ट्यांसह व्हिज्युअल इमर्शन आणि साऊंड क्वॉलिटीमध्ये नवीन मानक स्थापित करणार आहे. या ऑफर्स निवडक मॉडेल्समधील निओ क्यूएलईडी, ओएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही श्रेणीवर उपलब्ध आहेत.
ग्राहक निवडक खरेदींवर जवळपास २९०००० रूपये किमतीचे सॅमसंग टीव्ही मॉडेल्स मोफत मिळवू शकतात, तसेच १००००० रूपये किंमतीचा साऊंडबार मोफत मिळवू शकतात. सॅमसंग आपल्या अल्ट्रा-प्रीमियम बिग टेलिव्हिजन्सवर जवळपास २० टक्के आकर्षक कॅशबॅक्स, ३-वर्ष सर्वसमावेशक वॉरंटी आणि २७७७ रूपयांपासून सुरू होणारे इझी ईएमआय, तसेच जवळपास ३६ महिन्यांमध्ये दीर्घकालीन मुदतीचे ईएमआय देखील देत आहे. या आकर्षक डिल्स Samsung.com वर आणि भारतभरातील निवडक सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध असतील.
अद्वितीय पिक्चर व साऊंडच्या नवीन युगामध्ये प्रवेश करत सॅमसंगच्या या ऑफर्सचा एआय तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि प्रीमियम टीव्हींची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. एआय अपस्केलिंग आणि एआय ऑप्टिमायझेशनद्वारे समर्थित त्यांच्या स्वत:च्या स्क्रिन दर्जासह हे प्रीमियम एआय टेलिव्हिजन्स ग्राहकांच्या कन्टेन्टमध्ये वास्तविकतेची भर करतात. क्यू-सिम्फोनी व डॉल्बी अॅटमॉससह प्रत्येक अॅक्शन सीन सुस्पष्टपणे पाहायला मिळतो. स्क्रिनच्या प्रत्येक कोपऱ्यामधून बहुआयामी साऊंड ऐकायला येतो, ज्यामुळे चित्रपटगृहाप्रमाणे मनोरंजनाचा आनंद मिळतो. तसेच, वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर देखरेख ठेवत सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी टीव्ही आणि त्याला कनेक्ट केलेल्या डिवाईसेसचे अनधिकृत ऍक्टिव्हीटीजपासून संरक्षण करते.
“आज, भारतातील आधुनिक घरांमध्ये टेलिव्हिजन्स लिव्हिंग स्पेसेसचे खास आकर्षक बनले आहेत, ज्यामधून तंत्रज्ञान व जीवनशैलीचे उत्तम संयोजन दिसून येते. भारतात मोठ्या स्क्रिन आकाराच्या टेलिव्हिजन्ससाठी वाढत्या मागणीसह आणि ग्राहकांसाठी प्रीमियम एआय अनुभवाचे लोकशाहीकरण करण्यासाठी आम्हाला सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल पुन्हा सादर करण्याचा अभिमान वाटतो. एआय-सक्षम वैशिष्ट्यांसह व्हिज्युअल इर्मशन आणि साऊंड क्वॉलिटीमध्ये नवीन मानक स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे टेलिव्हिजन्स स्टाइल दर्जाला नव्या उंचीवर घेऊन जातात, तसेच सॅमसंग नॉक्सच्या माध्यमातून परिपूर्ण सुरक्षितता देतात. बिग टीव्ही फेस्टिवल ग्राहकांना सणासुदीच्या काळापूर्वी सॅमसंग एआय टीव्ही श्रेणीद्वारे देण्यात आलेल्या अल्टिमेट सिनेमॅटिक अनुभवामध्ये अपग्रेड करत भावी उत्साहित होम एंटरटेन्मेंट सिस्टमचा अवलंब करण्यास प्रेरित करतो,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विपलेश डांग म्हणाले.
