maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सने भारतातील पहिल्‍या एसयूव्‍ही कूपेसह मिड-एसयूव्‍ही श्रेणीला नव्‍या उंचीवर नेले

मुंबई, जुलै १९, २०२४: एसयूव्‍ही डिझाइनमधील नवीन युगाला परिभाषित करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज टाटा कर्व्‍ह आयसीई आणि ईव्‍ही लाँच केली. शक्तिशाली तत्त्व, प्रकार व वैशिष्‍ट्यांनी युक्‍त कर्व्‍ह भारतातील पहिली एसयूव्‍ही कूपे आहे. आधुनिक एसयूव्‍ही टाइपोलॉजी सादर करणाऱ्या कर्व्‍हमध्‍ये एसयूव्‍हीचा कणखरपणा व व्यावहारिकतेसह कूपेची आकर्षकता व स्‍पोर्टी सिल्‍हूट आहे. ७ ऑगस्‍ट रोजी लाँच करण्‍यात येणारी ऑल-न्‍यू कर्व्‍ह टाटा मोटर्सच्‍या प्रबळ मल्‍टी-पॉवरट्रेन धोरणाला फॉलो करेल आणि तिच्‍या ईव्‍ही व्‍हर्जनमध्‍ये पहिल्‍यांदाच उपलब्‍ध असेल, जी तिच्‍या आयसीई काऊंटरपार्टनंतर लवकरच लाँच करण्‍यात येईल.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”टाटा मोटर्स भारतातील एसयूव्‍ही क्षेत्रात अग्रस्‍थानी आहे. अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे आम्‍ही रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत कार्यक्षमता वाढवणाऱ्या नाविन्‍यपूर्ण डिझाइन्‍सच्‍या माध्यमातून श्रेणीमध्‍ये सतत धुमाकूळ निर्माण केला आहे. ओरिजिनल सिएरा, सफारी, नेक्‍सॉन, पंच आणि हॅरियरमधून एसयूव्‍हींमधील हे डिझाइन केंद्रित बाजारपेठ नेतृत्‍व दिसून येते. या वारसाला पुढे घेऊन जात आणि आमचा एसयूव्‍ही पोर्टफोलिओ अधिक प्रबळ करण्‍यासाठी आम्‍ही भारतातील पहिली एसयूव्‍ही कूपे – टाटा कर्व्‍ह लाँच करत पुन्‍हा एकदा लक्षवेधक व महत्त्वाकांक्षी मिड एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण केला आहे. या एसयूव्‍ही कूपेची आकर्षक डिझाइन प्रिमिअम श्रेणींमधील कूपे बॉडी स्‍टाइलला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, तसेच बेस्‍ट इन सेगमेंट कार्यक्षमता व अभूतपूर्व व्‍यावहारिकता देते. तसेच, कर्व्‍ह पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्‍समधील पर्यायांसह आमच्‍या मल्‍टी पॉवरट्रेन धोरणाच्‍या अग्रस्‍थानी आहे. कर्व्‍हसह आम्‍ही मिड एसयूव्‍ही ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करू, तसेच त्‍यांना प्रिमिअम कार्यक्षमता असलेले नवीन व उत्‍साहपूर्ण डिझाइन केलेले उत्‍पादन देऊ.”
कर्व्‍हमध्‍ये लक्ष वेधून घेणारी आकर्षक डिझाइन, सक्षम करणारी व्‍यावहारिकता आणि सर्वोत्तम कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. मिड-एसयूव्‍ही बाजारपेठेत सामान्‍य दिसून येणाऱ्या समकालीन बॉक्‍सी डिझाइनच्‍या तुलनेत कर्व्‍हची एसयूव्‍ही कूपे बॉडी स्‍टाइल कन्‍सेप्‍ट शो कारमध्‍ये दिसण्‍यात येणारी प्रबळ ऐरोडायनॅमिक थीम पुढे घेऊन जाते, ज्‍यामधून वेईकलची प्रबळ विशिष्‍टता