मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४: ईव्ही क्षेत्रातील आघाडीच्या १० ओईएमपैकी एक लेकट्रिक्स ईव्हीने एलएक्सएस २.० सादर केली आहे, २.३ केडब्ल्यू बॅटरीसह याची रेन्ज ९८ किमी आहे, टेस्टेड १.२५एल किमीसह अतुलनीय गुणवत्ता असलेल्या या गाडीची किंमत फक्त ७९,९९९ (या कॅटेगरीतील ही सर्वात कमी किंमत आहे) रुपये आहे.
एलएक्सएस २.० ही २डब्ल्यू कॅटेगरीतील एकमेव ईव्ही आहे. योग्य रेन्ज, योग्य गुणवत्ता आणि किमतीचे योग्य मूल्य मिळवून देऊन ही ईव्ही ग्राहकांच्या तीन प्रमुख समस्यांचे निवारण करते. एलएक्सएस २.० च्या बुकिंग्सना प्रचंड प्रतिसाद मिळत असून १०,००० युनिट्स आधीच विकली गेली आहेत. प्री बुकिंग्स सुरु असून डिलिव्हरी मार्च २०२४ च्या नंतर होणार आहेत.
एसएआर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एमडी आणि सीईओ श्री के विजय कुमार यांनी सांगितले, “मूल्याबाबत विशेष जागरूक असलेल्या भारतीय ग्राहकांचा दृष्टिकोन आम्ही समजू शकतो. यामध्ये जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी आणि ईव्ही२डब्ल्यूला जास्तीत जास्त ग्राहकांची पसंती मिळावी यासाठी आम्ही हे नवीन उत्पादन आणले आहे. यामध्ये मूल्य आणि परवडण्याजोगी किंमत यांचा सुयोग्य मिलाप आहे, नावीन्य व दर्जा यामध्ये जरा देखील तडजोड करण्यात आलेली नाही. २.३ केडब्ल्यू बॅटरी, ९८ किमी रेन्ज आणि फक्त ७९,९९९ रुपयांना उपलब्ध असलेली ही एकमेव २डब्ल्यूईव्ही आहे.”