निओ क्यूएलईडी ८के
निओ क्यूएलईडी ८के श्रेणी एनक्यू८ एआय जेन२ प्रोसेसरच्या शक्तीसह येते, जे कन्टेन्टसाठी एआय-समर्थित अनुभव देत वास्तविक पिक्चर क्वॉलिटी देते. एनक्यू८ एआय जेन२ प्रोसेसरला २५६ एआय न्यूरल नेटवर्क्सचे पाठबळ आहे, जे तुम्ही ओटीटी सेवा स्ट्रिमिंग करत असा, आवडते व्हिडिओ गेम्स खेळत असा किंवा लाइव्ह क्रीडा सामने पाहत असा ८के अनुभव देण्यासाठी पिक्चर व साऊंडमध्ये बदल करण्यास मदत करतात. सॅमसंगचे निओ क्यूएलईडी ८के टेलिव्हिजन्स मोशन एक्सेलरेटर टर्बो प्रोसह देखील येतात, ज्यामुळे हाय-स्पीड गेमिंगसाठी सुस्पष्ट व्हिज्युअल्स आणि अत्यंत गतीशील स्पीड्सची खात्री मिळते.
निओ क्यूएलईडी ४के
२०२४ निओ क्यूएलईडी ४के लाइन-अपमध्ये एनक्यू४ एआय जेन२ प्रोसेसरची शक्ती आहे, जे कोणत्याही कन्टेन्टमध्ये वास्तविकतेची भर करते आणि आकर्षक ४के रिझॉल्यूशनचा अनुभव देते. क्वॉन्टम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजीद्वारे सुधारित स्क्रिन गुंतागुंतीच्या सीन्समध्ये उत्तम कॉन्ट्रास्टची खात्री देते. अचूक रंगसंगतींसाठी जगातील पहिले पॅन्टोन व्हॅलिडेटेड डिस्प्ले आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी डॉल्बी अॅटमॉससह निओ क्यूएलईडी ४के टेलिव्हिन्सची श्रेणी अल्टिमेट ४के अनुभवासाठी स्तर उंचावते.
ओएलईडी टीव्ही
जगातील पहिला ग्लेअर-फ्री ओएलईडी कोणत्याही प्रकाशात अनावश्यक रिफ्लेक्शन दूर करण्यासह कॉन्ट्रास्ट व सुस्पष्टपणे चित्रे दिसण्याची खात्री देतो. एनक्यू४ एआय जेन२ प्रोसेसरची शक्ती असलेल्या सॅमसंगच्या ओएलईडी टेलिव्हिजन्समध्ये रिअल डेप्थ एन्हान्सर आणि ओएलईडी एचडीआरप्रो यांसारखी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, जी पिक्चर क्वॉलिटीला नव्या उंचीवर घेऊन जातात. तसेच, मोशन एक्सेलरेटर १४४ हर्ट्झ सारखी वैशिष्ट्ये सुलभ गती व जलद रिस्पॉन्स रेट्सची खात्री देतात. सॅमसंग ओएलईडी गेमिंगसाठी अल्टिमेट पर्याय आहे. आकर्षक डिझाइन्स असलेले ओएलईडी टीव्ही व्युइंग स्पेसमध्ये अधिक आकर्षकतेची भर करतात.
क्यूएलईडी टीव्ही
सॅमसंगचा क्यूएलईडी टीव्ही क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकर्षक पिक्चर क्वॉलिटी देतो. १०० टक्के कलर व्हॉल्यूम असलेला हा टीव्ही खात्री देतो की, रंगसंगती कोणत्याही ब्राइटनेस पातळीमध्ये वास्तविक व वैविध्यपूर्ण राहतील. या टीव्हीची अल्ट्रा-स्लिम डिझाइन कोणत्याही घरामध्ये सामावून जात लिव्हिंग स्पेसेसना अधिक आकर्षक करू शकते.
क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही
सॅमसंगचा यूएचडी टीव्ही डायनॅमिक क्रिस्टल कलर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वास्तविक रंगसंगती देतो, ज्यामधून प्रत्येक शेडमध्ये वास्तविक जीवनासारखी विविधता आणि सुस्पष्टता मिळते. ४के अपस्केलिंग तंत्रज्ञान स्क्रिनवर पिक्चरला जवळपास ४के क्वॉलिटीमध्ये सादर करते, ज्यामधून लक्षवेधक स्क्रिन अनुभव मिळतो. मोशन एक्सेलरेटर गतीशील असलेल्या अॅक्शन सीन्सना सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री देते, ज्यामुळे प्रत्येक गेम, चित्रपट किंवा शोचा छान आनंद घेता येतो.