आणि प्रबळता दिसून येते. अधिक राइड उंची, प्रबळ क्‍लॅडिंग आणि डायनॅमिक प्रमाण वेईकलच्‍या लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करते. कर्व्‍हची स्‍लोपिंग रूफलाइन सर्वोत्तम राइडचा आनंद देते, तसेच मोठे व्‍हील्‍स, उच्‍च दृष्टीकोन आणि डिपार्चर अँगल व अधिक उंच ग्राऊंड क्‍लीअरन्‍स वेईकलला आकर्षक व संतुलित स्‍टान्‍स देतात. एसयूव्‍ही कूपे दोन आकर्षक रंगांमध्‍ये लाँच करण्‍यात येईल: व्‍हर्च्‍युअल सनराइजमध्‍ये Curvv.e आणि गोल्ड एसेन्‍समध्‍ये कर्व्‍ह आयसीई.
लाँग ड्राइव्‍हवर जाण्‍याची आवड असलेल्‍या भारतीय कुटुंबासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या आणि एसयूव्‍ही कूपे डिझाइन असलेल्‍या कर्व्‍हचे इंटीरिअर्स आधुनिक व सर्वोत्तम आहे, ज्‍यामध्‍ये एसयूव्‍हीच्‍या कार्यक्षमतांसह एैसपैस केबिन आहे, तसेच कूपे बॉडी स्‍टाइलचा विचार करताना स्‍टोरेज बाबतीत तडजोड करण्‍यात आलेली नाही. प्रिमिअम आकर्षकतेसह केबिनमध्‍ये दर्जात्‍मक तंत्रज्ञान आणि आकर्षक रंगसंगती, मटेरिअल्‍स व फिनिशेस् आहेत. पॅनोरॅमिक ग्‍लास रूफमधून केबिनमध्‍ये नैसर्गिक प्रकाश येतो, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्‍साहपूर्ण राइडचा आनंद मिळतो. ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी बूट स्‍पेस देखील रिकन्फिग्‍युअर करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे अधिक व एैसपैस स्‍टोरेज जागा मिळते.
कर्व्‍ह पेट्रोल व डिझेलमध्‍ये शक्तिशाल इंजिन पर्याय देते, तसेच इलेक्ट्रिक व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये देखील लांबच्‍या अंतरापर्यंत रेंज देते. गतीशीलता व सर्वोत्तम हाताळणी देणाऱ्या बॉडी स्‍टाइलसह ही वेईकल ग्राहकांना अद्वितीय आणि स्‍पोर्टी ड्रायव्हिंग अनुभव देते. प्रगत इन्‍फोटेन्‍मेंट, मोठे स्क्रिन्‍स आणि कनेक्‍टेड कार तंत्रज्ञान असलेल्‍या कर्व्‍हमध्‍ये या सेगमेंटमध्‍ये ऐकण्‍यात आलेली आणि सहसा उच्‍च-सेंगमेंट वेईकल्‍समध्‍ये दिसण्‍यात येणारी विविध स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये आहेत. तसेच, ही वेईकल टाटा मोटर्सच्‍या सुरक्षिततेच्‍या वारसाल पुढे घेऊन जाते, जेथे ही वेईकल अनेक अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सेफ्टी वैशिष्‍ट्यांसह प्रखर सुरक्षितता नियमांची पूर्तता करत डिझाइन करण्‍यात आली आहे.

Related posts

एटंेरोहल्ेथकेयरसोल्यशुन्सलिलिटेडनेसबेीकडेडीआरएचपीफाईिकेिे

Shivani Shetty

Honasa Consumer Limited चा आयपीए 31 ऑक्टोबर 2023 पासनू होणार खलु ा, वित्त िर्ष 2024 च्या पहहल्या ततमाहीत कं पनी आली फायद्यात

Shivani Shetty

हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी क्षेत्रात नोकरीमध्ये वाढ: नोकरी जॉबस्‍पीक

Shivani Shetty

Leave a Comment