गुरूग्राम, भारत – जुलै १९, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने त्यांचे नवीन गॅलॅक्सी बड्स३, गॅलॅक्सी बड्स३ प्रो, गॅलॅक्सी वॉच७ आणि गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा स्मार्टवॉचेस् प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. गॅलॅक्सी वॉच७ आणि गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा सर्वांना एण्ड-टू-एण्ड वेलनेस अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या वीअरेबल्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत गॅलॅक्सी एआयची क्षमता विस्तारित करतात.
गॅलॅक्सी वॉच पोर्टफोलिओमध्ये भर करण्यात आलेला नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा उच्च स्तरीय उपलब्धींसाठी अल्टिमेट इंटेलिजन्स व क्षमतांसह फिटनेस अनुभवांमध्ये वाढ करण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे.
वॉच अल्ट्रामध्ये नवीन कुशन डिझाइन आहे, जी संरक्षण व व्हिज्युअल लुक वाढवते. या स्मार्टवॉचमध्ये टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि १० एटीएम वॉटर रेसिस्टण्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत आणि समुद्रामध्ये पोहणे, अत्यंत प्रखर वातावरणात सायकल चालवणे अशा प्रगत फिटनेस अनुभवांसाठी लांबच्या अंतरापर्यंत कार्यरत राहू शकतो.
नवीन भर करण्यात आलेल्या क्विक बटनसह तुम्ही त्वरित वर्कआऊट्स सुरू करण्यासोबत त्यावर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या गरजांनुसार इतर वैशिष्ट्यांवर देखरेख ठेवू शकता. तसेच, तुम्ही सुरक्षिततेसाठी इमर्जन्सी सायरन कार्यान्वित करू शकता. वर्कआऊटनंतर गॅलॅक्सी वॉच अल्ट्रावरील समर्पित वॉच फेसेसवर त्वरित आकडेवारी तपासा. ३,००० नीट्सच्या सर्वोच्च ब्राइटनेससह गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रिनवरील बाबी सुस्पष्टपणे दिसण्याची व वाचता येण्याची खात्री देतो. लांबच्या प्रवासादरम्यान कार्यरत राहण्यासाठी गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये गॅलॅक्सी वॉच लाइन-अपमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंगमध्ये जवळपास १०० तासांपर्यंत आणि एक्सरसाइज पॉवर सेव्हिंगमध्ये ४८ तासांपर्यंत कार्यरत राहते.
गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा ४७ मिमी आकारासह टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हाइट आणि टायटॅनियम सिल्व्हर या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. गॅलॅक्सी वॉच अल्ट्रामध्ये ३ एनएम चिपसेट आहे.
गॅलॅक्सी वॉच७ सह, तुम्ही १०० हून अधिक वर्कआऊट्स अचूकपणे ट्रॅक करू शकता आणि तुमची ध्येये पूर्ण करण्यासाठी वर्कआऊट रूटिनसह विविध व्यायामांना एकत्र करत रूटिन्स तयार करू शकता. बॉडी कम्पोझिशनसह संपूर्ण शरीर व फिटनेसबाबत माहिती मिळवा, ज्यामधून तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेबाबत माहिती मिळेल. तसेच झोपेच्या विश्लेषणासाठी नवीन प्रगत गॅलॅक्सी एआय अल्गोदिरम आहे. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) आणि ब्लड प्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्या आरोग्याबाबत सखोल माहिती मिळवा.
गॅलॅक्सी वॉच७, वॉच अल्ट्रा, बड्स३ सिरीजसाठी प्री बुक ऑफर्स
गॅलॅक्सी वॉच७ प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना ८००० रूपयांची मल्टी-बँक कॅशबॅक किंवा ८००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल, तसेच गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना १०००० रूपयांची मल्टी-बँक कॅशबॅक किंवा १०००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.
*वॉच७ आणि वॉच अल्ट्राच्या किमती*
Model Variant Price
Watch7 Watch7 40 mm BT 29999
Watch7 Watch7 40 mm LTE 33999
Watch7 Watch7 44 mm BT 32999
Watch7 Watch7 44 mm LTE 36999
Watch Ultra Watch Ultra 59999
*बड्स३ सिरीजच्या किमती*
Model Price
Buds3 14999
Buds3 Pro 19999