maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून आपल्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या संपूर्ण श्रेणीसाठी डिजिटल मार्केटप्‍लेस ‘फ्लीट व्‍हर्स’ लाँच

मुंबई, जून २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍ससाठी सर्वसमावेशक व नाविन्‍यपूर्ण डिजिटल मार्केटप्‍लेस ‘टाटा मोटर्स फ्लीट व्‍हर्स’च्‍या लाँचची घोषणा केली. हा प्‍लॅटफॉर्म नवीन वाहनांचा शोध, कन्फिग्‍युरेशन, संपादन, फायनान्सिंग यांसारखी वैशिष्‍ट्ये देतो आणि अतिरिक्‍त सेवा व वैशिष्‍ट्यांची श्रेणी समाविष्‍ट करण्‍यासाठी फ्यूचर-प्रूफ प्रमाणित आहे, ज्‍यामुळे फ्लीट व्‍हर्स सर्व व्‍यावसायिक वाहन गरजांसाठी एक-थांबा डिजिटल गंतव्‍य आहे.
पाच प्रमुख आधारस्‍तंभांवर निर्माण करण्‍यात आलेले फ्लीट व्‍हर्स एकाच प्‍लॅटफॉर्मवर व्‍यावसायिक वाहन मालकीहक्‍काचे सर्व पैलू सादर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. प्रगत सेमॅण्टिक सर्च असलेले स्‍मार्ट सर्च वेईकल डिस्‍कव्‍हरी वापरकर्त्‍यांना टाटा मोटर्सचे ९०० हून अधिक मॉडेल्‍स आणि ३००० हून अधिक व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या व्‍यावसायिक वाहनांची संपूर्ण श्रेणी एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची सुविधा देते. प्रॉडक्‍ट कन्फिग्‍युरेटरसह वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय गरजा, उपयोजन आणि निवडींनुसार सर्वात योग्‍य वेईकल शिफारशी मिळवता येते. ३डी व्हिज्‍युअलायझर वास्‍तविक स्‍वरूपात वेईकल एक्‍स्‍टीअर्स व इंटीरिअर्स पाहण्‍यासाठी सर्वोत्तम अनुभव देते. वेईकल ऑनलाइन फायनान्‍ससह फ्लीट व्‍हर्स प्रमुख फायनान्शियर्ससोबत सहयोग करत जलदपणे व सुलभपणे फायनान्‍स अॅप्‍लीकेशन्‍स आणि मान्‍यता देते. शेवटचे म्‍हणजे, वेईकल ऑनलाइन बुकिंग वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना काही सोप्‍या क्लिक्‍समध्‍ये त्‍यांच्‍या पसंतीच्‍या वेईकल्‍स बुक करण्‍यास आणि प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करत संपादन प्रक्रिया सुलभ करण्‍यास सक्षम करते.
फ्लीट व्‍हर्स प्‍लॅटफॉर्म लाँच करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या डिजिटल बिझनेसचे प्रमुख श्री. भरत भूषण म्‍हणाले, ”फ्लीट व्‍हर्सच्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना सर्वसमावेशक डिजिटल प्‍लॅटफॉर्म प्रदान करत व्‍यावसायिक वाहन उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित करत आहोत. आमचा व्‍यावसायिक वाहन मालकीहक्‍क अनुभव सुलभ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून या वाहनांची गतीशीलता, सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, सुरक्षितता व विश्‍वसनीयतेची खात्री मिळते. या उपक्रमामधून नाविन्‍यता व ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्‍याप्रती, तसेच डिजिटलाइज्‍ड मूल्‍य साखळ्यांच्‍या माध्‍यमातून डिलर्स व ग्राहकांसाठी विकास आणि सोयीसुविधेला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला ग्राहकांना हा परिवर्तनात्‍मक अनुभव देण्‍याचा आनंद होत आहे, तसेच आम्‍ही नवीन वैशिष्‍ट्ये व क्षमतांसह प्‍लॅटफॉर्ममध्‍ये सतत सुधारणा करत राहण्‍यास उत्सुक आहोत.”
फ्लीट व्‍हर्सवरील सर्व व्‍यवहार टाटा मोटर्सचे भारतभरातील व्‍यापक डिलरशिप नेटवर्कच्‍या माध्‍यमातून डायरेक्‍ट-टू-डिलर पेमेंट इकोसिस्‍टमचा वापर करत केले जातात. डिजिटल ब्रिज म्‍हणून काम करत प्‍लॅटफॉर्म डिलरशिप्‍स व फायनान्शियर्सना प्रत्‍यक्ष ग्राहकांशी कनेक्‍ट करतो, चौकशीपासून वेईकल डिलिव्‍हरीपर्यंत प्रक्रिया सोपी करतो. यामुळे ग्राहक आणि टाटा ऑथोराईज्‍ड डिलरशिप्‍सदरम्‍यान पारदर्शक, अचूक व सोईस्‍कर खरेदी प्रक्रिया होण्‍याची खात्री मिळते, जी दोघांसाठी विन-विन स्थिती आहे.

Related posts

बीएलएस ई-सर्व्हिसेसची कोटक महिंद्रा बँकसह भागीदारी

Shivani Shetty

व्हिएतजेटच्‍या पहिल्‍या तिमाहीमधील कामगिरीने एव्हिएशन विकासासाठी स्‍थापित केले नवीन मानक

Shivani Shetty

द बॉडी शॉपने विशेष फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन लाँच केले

Shivani Shetty

Leave a Comment