maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कृषी क्षेत्रात क्रांती: शेतक-यांसाठी ड्रोनद्वारे फवारणी सेवेची सुरुवात


महाराष्ट्र, २४ ऑगस्ट २०२३: शेतकऱ्यांना प्रभावी तंत्रज्ञान-सक्षम उपायांसह समाधान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारताचे वाढते डेटा-संचालित कृषी व्यासपीठ सलाम किसानने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)च्या सहकार्याने पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फवारणी सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमांतर्गत सलाम किसानने शेतकरी उत्पादक संस्थांसोबत सहकार्य केले आहे जेणेकरून ड्रोन फवारणी सेवा शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी सहज उपलब्ध आणि परवडणारी बनवता येईल. ड्रोनला एक कार्यक्षम, कीटक व्यवस्थापन आणि कृषी रसायनांचा अचूक वापर करण्यासाठी घरोघरी पोहचवून शेतकऱ्यांना अत्याधुनिक फवारणी क्षमतांसह सुसज्ज करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय ८५ – ९०% आणि उत्पादनाचा वापर २० – ३०% कमी होतो, ज्यामुळे शाश्वत शेतीकडे प्रगती होते.

सलाम किसानच्या संस्थापिका आणि सीईओ धनश्री मानधनी म्हणाल्या, “सलाम किसानमध्ये, आम्ही ग्रामीण समुदायांना लवचिकता आणि टिकाऊपणासाठी सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि तळागाळातील बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमधील सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनवर माझा विश्वास आहे की शेतकरी उत्पादक संस्था लहान शेतकर्‍यांना मोठी शक्ती देणार आहेत आणि सरकरी आणि खाजगी कंपन्यांच्या एकत्र येण्यामुळे विकसित भारताकडे नेले जाईल. आमच्या राष्ट्रीय कृषी धोरणाचे उद्देश्य २०२५ पर्यंत १०,००० नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याचे आहे, ज्यात कृषी मूल्य साखळी सुधारणे आणि ग्रामीण भागातील रसद (विकास) वाढीस उत्प्रेरित करणे. या स्वातंत्र्यदिनी शेतकरी उत्पादक संस्थाच्या सहकार्याने ड्रोन-आधारित फवारणी सेवा सुरू करणे हे या व्हिजनसाठी आमच्या संस्थेकडून वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

“सामान्यतः पारंपारिक पंप फवारणीसाठी प्रति एकर १०० – १२० लिटर पाणी वापरले जाते, आणि ड्रोन फवारणीसाठी १० लिटर प्रति एकर पाण्याचा वापर होतो. पारंपारिक फवारणीसाठी वेळ जास्त लागत असते आणि त्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता असते, तर ड्रोन फवारणीसाठी ७ ते ८ मिनिटे लागतात. ड्रोन सेवेला शेतकऱ्यांसाठी सुलभ बनवून, आम्ही इनपुट खर्च कमी करण्यात, कार्यक्षमता वाढविण्यात आणि शेतकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करत आहोत. मुळात, आमचा शेतकरी, कृषी परिसंस्था तसेच  शेतकरी उत्पादक संस्थांचा फायदा करण्याचा आमचा हेतू असल्याचे सलाम किसानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी सांगितले.

Related posts

महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला चालना देण्‍यासाठी ईझीआरक्‍सचा पुढाकार

Shivani Shetty

गेम्‍सक्राफ्टकडून रम्‍मीकल्‍चरसाठी ट्रस्‍ट रिपोर्ट जारी, ज्‍यामधून निष्‍पक्ष व जबाबदार गेमिंगप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते

Shivani Shetty

मुंबईतील विद्यार्थ्‍यांनी सॅमसंग ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ रोडशोमध्‍ये सहभाग घेतला; पर्यावरणासंबंधित समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा

Shivani Shetty

Leave a Comment